vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

अमरावतीत १०० मुलांच्या शासकीय वसतिगृहासाठी इमारतीची आवश्यकता;१५ दिवसांत अर्ज करण्याचे आवाहन 

अमरावतीत १०० मुलांच्या शासकीय वसतिगृहासाठी इमारतीची आवश्यकता;१५ दिवसांत अर्ज करण्याचे आवाहन

अमरावती,द प्रतिनिधी: महाराष्ट्र राज्य इतर मागास बहुजन कल्याण विभागाद्वारे अमरावती येथे विमुक्त जाती, भटक्या जमाती, इतर मागास प्रवर्ग व विशेष मागासप्रवर्गातील १०० विद्यार्थ्यांसाठी नवीन मुलांचे वसतिगृह सुरू करण्यात येत आहे. या वसतिगृहासाठी सर्व सोयी-सुविधांनी युक्त अशी अंदाजे ९२०० चौरस फूट बांधकाम असलेली इमारत भाड्याने हवी असून, इच्छुक इमारत मालकांनी १५ दिवसांच्या आत अर्ज सादर करावेत, असे आवाहन इतर मागास बहुजन कल्याण विभाग, सहायक संचालक सरीता बोबडे यांनी केले आहे.

अमरावती शहरातील स्थानिक इच्छुक इमारत मालकांनी विहित नमुन्यातील अर्ज ‘सहायक संचालक, इतर मागास बहुजन कल्याण, अमरावती, सामाजिक न्याय भवन, पोलीस आयुक्तालयाच्या मागे, चांदूर रेल्वे रोड, अमरावती’ या कार्यालयात सादर करावयाचे आहेत. या कार्यालयाचा ईमेल आयडी adobbwoamravati@gmail.com हा आहे.

बातमी प्रसिद्ध झाल्यापासून पुढील १५ दिवसांपर्यंत कार्यालयीन वेळेत हे अर्ज स्वीकारले जातील. अर्जाचा नमुना आणि इतर सर्व अटी व शर्तींची सविस्तर माहिती वरील कार्यालयात उपलब्ध आहे. समाजातील गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक सुविधेसाठी हक्काचे निवासस्थान उपलब्ध व्हावे, या उद्देशाने प्रशासनाने ही प्रक्रिया गतिमान केली आहे.0000

संबंधित पोस्ट

महाराष्ट्र राज्यात 25 वर्षे  वीज पुरवठा करण्याचे कंत्राट अदानी ग्रुपला…

vishwatmaklokswamivarta

प्रसिद्ध सरकारी वकील उज्वल निकम यांच्यासह शिक्षणतज्ज्ञ सी. सदानंदन ,माजी परराष्ट्र सचिव हर्षवर्धन श्रृंगला आणि प्रख्यात इतिहासकार मीनाक्षी जैन राज्यसभेवर नामनिर्देशित -चारही मान्यवरांना पंतप्रधान नरेंद्र मोदींनी शुभेच्छा दिल्या

vishwatmaklokswamivarta

सियाल इंडिया २०२५ मध्ये ‘उमेद’चा डंका ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्या प्रयत्नांमुळे ‘उमेद’ महिलांची उत्पादने जागतिक बाजारपेठेत पोहोचणार

विधानसभा सार्वत्रिक निवडणूक -2024-सार्वजनिक मालमत्‍ता विद्रुपीकरणास प्रतिबंध

vishwatmaklokswamivarta

कृषि विभागातर्फे शेतक-यांसाठी बाजारपेठ विक्री विषयी मार्गदर्शनासाठी शिबिराचे आयोजन*

माहीम नवरंग कंपाऊंड येथे लागली भीषण आग…

vishwatmaklokswamivarta