vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

शेतकरी शास्त्रज्ञ पुरस्कारासाठी जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी सहभाग नोंदवावा

शेतकरी शास्त्रज्ञ पुरस्कारासाठी जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी सहभाग नोंदवावा

रायगड-अलिबाग,द प्रतिनिधी:- डॉ.बाळासाहेब सावंत कोंकण कृषि विद्यापीठातर्फे येत्या 18 मे रोजी विद्यापीठ स्थापना दिनानिमित्त आयोजित शानदार कार्यक्रमात उत्तर व दक्षिण कोकण विभागातील एका नाविन्यपूर्ण शेतकऱ्यास शेतकरी शास्त्रज्ञ पुरस्काराने सन्मानित करण्याचे कुलगुरु डॉ. संजय भावे यानी जाहीर केले असून त्यासाठी पात्र शेतकन्यांनी विद्यापीठाच्या संबंधित संशोधन केंद्र किंवा कृषि विज्ञान केंद्र किंवा संचालक, विस्तार शिक्षण यांच्या कार्यालयाकडे सहभाग नोंदवावा, असे आवाहन विस्तार शिक्षण संचालक डॉ.राजेश ठोकळ यांनी केले आहे.

राज्याचे मुख्यमंत्री ना.देवेंद्र फडणवीस यांनी नुकत्याच झालेल्या संयुक्त कृषि संशोधन परिषदेत प्रयोगशील आणि उल्लेखनीय कार्य करणाऱ्या शेतकऱ्यांना शेतकरी शास्त्रज्ञ पुरस्कार देण्याची सूचना केली होती. त्याअनुषंगाने डॉ.बाळासाहेब सावंत कोंकण कृषि विद्यापीठाद्वारे येत्या 18 मे रोजी निवड झालेल्या शेतकऱ्याचा भव्य समारोहात सत्कार करण्यात येणार आहे.

जे शेतकरी वैज्ञानिक पध्दतीने शेतीचे व्यवस्थापन, सुधारित तंत्रज्ञानाचा वापर, विद्यापीठ शिफारसींचा अवलंब, नाविन्यपूर्ण उपक्रम राबवून ज्ञान प्रसाराच्या माध्यमातून कृषि व कृषि संलग्न क्षेत्रात लक्षणीय योगदान देतात, त्या शेतकऱ्यांचा या पुरस्कारासाठी विचार केला जाईल इच्छुक शेतकऱ्यांनी डॉ.बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाच्या वेबसाईटवर (dbskkv.org) उपलब्ध असलेला विहित नमुन्यातील फॉर्म डाऊनलोड करुन आवश्यक माहिती भरावी पात्र शेतकऱ्यांनी आपले जीवनवृत्त (बायोडेटा) नाविन्यपूर्ण उपक्रमाच्या माहिती आणि पुराव्यासह संबंधित जिल्ह्याच्या कृषि विज्ञान केंद्राचे समन्वयक यांच्याकडे किंवा रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्हयातील शेतकऱ्यांनी सहयोगी संशोधन संचालक, प्रादेशिक फळ संशोधन केंद्र, वेंगुर्ला, जि.सिंधुदुर्ग आणि रायगड, ठाणे, पालघर जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी सहयोगी संशोधन संचालक, प्रादेशिक कृषि संशोधन केंद्र, कर्जत जि.रायगड किंवा दोन्ही विभागातील पात्र शेतकऱ्यांनी संचालक विस्तार शिक्षण, विस्तार शिक्षण संचालनालय, डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषि विद्यापीठ, दापोली, जि. त्नागिरी याच्या कार्यालयाकडे दि.13 एप्रिल 2026 पर्यंत हार्ड कॉपीद्वारे पाठवावी. स्पर्धक शेतकऱ्यांकडून बायोडेटा प्राप्त झाल्यानंतर त्यांच्या कार्याची पाहणी एका समितीद्वारे होईल व सर्वोत्कृष्ट शेतकऱ्यांची निवड शेतकरी शास्त्रज्ञ पुरस्कारासाठी करण्यात येईल, तरी जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी यामध्ये सहभाग नोंदवावा, असे आवाहन विद्यापीठाद्वारे करण्यात आले आहे.

००००००

संबंधित पोस्ट

विशेष सहाय्य योजना लाभार्थ्यांना आधार अद्यावतीकरणाचे आवाहन

vishwatmaklokswamivarta

विश्वाला मार्गदर्शन करणारा भारत घडविण्यासाठी ‘वंदे मातरम्’चा संकल्प करूया – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मंत्रालयात सामूहिक ‘वंदे मातरम्’ गीताचे गायन

vishwatmaklokswamivarta

कॅन्सर रजिस्ट्री सुरू करणारी पहिली महानगरपालिका असल्याबद्दल नवी मुंबई महानगरपालिकेची आंतरराष्ट्रीय तज्ज्ञांकडून प्रशंसा…

vishwatmaklokswamivarta

भारतीय सशस्त्र दलात अधिकारी पदासाठी पूर्वप्रशिक्षणाची संधी,पूर्वतयारीसाठी २५ एप्रिल रोजी मुलाखतीस उपस्थित राहण्याचे आवाहन

लातूर जिल्ह्यात शिक्षक पात्रता परीक्षेच्या४१ परीक्षा केंद्रांवर प्रतिबंधात्मक आदेश लागू

परभणी जिल्ह्यातील यशवाडी येथील हनुमान मंदिरातील घटनेबाबत मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांनी तीव्र दु:ख व्यक्त केले असून, मृतांच्या कुटुंबीयांना 5 लाख रुपये आर्थिक मदत राज्य सरकारतर्फे देण्यात येईल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केले