vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

गारपीटग्रस्त भागाची मंत्री गिरीश महाजन यांनी केली पाहणी; तात्काळ पंचनामा करून शासनास अहवाल सादर करण्याचे निर्देश

गारपीटग्रस्त भागाची मंत्री गिरीश महाजन यांनी केली पाहणी; तात्काळ पंचनामा करून शासनास अहवाल सादर करण्याचे निर्देश

नाशिक, प्रतिनिधी : नाशिक जिल्ह्यात दोन दिवसांपूर्वी झालेल्या अवकाळी गारपीटीमुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून, या पार्श्वभूमीवर राज्याचे आपत्ती व्यवस्थापन व जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी आज सिन्नर तालुक्यातील बाधित भागांची प्रत्यक्ष पाहणी केली.

मंत्री महाजन यांनी चिंचोली तसेच वडगाव पिंगळा या गावांमध्ये शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन नुकसानीची माहिती घेतली. चिंचोली येथे शेतकरी रमेश नागरे यांच्या कांदा पिकाची तसेच आनंदीबाई काशिनाथ कांगणे यांच्या बीट व कांदा पिकाची पाहणी केली. तर वडगाव पिंगळा येथे विठ्ठल सांगळे आणि कचरू गंधास यांच्या नुकसानग्रस्त शेती पीकांचीही त्यांनी पाहणी केली.    यावेळी मंत्री महाजन यांनी प्रशासनाला तात्काळ पंचनामे करून नुकसानीचा सविस्तर अहवाल शासनाकडे सादर करण्याचे निर्देश दिले. शेतकऱ्यांना लवकरात लवकर मदत मिळावी यासाठी शासन स्तरावर आवश्यक ती कार्यवाही करण्यात येईल, शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे. शेतकऱ्यांनी खचून जाऊ नये. त्यांना तातडीने नुकसानभरपाई मिळावी यासाठी प्रयत्नशील आहे,” असे आश्वासनही मंत्री महाजन यांनी यावेळी दिले.

यावेळी गारपीटीमुळे कांदा व इतर पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून, अनेक शेतकऱ्यांचे संपूर्ण पीक जमीनदोस्त झाले आहे. त्यामुळे सरसकट नुकसान भरपाई देण्याची मागणी उपस्थित शेतकऱ्यांनी मंत्री महाजन यांच्याकडे केली.

या पाहणी दौऱ्यात महापौर हिमगौरी आडके, माजी जिल्हा परिषद सदस्य संजय सानप, उदय सांगळे यांच्यासह महसूल, कृषी व आरोग्य विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

000000

संबंधित पोस्ट

शांतता व संयम पाळत धार्मिक सण साजरे करावेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे जनतेला आवाहन,कायदा हातात घेणाऱ्यांवर, पोलिसांना मारहाण करणाऱ्यांवर कठोर कारवाईचा इशारा…

जनतेची रेकॉर्डब्रेक उपस्थिती…  ‘विजयी संकल्प सभेमुळे’ संपूर्ण खरोळा नगरी झाली कमळमय…🪷

vishwatmaklokswamivarta

औरंगाबाद रेल्वे स्टेशन येथील लोहमार्ग पोलीस कर्मचाऱ्यांच्या सतर्कतेमुळे एका महिलाचे वाचवले प्राण.

vishwatmaklokswamivarta

पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते,महाराष्ट्र दिनी मुख्य शासकीय ध्वजारोहण

टीटीएफ २०२५ मध्ये महाराष्ट्र पर्यटन संचालनालयाचा सहभागमहाराष्ट्राचे दालन ठरले ‘सर्वोत्कृष्ट’

केंद्र सरकारच्या जीएसटीबाबतच्या ऐतिहासिक निर्णयामुळे सर्वसामान्य माणसाचे जीवनमान सुलभ होईल उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा विश्वास…

vishwatmaklokswamivarta