vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

जिल्हा परिषद विषय समिती सभापती निवड;गुरुवारी (दि.२ एप्रिल) विशेष सभा

जिल्हा परिषद विषय समिती सभापती निवड;गुरुवारी (दि.२ एप्रिल) विशेष सभा

 

छत्रपती संभाजीनगर प्रतिनिधी- जिल्हा परिषद विषय समिती सभापती निवड करण्यासाठी गुरुवार दि.२ एप्रिल रोजी विशेष सभेचे आयोजन करण्यात आले आहे. ही सभा जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नियोजन सभागृहात दुपारी २ वा. होणार आहे. निवड प्रक्रिया सकाळि १० वा. पासून सुरु होणार आहे,असे या सभेचे पिठासीन अधिकारी संतोष गोरड यांनी कळविले आहे.

पिठासीन अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी कन्नड संतोष गोरड यांनी दिलेल्या माहितीनुसार, गुरुवार दि.२ एप्रिल रोज ही विशेष सभा जिल्हाधिकारी कार्यलयातील नियोजन सभागृहात होणार आहे.

या विशेष सभेचा कार्यक्रम याप्रमाणे- गुरुवार दि.२ एप्रिल रोजी सकाळी १० ते १२ या वेळात नामनिर्देशन स्विकारणे, दुपारी २ वा. विशेष सभेस सुरुवात. प्रथम प्राप्त नामनिर्देशन पत्रांची छाननी, त्यानंतर नामनिर्देशन माघारीसाठी वेळ दिला जाईल. त्यानंतर निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांची यादी मराठी वर्णक्रमानुसार करण्यात येईल. त्यानंतर समिती सभापती निवडणूकीसाठी एकापेक्षा जास्त उमेदवार असल्यास हात वर करुन मतदान घेण्यात येईल.

या विशेष सभेसाठी उपस्थित राहण्यासाठी जिल्ह्यातील सर्व पंचायत समिती सभापती यांना कळविण्यात आले आहे. तथापि, सभापतींना अध्यक्ष/ उपाध्यक्ष निवडीसाठी मतदान करता येणार नाही. हात वर करुन मतदान करणाऱ्या सदस्याची स्वाक्षरी घेऊन नोंद घेण्यात येईल. या संपूर्ण प्रक्रियेचे व्हिडीओ चित्रीकरण करण्यात येईल. या सभेसाठी नवनिर्वाचित एकूण ६३ जिल्हा परिषद सदस्य व ९ पंचायत समिती सभापती यांना बैठकीसाठी बोलावण्यात आले आहे,असेही पिठासीन अधिकारी संतोष गोरड यांनी कळविले आहे.

०००००

संबंधित पोस्ट

येत्या पाच वर्षात ‘जीएसडीपी’ ३५ लाख कोटींवर नेण्याचे ध्येय – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ‘महा स्ट्राइड’ उपक्रमाचा शुभारंभ; ‘मित्र’ राज्याच्या विकासाला दिशा देणारी महत्त्वपूर्ण संस्था म्हणून नावारूपास येईल

vishwatmaklokswamivarta

पॅलियेटिव्ह केअर कार्यक्रम’ आरोग्यसंपन्न महाराष्ट्रासाठी आणखी एक पाऊल; राज्यात कार्यक्रम प्रभावीपणे राबवावा – सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर पॅलियेटिव्ह केअर कार्यक्रम शुभारंभ व मेनोपॉज क्लिनिकचे राज्यस्तरीय लोकार्पण

आताची मोठी बातमी – धारावी बस डेपो जवळ गैस सिलेंडरच्या ट्रक मध्ये लागली आहे भीषण आग…

भारतीय सशस्त्र सैन्यदलात अधिकारी पदासाठी नवयुवक व नवयुवतींना मोफत प्रशिक्षणाची संधी

सामाजिक समता सप्ताह निमित्तअंधश्रद्धा, जादूटोणा विषयी जनजागृती..

छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियानांतर्गत “सेवा पंधरवाडा” प्रभावीपणे राबवा- विभागीय आयुक्त जितेंद्र पापळकर नियोजनाबाबत विभागाचा आढावा

vishwatmaklokswamivarta