vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

राज्यात पीएनजी प्रक्रियेला गती; खत उपलब्धतेसाठी सातत्याने आढावा सुरू – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस केंद्राच्या प्रभावी नेतृत्वामुळे संकटातही देश स्थिर; महाराष्ट्र शासन केंद्राच्या सूचनांचे पूर्णपणे पालन करेल

राज्यात पीएनजी प्रक्रियेला गती; खत उपलब्धतेसाठी सातत्याने आढावा सुरू – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

केंद्राच्या प्रभावी नेतृत्वामुळे संकटातही देश स्थिर; महाराष्ट्र शासन केंद्राच्या सूचनांचे पूर्णपणे पालन करेल

मुंबई, प्रतिनिधी : जागतिक स्तरावर निर्माण झालेल्या संकटाच्या पार्श्वभूमीवर भारताने संतुलित आणि प्रभावी धोरण राबवले असून, यामध्ये प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारची महत्त्वाची भूमिका आहे, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. केंद्र शासनाच्या निर्देशानुसार या संकटकाळात महाराष्ट्रात पीएनजी (पाईप्ड पद्धतीने वितरण) वितरणाला गती देण्यात येत असून खतांच्या उपलब्धतेसाठी सातत्याने आढावा घेतला जात असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित विविध राज्यांच्या मुख्यमंत्र्यांची बैठक दूरदृश्य प्रणालीद्वारे घेण्यात आली. या बैठकीत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेही सहभागी झाले होते. त्यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी महाराष्ट्राच्या वतीने मुद्दे मांडले. यावेळी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, केंद्रीय मंत्रिमंडळ सचिव तसेच विविध राज्यांचे मुख्यमंत्री आणि केंद्रशासित प्रदेशांचे नायब राज्यपाल उपस्थित होते. मुख्य सचिव राजेश अग्रवाल, मुख्यमंत्री यांचे प्रधान सचिव डॉ.श्रीकर परदेशी या बैठकीला उपस्थित होते.

 

सध्याच्या कठीण काळात पश्चिम आशिया खंडातील युद्ध परिस्थितीमुळे निर्माण झालेल्या जागतिक संकट काळात देशातील नागरिकांवर प्रतिकूल परिणाम होऊ नये, यासाठी घेतलेल्या निर्णयांबद्दल मुख्यमंत्री फडणवीस यांनी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचे आभार मानले.

सध्याच्या काळात महाराष्ट्र शासनाने राबविलेल्या उपाययोजनांची माहिती देताना मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, राज्यात खतांची पुरेशी उपलब्धता असून त्याचा सातत्याने आढावा घेतला जात आहे. आगामी खरीप हंगामात शेतकऱ्यांना कोणतीही अडचण येणार नाही, यासाठी आवश्यक ती खबरदारी घेतली जात आहे. याचबरोबर काळाबाजार व साठेबाजी रोखण्यासाठी कठोर कारवाई करण्यात येत आहे. शेतीशी संबंधित बाबी ‘अ‍ॅग्रीस्टॅक’ प्रणालीशी जोडण्याचे काम सुरू असून त्यामुळे गैरप्रकारांना आळा बसणार आहे. परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवण्यासाठी सातत्याने बैठका घेतल्या जात असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

केंद्र सरकारच्या सर्व सूचनांचे राज्य शासन पूर्णपणे पालन करेल, असे सांगून मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, पीएनजी (पाईप्ड नॅचरल गॅस) वितरणाला गती देण्यात आली असून ‘ईज ऑफ डुइंग बिझनेस’च्या माध्यमातून प्रक्रिया सुलभ केली जात आहे. या संकटाकाळात केंद्र शासनाच्या नेतृत्वाखाली राज्य शासन आपली जबाबदारी प्रभावीपणे पार पाडेल, असा विश्वासही यांनी व्यक्त केला

 

संबंधित पोस्ट

राष्ट्रीय लोकअदालतीमध्ये #नांदेड जिल्ह्यात ६ हजार १९९ प्रकरणे निकाली, ३८ कोटींची तडजोड

*राष्ट्रीय लोक अदालतीत १७ हजार ९२० प्रकरणांचा निपटारा**६१ कोटी १३ लाख रुपयांची तडजोड रक्कम वसूल*

vishwatmaklokswamivarta

हज गट आयोजक HGOs/PTOs मार्फत हज 2026 साठी नोंदणी करणाऱ्या यात्रेकरूंसाठी मार्गदर्शक सूचना उरलेल्या सर्व औपचारिकता पूर्ण करण्यासाठी अंतिम मुदत 25 जानेवारी 2026 पर्यंत

vishwatmaklokswamivarta

राज्य विधिमंडळाचं हिवाळी अधिवेशन, उद्यापासून नागपूरमध्ये , अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला मुख्यमंत्र्यांकडून चहापानाचं आयोजन. 

vishwatmaklokswamivarta

कसनसूर फळ रोपवाटिका बनणार आदर्श केंद्र – जिल्हा अधीक्षक कृषी अधिकाऱ्यांचा आढावा दुर्गम भागातही फळबाग हब साकारण्याचा प्रयत्न, जिल्हा प्रशासनाचा पुढाकार..

मेळघाटातील शेवटच्या टोकापर्यंत पोहोचत आहेत शासनाच्या योजना,धारणी तहसील कार्यालयातर्फे छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिराचे आयोजन,शासन आपल्या दारी संकल्पना साकार; धुळघाटरोड येथे महसूल समाधान शिबिर

vishwatmaklokswamivarta