vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

मॅग्नेट प्रकल्प, कोल्हापूर अंतर्गत शेतकरी अभ्यासदौरा यशस्वीपणे संपन्न

मॅग्नेट प्रकल्प, कोल्हापूर अंतर्गत शेतकरी अभ्यासदौरा यशस्वीपणे संपन्न

सातारा प्रतिनिधी: महाराष्ट्र शासनाच्या सहकार व पणन विभागाअंतर्गत आशियायी विकास बँकेच्या अर्थसाहाय्याने महाराष्ट्र अ‍ॅग्रीबिझनेस नेटवर्क (MAGNET) प्रकल्प महाराष्ट्रात राबविण्यात येत आहे. प्रकल्पाच्या बाजार विकास व प्रोत्साहन या घटकाअंतर्गत शेतकरी अभ्यासदौरे व प्रक्षेत्र भेटी आयोजित करण्यात येत आहेत. त्यानुसार प्रकल्प अंमलबजावणी कक्ष, कोल्हापूर यांच्यामार्फत दि. 10 ते 12 मार्च 2026 या कालावधीत शेतकरी अभ्यासदौरा व प्रक्षेत्र भेटीचे आयोजन करण्यात आले होते.

सदर अभ्यासदौरा प्रकल्प संचालक श्री विनायक कोकरे, उपप्रकल्प संचालक डॉ. सुभाष घुले यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आला. सदर अभ्यासदौऱ्यात कोल्हापूर, सातारा आणि सांगली जिल्ह्य़ातील एकूण 32 शेतकऱ्यांनी सहभाग घेतला होता, त्यामध्ये 8 महिला व 24 पुरुष उपस्थित होते. अभ्यास दौऱ्यासाठी कृषी व्यवसाय तज्ञ अनिल जाधव आणि सत्यजित भोसले यांची अभ्यास दौरा समन्वय अधिकारी म्हणून नेमणूक करण्यात आली होती. कोल्हापूर विभागातील शेतकर्‍यांना शेतमाल प्रक्रिया आणि ब्रँडिंग बाबत सविस्तर माहिती मिळण्यासाठी अभ्यास दौरा आयोजित केलेला होता.

अभ्यास दौऱ्याच्या पहिल्या दिवशी वेंकटेश ॲग्रो प्रो.कं.लि., फलटण, के.बी. एक्सपोर्ट, फलटण तसेच पुरंदर हायलँड शेतकरी उत्पादक संस्था, सासवड या प्रक्रिया उद्योगांना भेट देऊन शेतकऱ्यांनी प्रक्रिया उद्योग, निर्यात संधी व मूल्यवर्धन याबाबत माहिती घेतली.

अभ्यासदौऱ्याच्या दुसऱ्या दिवशी महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळाच्या वाशी येथील निर्यात सुविधा केंद्राला भेट देण्यात आली. यामध्ये भाजीपाला प्रक्रिया केंद्र (VPF), विकिरण सुविधा केंद्र (IFC) तसेच व्हेपर हीट ट्रीटमेंट (VHT) सुविधा यांची माहिती शेतकऱ्यांना देण्यात आली. त्यानंतर अपेडा (APEDA), वाशी या संस्थेला भेट देऊन कृषी निर्यात प्रक्रियेविषयी मार्गदर्शन करण्यात आले.

अभ्यासदौऱ्याच्या तिसऱ्या दिवशी डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ, दापोली येथे प्रक्षेत्र भेट देण्यात आली. या भेटीदरम्यान विद्यापिठाचे कुलसचिव डॉ. संतोष सावर्डेकर यांच्या मार्गदर्शनाखाली आधुनिक शेती तंत्रज्ञान, फळबाग व्यवस्थापन व संशोधन कार्याची माहिती शेतकऱ्यांना देण्यात आली.

सदर शेतकरी अभ्यासदौरा यशस्वीरीत्या पार पडला असून या दौऱ्यामुळे शेतकऱ्यांना कृषी प्रक्रिया उद्योग, निर्यात सुविधा व आधुनिक शेती तंत्रज्ञानाबाबत प्रत्यक्ष माहिती मिळाली. या माध्यमातून शेतकऱ्यांना कृषी व्यवसायात मूल्यवर्धन व बाजारपेठ विस्तारासाठी नवीन दिशा मिळणार असल्याचा विश्वास उपप्रकल्प संचालक डॉ. सुभाष घुले यांनी व्यक्त केला.

0000

संबंधित पोस्ट

विधानसभेत नगर विकास, पाणी पुरवठा व गृहनिर्माण विभागाच्या पुरवणी मागण्या मान्य

vishwatmaklokswamivarta

दै. मराठवाडा साथी”चे संपादक सतिश बियाणी यांचे दुःखद निधन छत्रपती संभाजीनगर येथे आज अंत्यसंस्कार

vishwatmaklokswamivarta

दादर येथे आंदोलन काश्मीरमधील पर्यटकांच्या क्रूर हत्येचा तीव्र निषेध करत कठोर सैन्य कारवाईची मागणी !पहलगाममधील हिंदु पर्यटकांवरील जिहादी हल्ला, हा काश्मिरी हिंदूंच्या नरसंहाराचाच पुढचा भाग ! – हिंदु जनजागृती समिती

गॅस सिलेंडर डिलीव्हरी करणाऱ्या व्यक्तींनी अतिरिक्त पैसे मागितल्यास कारवाई करण्याचे निर्देश..

vishwatmaklokswamivarta

माय भारत योजना; नागरी संरक्षण स्वयंसेवक नोंदणी सुरु…

जिल्ह्यातील अकरा पंचायत समिती सभापती पदांचे आरक्षण जाहीर*