vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

लातूर जिल्ह्यात शिक्षक पात्रता परीक्षेच्या४१ परीक्षा केंद्रांवर प्रतिबंधात्मक आदेश लागू

लातूर जिल्ह्यात शिक्षक पात्रता परीक्षेच्या४१ परीक्षा केंद्रांवर प्रतिबंधात्मक आदेश लागू

 

लातूर, प्रतिनिधी: महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत आयोजित करण्यात आलेली महाराष्ट्र राज्य शिक्षक पात्रता परीक्षा २०२६ (टीईटी) रविवार, २८ जून २०२६ रोजी लातूर जिल्ह्यातील एकूण ४१ परीक्षा केंद्रांवर पार पडणार आहे. ही परीक्षा सकाळी १०.३० ते दुपारी १ आणि दुपारी २.३० ते सायंकाळी ५ अशा दोन सत्रांमध्ये घेतली जाणार आहे. जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी डॉ. भारत बास्टेवाड यांनी या परीक्षा केंद्रांच्या परिसरात भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३ चे कलम १६३ अन्वये प्रतिबंधात्मक आदेश लागू करण्यात आले आहेत.

या आदेशानुसार परीक्षा केंद्राच्या परिसरात प्रवेश करतेवेळी पाच किंवा त्यापेक्षा जास्त व्यक्तींना एकत्रितरित्या प्रवेश करता येणार नाही, तसेच कोणत्याही प्रकारच्या घोषणा देण्यास सक्त मनाई असेल. परीक्षार्थी किंवा अन्य कोणत्याही व्यक्तीकडून शांततेस बाधा निर्माण होईल असे कृत्य करता येणार नाही. त्याचप्रमाणे परीक्षा केंद्राच्या शंभर मीटरच्या परिसरातील झेरॉक्स सेंटर्स, पानटपरी, टायपिंग सेंटर, एसटीडी बूथ आणि ध्वनिक्षेपक यांसारखी सर्व माध्यमे व व्यावसायिक आस्थापने आदेशाची मुदत संपेपर्यंत पूर्णपणे बंद राहतील. याशिवाय, परीक्षा केंद्राच्या परिसरात मोबाईल फोन, सेल्युलर फोन, ई-मेल व इतर कोणतीही इलेक्ट्रॉनिक प्रसारमाध्यमे घेऊन प्रवेश करण्यास सक्त मनाई करण्यात आली आहे.

परीक्षा शांततेच्या वातावरणामध्ये पार पाडण्यासाठी कोणतीही बाधा उत्पन्न करता येणार नाही. परीक्षा केंद्रावर कोणत्याही अनधिकृत व्यक्तीस किंवा वाहनास प्रवेश मनाई राहील. हे प्रतिबंधात्मक आदेश २८ जून २०२६ रोजी सकाळी ८ ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत लागू राहतील. मात्र, हे आदेश परीक्षा केंद्रावर काम करणारे अधिकारी, कर्मचारी, केंद्रावर निगराणी करणारे अधिकारी आणि पोलीस अधिकारी व कर्मचारी यांच्याबाबत त्यांचे परीक्षासंबंधी कर्तव्य पार पाडण्याच्या अनुषंगाने लागू राहणार नाहीत.

संबंधित पोस्ट

महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे घेणार विभागाचा आढावा नागरिकांसोबत साधणार संवाद..

vishwatmaklokswamivarta

मुंबई उपनगर ग्रंथोत्सवाचे पालकमंत्री ॲड. आशिष शेलार यांच्या हस्ते १२ फेब्रुवारीला उद्घाटन १२ व १३ फेब्रुवारीला ग्रंथदिडी, ग्रंथ प्रदर्शन, ग्रंथ विक्री, चर्चासत्र व मार्गदर्शन भरगच्च कार्यक्रमांचे आयोजन

vishwatmaklokswamivarta

शेतकऱ्यांनो, आत्महत्येचा मार्ग अवलंबू नका – आर्ट ऑफ लिव्हिंगचे संस्थापक श्री श्री रवीशंकर यांचे आवाहन

vishwatmaklokswamivarta

जवाहर नवोदय विद्यालयातील दहावीचा निकाल 100 टक्के

भारत महान प्रजासत्ताक राष्ट्र – पालकमंत्री मेघना बोर्डीकर प्रजासत्ताक दिनानिमित्त मुख्य शासकीय ध्वजवंदन समारंभ संपन्न

vishwatmaklokswamivarta

महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागांतर्गत सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या वतीने ‘सोमनाथ स्वाभिमान पर्व’ निमित्त विशेष सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन