vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

शहीद दिनानिमित्त मेरा युवा भारत,युवा कार्यक्रम खेळ मंत्रालय  भारत सरकार यांच्या वतीने पदयात्रा संपन्न

शहीद दिनानिमित्त मेरा युवा भारत,युवा कार्यक्रम खेळ मंत्रालय

भारत सरकार यांच्या वतीने पदयात्रा संपन्न

रायगड-अलिबाग प्रतिनिधी:- भारतात दरवर्षी 23 मार्च रोजी शहीद दिन साजरा केला जातो 1931 मध्ये याच दिवशी भगतसिंग सुखदेव आणि राजगुरू या तीन थोर क्रांतिकारकांना लाहोर जेलमध्ये ब्रिटिश सरकारने फाशी दिली होती त्यांनी देशाला स्वतंत्र करण्यासाठी दिलेल्या त्याबद्दल हा दिवस साजरा केला जातो. तरुणांमध्ये देश प्रेमाची भावना जागृत करण्याकरिता तसेच क्रांतिकारकांचे बलिदान स्मरणात ठेवणे आणि त्यांच्या त्यागाला अभिवादन करणे याकरिता मेरा युवा भारत, युवा कार्यक्रम एवं खेळ मंत्रालय, भारत सरकार, रायगड अलिबाग व प्रिझम सामाजिक विकास संस्था अलिबाग यांच्या संयुक्त विद्यमाने व स्पर्धा विश्व अकॅडमी अलिबाग यांच्या सहकार्याने व अमित पुंडे जिल्हा युवा अधिकारी मेरा युवा भारत रायगड अलिबाग यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली तसेच राष्ट्रीय युवा पुरस्कारार्थी भारत सरकार तपस्वी गोंधळी यांच्या प्रमुख नेतृत्वाखाली पदयात्रेचे आयोजन अलिबाग मध्ये केले होते. यावेळी भारत माता की, जय, शहीद जवान,अमर रहे, वंदे मातरम, या घोषणांचा जयघोष करण्यात आला. पदयात्रेत स्पर्धा विश्व अकॅडमीच्या संचालिका तथा स्वयंसिद्धा संस्थेच्या अध्यक्षा सुचिता साळवी, स्पर्धा विश्व अकॅडमीचे युवक- युवती, ग्रामस्थ सहभागी झाले होते.

000000

संबंधित पोस्ट

प्रशासनाच्या तत्पर मदतकार्यामुळे जिल्ह्यातील २२७ पूरग्रस्तांची सुटका पाथर्डी, शेवगांव, जामखेड व अहिल्यानगर तालुक्यात पूरपरिस्थिती; नागरिकांना सतर्कतेचा इशारा, मदतीसाठी प्रशासन तत्पर !

vishwatmaklokswamivarta

शाळांमध्ये पायाभूत सोयी-सुविधा पुरविण्यासाठी अनुदान योजनेचे प्रस्ताव सादर करण्यास मुदतवाढ

vishwatmaklokswamivarta

साखर कारखान्यांनी लाभधारकांची पाणीपट्टी जमा करावी- कार्यकारी अभियंता रा. य. रेड्डीयार

vishwatmaklokswamivarta

अभिमानाचा क्षण! 🇮🇳बुलढाणा जिल्ह्याचा सुपुत्र, सिंदखेड राजा तालुक्यातील सवडद येथील हवालदार संतोष मोरे यांना ‘ऑपरेशन सिंदूर’मध्ये दाखविलेल्या अतुलनीय शौर्याबद्दल ‘शौर्य पदक’ प्रदान

लातूर तालुक्यात अवैध गौण खनिज उत्खनन आणि  वाहतुकीवर महसूल विभागाची कारवाई

जिल्हास्तरीय चाचा नेहरु  बाल महोत्सवाला उत्साहात सुरुवात …       

vishwatmaklokswamivarta