vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्यास्थानिक बातम्या

सोप्या गोष्टी अंगिकारून असह्य उन्हाळ्यात काळजी घेण्याचे नवी मुंबई महानगरपालिकेचे आवाहन

सोप्या गोष्टी अंगिकारून असह्य उन्हाळ्यात काळजी घेण्याचे नवी मुंबई महानगरपालिकेचे आवाहन

          नवी मुंबई प्रतिनिधी- मार्च महिन्यापासून राज्यातील अनेक भागात तापमान वाढत असल्याचे निदर्शनास येत आहे. साधारणपणे एखादया प्रदेशात सलग तीन दिवस नेहमीच्या कमाल तापमानापेक्षा वातावरणातील तापमान 3 डिग्री सेल्सियसने जास्त असेल किंवा सलग दोन दिवसांसाठी 45 डिग्री सेल्सियसपेक्षा जास्त असेल तर त्याला उष्णतेची लाट असे संबोधतात. यामध्ये माणसांसोबतच पक्षी, प्राणी, वनस्पती यांनाही हानी होण्याची शक्यता असते. साधारणपणे मार्च ते मे या मान्सून पूर्वकाळात उष्णतेच्या लाटा येताना दिसतात.

 लक्षणे- उष्णतेच्या किंवा अति उष्णतेच्या लाटेमुळे चक्कर येणे, डोकेदुखी, मळमळ व उलटी होणे, अधिक घाम येणे, थकवा जाणवणे ही लक्षणे दिसून येतात.                                           या कालावधीत हवामान बदल होतात व या बदलांमध्येही आरोग्य उत्तम व निरोगी रहाण्यासाठी खालील बाबींचे पालन करा.

काय करावे -Ø तहान लागली नसली तरीही जेव्हा शक्य असेल तेव्हा पुरेसे पाणी प्यावे (किमान अडीच ते तीन लिटर पाणी प्या.)

Ø प्रवास करताना पिण्याचे पाणी सोबत ठेवावे.Ø ओरल रिहायड्रेशन सोल्यूशन (ORS) वापरावे आणि लिंबू पाणी, ताक /लस्सी आणि फळांचे रस यांसारखे घरगुती पेये प्यावी.Ø टरबूज, खरबूज, संत्री, द्राक्षे, अननस, काकडी, कोशिंबिर तसेच स्थानिक उपलब्ध फळे आणि भाज्या यासारखी जास्त पाणी सामग्री असलेली हंगामी फळे आणि भाज्या खाव्यात.

Ø पातळ, सैल, सुती आणि शक्यतो हलक्या रंगाचे कपडे घालावेत.Ø थेट सूर्यप्रकाशाच्या संपर्कात असताना तुमचे डोके झाकून ठेवावे त्यासाठी छत्री, टोपी, टॉवेल आणि इतर पारंपारिक साधनांचा वापर करावा.

Ø उन्हात बाहेर जाताना शूज किंवा चप्पल घालावी.Ø हवेशीर आणि थंड ठिकाणी जास्त वेळ घालवावा.Ø थेट सूर्यप्रकाश आणि उष्णतेच्या लाटा रोखाव्यात, त्यासाठी दिवसा खिडक्या आणि दारे बंद ठेवावीत,Ø स्वयंपाक करताना पुरेशा प्रमाणात हवा येण्यासाठी दरवाजे आणि खिडक्या उघड्या ठेवा.Ø घराबाहेरील कामांचे नियोजन शक्य असल्यास दिवसाच्या सकाळ आणि संध्याकाळच्या वेळेत करा.   काय करू नये

Ø उन्हात विशेषत: दुपारी १२:०० ते ० ३:०० या वेळेत बाहेर पडणे टाळावे.Ø दुपारच्या वेळी उन्हामध्ये असताना कठोर परिश्रम टाळावे.Ø अनवाणी बाहेर जाणे टाळावे.Ø अल्कोहोल, चहा, कॉफी आणि कार्बोनेटेड सॉफ्ट ड्रिंक्स किंवा मोठ्या प्रमाणात साखर असलेले पेय पिणे टाळावे. Ø उच्च प्रथिनेयुक्त अन्न, आणि शिळे अन्न खाणे टाळावे.Ø उभ्या केलेल्या वाहनांमध्ये लहान मुले किंवा पाळीव प्राणी यांना एकटे सोडणे टाळावे.

संवेदनशील किंवा जोखीमीचे घटकØ लहान अर्भके, लहान मुले, घराबाहेर काम करणारे लोक, गर्भवती महिला, मानसिक आजारपण असलेल्या व्यक्ती, शारीरिकदृष्ट्या आजारी, विशेषतः हृदयरोग किंवा उच्च रक्तदाब या व्यक्ती अति संवेदनशील आहेत.Ø या लोकांना उष्णतेचा धोका इतरांपेक्षा जास्त असतो आणि त्यांच्याकडे अतिरिक्त लक्ष द्यावे.     वातावरणातील उष्णता ही नेसर्गिक चक्र आहे यामुळे त्याला सामोरे जाताना “काय करावे” व “काय करू नये” या सूचनांचे पालन केल्यास नवी मुंबईतील सर्व नागरिकांचे आरोग्य उष्माघातापासून सुरक्षित राहील आणि उष्माघात संदर्भात लक्षणे आढळून आल्यास त्वरित नमुंमपाच्या नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र व रुग्णालयातून उपचार घ्यावेत असे आवाहन नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने करण्यात येत आहे.

00000

संबंधित पोस्ट

पुणे ग्रँड टूरमुळे पुण्यातील पर्यटन वाढेल; सायकलचे शहर ही जुनी ओळख पुन्हा प्रस्थापित होईल – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ‘पुणे ग्रॅण्ड टूर २०२६’चे बोधचिन्ह आणि जर्सीचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते अनावरण

vishwatmaklokswamivarta

अभिजात मराठी भाषा सप्ताहः विश्वकोश मंडळातर्फे भूविज्ञान नोंद लेखन कार्यशाळा,जनसामान्यांना पृथ्वीविषयी सोप्या भाषेत माहिती द्या-डॉ.मिलिंद दुसाने

महाराष्ट्र शिक्षक परीक्षा पात्रता परीक्षा २०२४-राखीव निकालांची सुनावणी दि.२५ पासुन

विधानसभेत नगर विकास, पाणी पुरवठा व गृहनिर्माण विभागाच्या पुरवणी मागण्या मान्य

vishwatmaklokswamivarta

निझर्णेश्वर मंदिर देवस्थान संगमनेर तालुक्यातील प्रमुख पर्यटन केंद्र होणार – पालकमंत्री डॉ. राधाकृष्ण विखे पाटील

जिल्ह्यात शस्त्रबंदी व जमावबंदी आदेश जारी…