vishwatmaklokswamivarta
Breaking News
आरोग्य

“स्त्री भ्रूण हत्या रोखण्यासाठी गर्भधारणा पूर्व व प्रसूतीपूर्व निदान तंत्र (पीसीपीएनडीटी) कायद्याची प्रभावी अंमलबजावणी गरजेची”**जिल्हा महिला व बाल रुग्णालय, गडचिरोली येथे एक दिवसीय कार्यशाळा उत्साहात संपन्न*

*“स्त्री भ्रूण हत्या रोखण्यासाठी गर्भधारणा पूर्व व प्रसूतीपूर्व निदान तंत्र (पीसीपीएनडीटी) कायद्याची प्रभावी अंमलबजावणी गरजेची”**जिल्हा महिला व बाल रुग्णालय, गडचिरोली येथे एक दिवसीय कार्यशाळा उत्साहात संपन्न*

 

गडचिरोली, आरोग्य प्रतिनिधी: स्त्री-भ्रूण हत्या रोखणे, जनजागृती वाढविणे व संबंधित कायद्यांची प्रभावी अंमलबजावणी सुनिश्चित करण्याच्या उद्देशाने जिल्हा महिला व बाल रुग्णालय, गडचिरोली येथे गर्भधारणा पूर्व व प्रसूतीपूर्व निदान तंत्र (पीसीपीएनडीटी) कायद्याविषयी एक दिवसीय कार्यशाळा उत्साहात व यशस्वीरीत्या पार पडली.

या कार्यशाळेमध्ये स्त्री भ्रूण हत्या प्रतिबंध, लिंग गुणोत्तराचे सामाजिक महत्त्व, पीसीपीएनडीटी कायद्याच्या तरतुदी व त्याची अंमलबजावणी यावर सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. तसेच गर्भपात (वैद्यकीय समाप्ती) कायदा, सहाय्यित प्रजनन तंत्रज्ञान कायदा आणि सरोगसी (प्रतिनिधी मातृत्व) कायदा याबाबतही उपस्थितांना सखोल माहिती देण्यात आली. संबंधित कायद्यांचे उल्लंघन झाल्यास होणाऱ्या दंडात्मक कारवाईबाबतही स्पष्ट मार्गदर्शन करण्यात आले.

कार्यक्रमास प्रमुख उपस्थिती म्हणून मा. श्री. ए.पी. खानोरकर (सचिव, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, गडचिरोली), डॉ. संतोष कोकुडे (अति. जिल्हा आरोग्य अधिकारी) तसेच सामाजिक कार्यकर्त्या श्रीमती सविता गोविंदवार उपस्थित होत्या. आपल्या मार्गदर्शनात त्यांनी पीसीपीएनडीटी कायद्याचे सामाजिक व कायदेशीर महत्त्व अधोरेखित करत स्त्री भ्रूण हत्या ही गंभीर सामाजिक समस्या असून तिच्या निर्मूलनासाठी सर्वांनी एकत्रित प्रयत्न करण्याची गरज व्यक्त केली.

यावेळी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. वर्षा लहाडे यांनी गर्भपात (वैद्यकीय समाप्ती) कायदा, सहाय्यित प्रजनन तंत्रज्ञान कायदा व सरोगसी कायदा संदर्भात सविस्तर माहिती देत वैद्यकीय अधिकारी व संबंधित संस्थांनी कायद्याचे काटेकोर पालन करताना घ्यावयाच्या बाबी स्पष्ट केल्या.

कार्यशाळेत डॉ. छाया उईके (अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक), डॉ. प्रशांत पेंदाम (बालरोगतज्ञ), डॉ. नीलकंठ मसराम (नोडल अधिकारी पीसीपीएनडीटी तसेच क्ष-किरण तज्ञ), डॉ. प्रशांत आखाडे (स्त्रीरोग तज्ञ), अॅड. तृप्ती राऊत (विधी सल्लागार), श्रीमती प्रतिज्ञा रामटेके (सार्वजनिक आरोग्य परिचारिका) यांच्यासह विविध विभागांतील अधिकारी व कर्मचारी, आशा स्वयंसेविका, सामाजिक कार्यकर्ते, जिल्हा सल्लागार समिती सदस्य तसेच खाजगी सोनोग्राफी केंद्र चालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कार्यशाळेदरम्यान पीसीपीएनडीटी कायद्याच्या अंमलबजावणीतील महत्त्वाचे मुद्दे, नोंदवही व नोंदणी प्रक्रिया, तपासणीदरम्यान घ्यावयाची खबरदारी तसेच गैरप्रकार रोखण्यासाठी आवश्यक उपाययोजना याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. यामुळे वैद्यकीय व्यावसायिकांमध्ये कायद्याबाबत जागरूकता वाढण्यास मदत झाली.कार्यक्रमाच्या शेवटी सर्व उपस्थितांनी पीसीपीएनडीटी कायद्याची शपथ घेत स्त्री भ्रूण हत्या रोखण्यासाठी तसेच लिंग समतोल राखण्यासाठी कटिबद्ध राहण्याचा संकल्प केला.

संबंधित पोस्ट

क्षय आरोग्य धाम येथे जागतिक क्षयरोग दिन साजरा; तज्ज्ञांव्दारे क्षयरुग्णांना मार्गदर्शन

भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती महोत्सव विद्यापीठाच्या सेवेत ’रुग्णवाहिका’दाखल

राज्यात ‘स्वस्थ नारी, सशक्त परिवार’ अभियानाला उत्स्फूर्त प्रतिसाद· १ कोटीहून अधिक नागरिक लाभार्थी ७५ लाख ८७ हजार पेक्षा जास्त महिलांची तपासणी….

vishwatmaklokswamivarta

आयआयटी मुंबईचे प्राध्यापक डॉ. राहुल पुरवार यांनाही राष्ट्रपती कार्यालयाकडून प्रजासत्ताक दिन सोहळयाचं निमंत्रण. 

vishwatmaklokswamivarta

समुपदेशनाने होणार समुदाय आरोग्य अधिकाऱ्यांची विनंती बदली.* मा. आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर

मुख्यमंत्री सहायता कक्षातून 24 तासात होते मदत उपलब्ध रुग्णांच्या नातेवाईकांच्या प्रतिक्रिया…