vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

शहीद बाळकृष्ण निकम यांच्या कुटुंबियांचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्याकडून सांत्वन शासनाकडून सर्वतोपरी मदतीचे आश्वासन

शहीद बाळकृष्ण निकम यांच्या कुटुंबियांचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्याकडून सांत्वन,शासनाकडून सर्वतोपरी मदतीचे आश्वासन

सातारा प्रतिनिधी: देशसेवा बजावताना वीरमरण आलेल्या पाटण तालुक्यातील पिंपळोशी येथील सुपुत्र शहीद जवान बाळकृष्ण विलास निकम यांच्या निवासस्थानी पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी सांत्वनपर भेट दिली. यावेळी त्यांनी निकम कुटुंबियांची आस्थेवाईकपणे चौकशी करून त्यांचे सांत्वन केले आणि शासन निकम कुटुंबीयांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे, असा विश्वासही दिला.

यावेळी प्रांताधिकारी सोपान टोणपे, तहसीलदार अनंत गुरव उपस्थित होते.या भेटीदरम्यान पालकमंत्री देसाई यांनी शहीद निकम यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. निकम यांनी देशाच्या रक्षणासाठी दिलेले बलिदान अमूल्य आहे.

निकम यांच्या बलिदानाची उणीव कधीही भरून काढता येणार नाही. मात्र, या कठीण प्रसंगात निकम कुटुंबियांना शासनामार्फत मिळणारी सर्व आर्थिक मदत आणि इतर लाभ तातडीने मिळवून देण्यासाठी प्रशासन युद्धपातळीवर काम करेल. शहीद जवानाच्या वारसांना सर्वतोपरी सहकार्य करणे हे आमचे कर्तव्य आहे, असेही पालकमंत्री देसाई यांनी भेटी प्रसंगी सांगितले.

पाटण तालुक्यातील पिंपळोशी गावचे सुपुत्र व भारतीय सैन्य दलातील १२० इंजिनिअरिंग रेजिमेंटचे जवान हवालदार बाळकृष्ण विलास निकम हे सिक्कीम मध्ये भारत- चीन सीमेवर ॲापरेशन स्नोलीओपर्ड अंतर्गत भारतमातेच्या रक्षणासाठी कर्तव्य बजावत असताना देशासाठी शहीद झाले.

संबंधित पोस्ट

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची गट-क अराजपत्रित सेवा मुख्य परीक्षा रविवारी (दि.21)2025

vishwatmaklokswamivarta

निकृष्ट दर्जाच्या सुपारीवर एफडीएची धडक कारवाई; ८६ लाखांचा साठा जप्त

१२ पराक्रम स्थळे युनेस्कोच्या व्यासपीठावर

प्रशिक्षणाच्या दुसऱ्या दिवशी स्व – संरक्षण प्रशिक्षणास विद्यार्थिंनींचा उत्स्फूर्त प्रतिसाद मुख्य प्रशिक्षक शिफूजी शौर्य भारद्वाज यांनी दिले दहा हजार विद्यार्थिंनींना आत्मनिर्भतेचे प्रशिक्षण

vishwatmaklokswamivarta

आरटीएल’मुळे विद्युत उद्योगांच्या विकासाला चालना मिळेल – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस शिलापूर येथील ‘सीपीआरआय’च्या प्रादेशिक तपासणी प्रयोगशाळेचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन

vishwatmaklokswamivarta

बा विठ्ठला… बळीराजाला सुखी व समाधानी ठेव, राज्यावरील संकटे दूर कर, सर्वांनाच सन्मार्गाने जगण्याची सुबुद्धी दे – मुख्यमंत्र्यांचे विठ्ठल चरणी साकडे आषाढी एकादशी निमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते विठ्ठल रुक्मिणीची महापूजा संपन्न