vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्यास्थानिक बातम्या

नव्या मुंबईत 23 ते 25 मार्च रोजी नवी मुंबई महापौर चषक 40+ क्रिकेट स्पर्धेचे आयोजन

नव्या मुंबईत 23 ते 25 मार्च रोजी नवी मुंबई महापौर चषक 40+ क्रिकेट स्पर्धेचे आयोजन

 

   नवी मुंबई प्रतिनिधी-       नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने महापौर यांच्या पदनामाने विविध क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धांचे आयोजन करण्यात येते. या माध्यमातून खेळांना व खेळाडूंना प्रोत्साहन देण्याचे काम सातत्याने केले जात आहे. शहरातील 40+ वयोमान असलेल्या खेळाडूंना प्रोत्साहन मिळावे व शारीरिकदृष्ट्या तंदुरुस्त रहावे या हेतूने नवी मुंबई महापौर चषक 40+ क्रिकेट स्पर्धेचे आयोजन दि. 23 मार्च 2026 ते 25 मार्च 2026 या दरम्यान करण्यात आलेले आहेत.

          या स्पर्धेमध्ये 40 वर्षावरील वयोगटाचे नवी मुंबईतील 30 गावांतील 33 संघ व तसेच शहरी विभागातील 25 संघ सहभागी होणार आहेत. 40+ क्रिकेट स्पर्धेतील सामने दि. 23 मार्च 2026 रोजी सकाळी 9.30 ते 25 मार्च 2026 रोजी सायं. 5.00 वा. या कालावधीत महानगरपालिका मुख्यालयाजवळील मैदानावर होणार आहेत. या स्पर्धेतील विजयी व उपविजयी संघास आकर्षक चषक तसेच वैयक्तिक उत्तम कामगिरी करणा-या खेळाडूंना स्मृतीचिन्ह देवून गौरविण्यात येणार आहे.

          तरी या स्पर्धेतील संघाना प्रोत्साहन देणेकरिता नवी मुंबईतील क्रीडाप्रेमींनी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन क्रीडा व सांस्कृतिक कार्यक्रम समितीचे सभापती श्री. गिरीश म्हात्रे यांनी केलेले आहे.

संबंधित पोस्ट

गोरगरीबांना स्वस्तात घरे मिळण्यासाठी प्रयत्न करू  – पालकमंत्री चंद्रकांत पाटील

vishwatmaklokswamivarta

सांगली फळ महोत्सवात नऊ लाखांची उलाढाल – पणन अधिकारी ओंकार माने- शेतकऱ्यांनी मानले जिल्हाधिकारी अशोक काकडे, पणन विभागाचे आभार…

vishwatmaklokswamivarta

जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा व महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान विभागाचे ठाणे महानगरपालिका पार्किंग प्लाझा येथे स्थलांतर..

अर्थसंकल्पातील मंजूर निधी ओबीसी मंत्रालयाला तातडीने द्या ओबीसी मंत्रीमंडळ उपसमितीचे अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचे निर्देश

vishwatmaklokswamivarta

नुकसानग्रस्त भागाचे पंचनामे करून प्रस्ताव तातडीने शासनास सादर करा – मंत्री छगन भुजबळ बियाणे, खते शेतकऱ्यांना मुबलक उपलब्ध होण्यासाठी सुयोग्य नियोजन करा

vishwatmaklokswamivarta

गारपीटग्रस्त भागाची मंत्री गिरीश महाजन यांनी केली पाहणी; तात्काळ पंचनामा करून शासनास अहवाल सादर करण्याचे निर्देश