vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

लातूर जिल्ह्यातील १० टपाल कार्यालयांमध्ये आधार सेवा उपलब्ध; नागरिकांनी लाभ घेण्याचे टपाल विभागाचे आवाहन

लातूर जिल्ह्यातील १० टपाल कार्यालयांमध्ये आधार सेवा उपलब्ध; नागरिकांनी लाभ घेण्याचे टपाल विभागाचे आवाहन

लातूर, प्रतिनिधी हा भारतीय टपाल विभागाच्या लातूर विभागामार्फत जिल्ह्यातील नागरिकांच्या सोयीसाठी आधार सेवांचे विस्तारीकरण करण्यात आले आहे. आता लातूर जिल्ह्यातील प्रमुख १० टपाल कार्यालयांमध्ये नवीन आधार नोंदणी आणि आधार दुरुस्तीची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली असून, नागरिकांनी या सुविधेचा लाभ घ्यावा, असे आवाहन टपाल विभागामार्फत करण्यात आले आहे.

टपाल विभागाच्या या कार्यालयांमध्ये मिळणार सुविधा,लातूर विभागातील अहमदपूर (भ्रमणध्वनी क्र. ७३८७१००४०८), औराद शहाजनी (भ्रमणध्वनी क्र. ९१४५६०१६५२), औसा (भ्रमणध्वनी क्र. ७७५८०७५६११), लातूर जुने रेल्वे स्टेशन (भ्रमणध्वनी क्र. ९३०७३८५११३), चाकूर (भ्रमणध्वनी क्र. ७७४५०११५४७), किल्लारी (भ्रमणध्वनी क्र. ७०५७६००८५०), गांधी चौक लातूर मुख्य टपाल कार्यालय (भ्रमणध्वनी क्र. ७७०९७९७५९६), मुरूड (भ्रमणध्वनी क्र. ७०८३३६५००६), निलंगा (भ्रमणध्वनी क्र. ८७९३७२४९०४) आणि उदगीर (भ्रमणध्वनी क्र. ७७६७८४८६२४) या टपाल कार्यालयांमध्ये आधार केंद्र कार्यान्वित करण्यात आले आहेत. संबंधित केंद्रांच्या नावापुढे दिलेल्या संपर्क क्रमांकावर नागरिक अधिक माहितीसाठी संपर्क साधू शकतात.

या केंद्रांच्या माध्यमातून नागरिकांना नवीन आधार नोंदणी करणे, आधार कार्डावरील मोबाईल क्रमांक अद्ययावत करणे, पत्ता बदलणे तसेच बायोमेट्रिक माहिती (ठसे व डोळ्यांचे स्कॅनिंग) अद्ययावत करणे यांसारख्या महत्त्वपूर्ण सेवा प्रदान केल्या जाणार आहेत. विशेषतः ज्या नागरिकांचे आधार जुने झाले आहे किंवा ज्यांना कागदपत्रे अद्ययावत करायची आहेत, त्यांच्यासाठी ही सोय अत्यंत फायदेशीर ठरणार आहे. आधार सेवा घेताना काही तांत्रिक अडचण आल्यास किंवा संबंधित कार्यालयाकडून प्रतिसाद न मिळाल्यास, नागरिकांच्या मदतीसाठी ८२७५००२८०५ हा व्हॉट्सॲप हेल्पलाईन क्रमांक जारी करण्यात आला आहे. या क्रमांकावर संदेश पाठवून नागरिक आपली समस्या मांडू शकतात.

लातूर जिल्ह्यातील सर्व नागरिकांनी आधारशी संबंधित कामांसाठी आपल्या जवळच्या टपाल कार्यालयाशी संपर्क साधून या शासकीय सुविधेचा लाभ घ्यावा, असे आवाहन लातूर विभागाचे सहाय्यक अधीक्षक (डाकघर) श्रीकांत माने यांनी केले आहे.

****

संबंधित पोस्ट

मुख्यमंत्री सचिवालय (जनसंपर्क कक्ष)*मंत्रिमंडळ निर्णय …

दिल्लीतमहिलासाहित्यसंमेलन ; डॉ. शारदा चोंडेकरांच्या प्रतिभेची दखल ..

पैठण कडे जाणाऱ्या जड वाहतुक मार्गात दि.९ ते ११ दरम्यान बदल

मॅजिक आयटीआय जालना इन्क्यूबेशन सेंटरच्या माध्यमातून जिल्ह्यातील युवकांना उद्योजक होण्याची संधी: कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागाचे मंत्री मंगलप्रभात लोढा  ‘मॅजिक आयटीआय जालना इनक्युबेशन सेंटर’ चे उद्घाटन 

vishwatmaklokswamivarta

1 एप्रिलपासून होणार मलेरियामुक्तीच्या आराखड्याची अंमलबजावणी- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची माहिती गडचिरोली जिल्हा मलेरियामुक्त करण्याच्या दिशेने महत्त्वपूर्ण पाऊल

vishwatmaklokswamivarta

सहकारी संस्थांच्या लेखापरिक्षकांसाठी नामतालिका तयार करण्याची प्रक्रिया सुरू; ६ एप्रिलपासून ऑनलाईन अर्जांचे आवाहन