vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

राहुरी विधानसभा मतदारसंघ पोटनिवडणूक २०२६ जिल्हास्तरीय आचारसंहिता कक्ष स्थापन

राहुरी विधानसभा मतदारसंघ पोटनिवडणूक २०२६ जिल्हास्तरीय आचारसंहिता कक्ष स्थापन

 

​अहिल्यानगर, प्रतिनिधी – २२३, राहुरी विधानसभा मतदारसंघ पोटनिवडणूक २०२६ ची अधिसूचना निवडणूक आयोगाकडून जाहीर करण्यात आली असून, निवडणुकीच्या प्रत्यक्ष कामास सुरुवात झाली आहे. या काळात आदर्श आचारसंहितेचे काटेकोर पालन व्हावे, यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हास्तरीय आचारसंहिता कक्ष स्थापन करण्यात आला आहे. आचारसंहितेच्या अंमलबजावणीबाबत काही तक्रारी अथवा सूचना असल्यास नागरिकांनी या कक्षाशी संपर्क साधावा, असे आवाहन कक्षाचे जिल्हा नोडल अधिकारी तथा अपर जिल्हाधिकारी शैलेश हिंगे यांनी केले आहे.

हा कक्ष जिल्हाधिकारी कार्यालयातील पाचव्या मजल्यावरील अभिप्राय कक्षात कार्यरत राहील. नागरिकांना आचारसंहितेबाबतच्या तक्रारी नोंदविण्यासाठी ०२४१-२९५४१७४ हा संपर्क क्रमांक उपलब्ध करून देण्यात आला आहे. तसेच, mccaly2024@gmail.com या ई-मेलवरही नागरिकांना आपल्या तक्रारी पाठविता येतील.

संबंधित पोस्ट

हिंद-की-चादर” कार्यक्रमानिमित्त नांदेड तालुक्यातील सर्व शैक्षणिक संस्थांना २४ जानेवारी रोजी #सुट्टी जाहीर       #परीक्षा सुरू असलेल्या ठिकाणी नियोजित वेळापत्रकानुसार सुरू राहतील

vishwatmaklokswamivarta

लडाखमध्ये भूकंपाचा धक्का! लेह परिसरात रिश्टर स्केलवर ५.५ तीव्रतेची नोंद..

सांघिक आपत्ती व्यवस्थापनासाठी यंत्रणा अलर्ट मोडवर

नोव्हेंबर महिन्यातील 8 निवृत्त नवी मुंबई महापालिका अधिकारी, कर्मचारी यांचा सन्मान…

vishwatmaklokswamivarta

विधानपरिषद प्रश्नोत्तरे :प्रत्येक जिल्ह्यात आदर्श वसतीगृह उभारणार वसतीगृहांसाठी १५०० कोटी रुपयांची तरतुद- सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट

मिशन लक्ष्यवेध अंतर्गत अथलेटिक्स निवडचाचणी १४ मे रोजी