vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

सातारा-लातूर व सातारा-पंढरपूर महामार्गाची अर्धवट कामे प्राधान्याने पूर्ण करा     – ग्रामविकास व पंचायतराज मंत्री जयकुमार गोरे

सातारा-लातूर व सातारा-पंढरपूर महामार्गाची अर्धवट कामे प्राधान्याने पूर्ण करा     – ग्रामविकास व पंचायतराज मंत्री जयकुमार गोरे

सातारा प्रतिनिधी : सातारा ते लातूर व सातारा ते पंढरपूर महामार्गाचे काही ठिकाणी अर्धवट काम राहिले आहे. यामुळे अपघात होऊन नागरिक जखमी होत आहेत. ही गंभीर बाबा असून रस्ते विकास महामंडळाने अर्धवट कामे प्राधान्याने पूर्ण करावेत, असे निर्देश ग्रामविकास व पंचायतराज मंत्री जयकुमार गोरे यांनी दिले.

जिल्हाधिकारी कार्यालयात सातारा ते लातूर व सातारा ते पंढरपूर महामार्गाविषयी बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीला जिल्हाधिकारी संतोष पाटील, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता श्रीपाद जाधव यांच्यासह रस्ते विकास महामंडळाचे अधिकारी उपस्थित होते.

मौजे धुळदेव ता. माण येथील अर्धवट रस्त्याच्या कामामुळे मोठ्या प्रमाणत या ठिकाणी अपघात होत आहेत. हा रस्ता तातडीने पूर्ण करावा, अशा सूचना करुन ग्रामविकास मंत्री श्री. गोरे म्हणाले, दिवड हद्दीत पुलाचे काम अर्धवट असून काम पूर्ण होईपर्यंत येथील रस्त्यावर डांबरीकरण करावे. मौजे पळशी येथील 50 मिटर रस्ता अर्धवट असून या ठिकाणी डांबरीकरण करावे.

मौजे गोंदवले ब्रु. येथील ब्रम्हचैतन्य मंदिर ते शेतकरी भवन या ठिकाणी नियमापेक्षा उंच गतीरोधक केले आहेत ते काढून शासकीय निकषा प्रमाणे गतीरोधक तयार करावा. चिमणगाव ता. कोरेगाव येथील 30 मीटर रस्ता अपूर्ण आहे तो तातडीने पूर्ण करावा. तसेच सोलापूर जिल्ह्यातील मौजे पिलीव ते पंढरपूर या रस्त्याच्या अर्धवट कामाच्या ठिकाणी डांबरीकरण करावे, असे निर्देशही ग्रामविकास मंत्री श्री. गोरे यांनी दिले.

0000

संबंधित पोस्ट

अफगाणिस्तानच्या हिंदुकुश पर्वतरांगेत नुकत्याच झालेल्या ६.० किंवा ६.३ रिश्टर स्केलच्या भूकंपामुळे अनेक घरे कोसळली असून, या भूकंपाच्या धक्क्यांमुळे किमान ८०० लोकांचा मृत्यू झाला आहे आणि अंदाजे २५०० हून अधिक लोक जखमी

vishwatmaklokswamivarta

शिक्षणाधिकार्‍यांच्या हस्ते विद्यार्थिनीचा गुणगौरव

अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर शासन प्रशासन नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी तत्पर…**नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आणि शासकीय सूचनांचे पालन करण्याचे प्रशासनाचे आवाहन*

vishwatmaklokswamivarta

योग दिनानिमित्त योग सत्रांबरोबरच वृक्षारोपण,स्वच्छता मोहीम व पर्यावरणीय उपक्रम राबविण्यात येणार,सर्व ग्राम आरोग्य पोषण पाणी पुरवठा व स्वच्छता समित्यांचे सहकार्य घेण्यात येणार  — मुख्य कार्यकारी अधिकारी नेहा भोसले     

मोताळा शासकिय औद्यागिक प्रशिक्षण संस्थामध्ये शिव राज्यभिषेक दिवसाचे आयोजन

मुंबईतील सर्व सरकारी कार्यालयांना सुट्टी जाहीर! Private ऑफिस कर्मचाऱ्यांनाही मोठा दिलासा