vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

नांदेड जिल्हा परिषदेचे विद्यार्थी ईस्त्रो सहलीसाठी रवाना

नांदेड जिल्हा परिषदेचे विद्यार्थी ईस्त्रो सहलीसाठी रवाना

नांदेड प्रतिनिधी:– नांदेड जिल्ह्यातल्या जिल्हा परिषद शाळेतील हुशार गुणवंत होतकरू अशा गरीब कष्टकरी शेतकरी शेतमजूर यांच्या मुलांना विज्ञान तंत्रज्ञान याविषयी आवड निर्माण व्हावी, जिल्हा परिषद शाळांचा पट वाढावा विद्यार्थ्यांच्या बुद्धिमत्तेला चालना मिळावी अशा विविध हेतूने नांदेड जिल्हा परिषदेच्या वतीने जिल्ह्यातील ६७ विद्यार्थ्यांना इसरो शैक्षणिक सहलीसाठी विद्यार्थी आज सकाळी बेंगलोर एक्सप्रेस ने रवाना झाले.

छत्रपती संभाजी नगरचे विभागीय आयुक्त पापळकर यांच्या संकल्पनेतून नांदेडचे जिल्हाधिकारी राहूल कर्डिले यांच्या समर्थ प्रोत्साहनातून तथा नांदेड जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मेघना कावली यांच्या प्रेरणेतून आणि संदीप माळोदे अतीरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी, राजकुमार मुक्कावार उपमुख्य कार्यकारी अधिकारी, लातूर विभागीय शिक्षण उपसंचालक दीपक चवणे,यांच्या मार्गदर्शनाखाली शिक्षणाधिकारी प्राथमिक वंदना फुटाणे, शिक्षणाधिकारी माध्यमिक माधव सलगर, शिक्षणाधिकारी योजना दिलीप बनसोडे जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था हिंगोली येथील ज्येष्ठ अधिव्याख्याता सौ जयश्री आठवले ,डॉ. दादाराव सिरसाट, गणेश शिंदे यांच्या नियोजनातून जिल्हा परिषद शाळेच्या 67 विद्यार्थ्यांची सहल आज 22 मार्च 2026 रोजी भारतीय अवकाश संस्था इस्रो ,विश्वेश्वरय्या म्युझियमला भेट देण्यासाठी त्या ठिकाणी असलेल्या विज्ञान तंत्रज्ञानाच्या अभूतपूर्व संगमाचा अनुभव घेण्यासाठी नांदेड रेल्वे स्टेशन येथून मेघना कावली यांच्या शुभ हस्ते हिरवी झेंडी दाखवून वरील मान्यवरांच्या प्रमुख उपस्थिती मध्ये रवाना झाली.

 यावेळी बोलताना मुख्य कार्यकारी अधिकारी मेघना कावली म्हणाल्या की, जिल्हा परिषद शाळेतील मुलांना अंतराळ स्पेस सेंटरची कार्यप्रणाली, अभियांत्रिकी,विज्ञान तंत्रज्ञानावर आधारित म्युझियम निरीक्षण व त्यातून गणित विज्ञान विषयांमध्ये त्यांची रुची वाढावी, केरळ राज्याची ओळख तेथिल स्वच्छता,भाषा, वाहतुकीचे नियम, जमले तर शाळा भेट भविष्यात यांच्या मधूनच भारतीय अंतराळ संशोधन शास्त्रज्ञ निर्माण व्हावेत, विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन निर्माण होण्यासाठी ही भेट सहाय्यभूत ठरेल. असे वेगवेगळे अनुभव विद्यार्थ्यांना देण्यासाठी नांदेड जिल्हा परिषदेने या सहलीचे आयोजन केलेले आहे. जिल्ह्यातील फक्त जिल्हा परिषद शाळेच्या मुलांसाठीच अशा राज्याबाहेरील शैक्षणिक अभ्यास सहलींच आयोजन केल्या जाते.

विद्यार्थ्यांसोबत ज्येष्ठ शिक्षण विस्तार अधिकारी तथा शैक्षणिक अभ्यास दौरा प्रमुख प्रविणा मांदळे, जेष्ठ शिक्षण विस्तार अधिकारी सुनिल मुत्तेपवार मु.अ.,प्रलोभ कुलकर्णी मुख्याध्यापक जि.प.हा.पेनुर, बालाजी पाम्पटवार स.शि., सौ.सारिका आचमे स.शि., संतोष देशमुख स.शि, सौ.मनिषा पांचाळ मॅडम, प्रवीण सूर्यवंशी स. शि.,शेख शोहेब स.शि.,आकाश गाडगेराव ,मोतीराम माने स.शि. आदी विद्यार्थ्यांच्या सोबत त्यांची काळजी घेण्यासाठी व त्यांना वरील प्रेक्षणीय स्थळे वैज्ञानिक स्थळे दाखवण्यासाठी सोबत गेले आहेत.

०००००

संबंधित पोस्ट

थोर समाजसुधारक, क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या पैतृक गावी खानवडी, पुणे येथे त्यांच्या जयंतीनिमित्त क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले आणि क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या स्मारकास पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

यशेादा पॉलिटेक्निक कॉलेज सातारा येथे कायदेशीर जनजागृती कार्यक्रम संपन्न

राज्यात ठीक ठिकाणी पावसाच्या सरी सुरूच आहे#रायगड आज सकाळी ०६:०० वाजता जारी मध्यम वज्रवृष्टी व धक्क्याने वारे ४१-६१ किमी/तास जोरदार पाऊस > १५ मिमी/तास वैध वेळ: ०९:०० वाजेपर्यंत कृपया सावध रहा व सुरक्षित रहा!

vishwatmaklokswamivarta

कृषि क्षेत्रात कृत्रिम बुध्दिमत्ता वापर प्रोत्साहन योजनेचे अर्ज पंचायत समितीत उपलब्ध    – कृषि विकास अधिकारी मनोजकुमार वेताळ

vishwatmaklokswamivarta

वर्ल्डवन एनर्जी कंपनीच्या माध्यमातून ऊर्जा क्षेत्रात उत्तम परिसंस्था निर्माण होईल – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उमरेड येथे सौर व हरित हायड्रोजन ऊर्जा प्रकल्पांचे उद्घाटन

अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाच्या योजनांसाठीसी.एस.सी. केंद्रातून मिळणार माफक दरात सेवा- व्यवस्थापकीय संचालक विजयसिंह देशमुख

vishwatmaklokswamivarta