vishwatmaklokswamivarta
Breaking News
व्यवसाय

बारावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी टोयोटा कंपनीत ‘कमवा व शिका’ अंतर्गत संधी

बारावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी टोयोटा कंपनीत ‘कमवा व शिका’ अंतर्गत संधी

व्यावसायिक प्रतिनिधी-बुलढाणा ( : बारावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी नामांकित टोयाटो मोटार कॉरपोरेशन (Toyota Motor Corporation) कंपनीत ‘कमवा व शिका’ या संकल्पनेअंतर्गत काम करण्याची सुवर्णसंधी उपलब्ध झाली आहे. या उपक्रमांतर्गत विद्यार्थ्यांना जागतिक दर्जाचे प्रशिक्षण विनामूल्य देण्यात येणार असून प्रशिक्षणासोबतच विद्यावेतनही दिले जाणार आहे

या योजनेत निवड झालेल्या विद्यार्थ्यांना पहिल्या वर्षी दरमहा १५ हजार ८१५ रुपये तर दुसऱ्या वर्षी १७ हजार ८०० रुपये इतके विद्यावेतन मिळणार आहे. तसेच विद्यार्थ्यांसाठी राहण्याची व जेवणाची संपूर्ण सोय करण्यात येणार आहे. इच्छुक विद्यार्थ्यांनी ऑनलाईन अर्ज करण्यासाठी https://forms.office.com/r/apydbQEqgp लिंकवर क्लिक करून अर्ज सादर करावा. १८ ते २० वयोगटातील इच्छुक विद्यार्थ्यांनी खालील ठिकाणी प्रत्यक्ष मुलाखतीसाठी उपस्थित राहावे.

• १२ मार्च २०२६ – शासकीय आयटीआय कॉलेज, अकोला (सकाळी ९.३०)• १२ मार्च २०२६ – शासकीय आयटीआय कॉलेज, सातारा (सकाळी ९.३०)• १३ मार्च २०२६ – शासकीय आयटीआय कॉलेज, जळगाव (सकाळी ९.३०)• १३ मार्च २०२६ – शासकीय आयटीआय कॉलेज, कोल्हापूर (सकाळी ९.३०)• १७ मार्च २०२६ – शासकीय आयटीआय कॉलेज, नांदेड (सकाळी ९.३०)• १८ मार्च २०२६ – शासकीय आयटीआय कॉलेज, नाशिक (सकाळी ९.३०)

दरम्यान, आर्थिकदृष्ट्या दुर्बल तसेच पुढील शिक्षण घेणे शक्य नसलेल्या विद्यार्थ्यांना या उपक्रमात प्राधान्य दिले जाणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. तरी जिल्ह्यातील इच्छुक विद्यार्थ्यांनी या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील यांनी केले आहे.

000000

संबंधित पोस्ट

ठाणे जिल्हयात प्रगणना कामासाठी इच्छुक बाहययंत्रणानी मनुष्यबळ पुरविण्याबाबत आवाहन

vishwatmaklokswamivarta

जिल्हा उद्योग केंद्र व महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र (एमसीईडी), तर्फेबदनापूर येथे मोफत ज्वेलरी मेकिंग प्रशिक्षण कार्यक्रमांचे आयोजन

नमुंमपा पद भरतीमधील ‘औषध निर्माता / औषध निर्माण अधिकारी’ पदाची अर्हता शासन नियमानुसार

उ‌द्योजकता, कौशल्य विकास प्रशिक्षणासाठी नोंदणी सुरू

नागपूरच्या विकासासाठी एनएमआरडीए, एनबीसीसी आणि हुडको यांच्यात दोन महत्त्वपूर्ण सामंजस्य करार

vishwatmaklokswamivarta

नोंदणी व मुद्रांक विभागातील शिपाई पदांसाठी1 ते 8 जुलै दरम्यान ऑनलाईन परीक्षा- नोंदणी महानिरीक्षक रवींद्र बिनवडे