vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

मतमोजणी प्रक्रिया अचूक, पारदर्शक व शांततेत पार पाडावी – विभागीय आयुक्त जी. श्रीकांत

मतमोजणी प्रक्रिया अचूक, पारदर्शक व शांततेत पार पाडावी – विभागीय आयुक्त जी. श्रीकांत

छत्रपती संभाजीनगर, प्रतिनिधी – औरंगाबाद विभाग पदवीधर मतदारसंघाची निवडणूक २०२६ ची मतमोजणी प्रक्रिया अचूक, पारदर्शक व शांततेत पार पाडण्यासाठी सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांनी समन्वयाने आणि सांघिक भावनेने काम करावे. प्रत्येकाने आपली जबाबदारी योग्य प्रकारे पार पाडावी, असे निर्देश विभागीय आयुक्त तथा निवडणूक निर्णय अधिकारी जी. श्रीकांत यांनी दिले.

पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीच्या अनुषंगाने आज वंदे मातरम् सभागृहात मतमोजणीसाठी नियुक्त अधिकारी व कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण आयोजित करण्यात आले होते.

यावेळी विभागीय आयुक्त जी. श्रीकांत, जिल्हाधिकारी विजय गौंडा जी.सी., जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मिन्नू पी.एम., महानगरपालिका आयुक्त अमोल येडगे यांच्यासह मराठवाडा विभागातील सर्व जिल्हाधिकारी, जिल्हा परिषदांचे मुख्य कार्यकारी अधिकारी, उपविभागीय अधिकारी तसेच निवडणूक प्रक्रियेशी संबंधित अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. औरंगाबाद पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत ४१ उमेदवार रिंगणात असून, विभागात एकूण ८४२ मतदान केंद्रे आहेत. मतमोजणीसाठी सुमारे ५०० अधिकारी व कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

विभागीय आयुक्त जी. श्रीकांत म्हणाले की, मतमोजणी प्रक्रियेत सहभागी होणारे प्रत्येक अधिकारी व कर्मचारी सक्षम असून, सर्वांनी आपली जबाबदारी चोखपणे पार पाडावी. मतमोजणीदरम्यान निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक सूचनांचे काटेकोरपणे पालन करावे. मतमोजणी प्रक्रियेत कोणत्याही प्रकारची त्रुटी राहणार नाही, याची दक्षता घ्यावी. अधिकारी व कर्मचाऱ्यांमधील समन्वय आणि सांघिक कार्यपद्धती महत्त्वाची असून, सर्वांच्या सहकार्याने मतमोजणी प्रक्रिया सुरळीतपणे पार पडेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

 

या प्रशिक्षणात मतमोजणी प्रक्रियेचे विविध टप्पे, कामानुसार जबाबदाऱ्यांची विभागणी, नियुक्त अधिकारी व कर्मचाऱ्यांची कर्तव्ये, वैध व अवैध मतपत्रिकांबाबतच्या तरतुदी, मतमोजणीदरम्यान करावयाच्या व टाळावयाच्या बाबी, तसेच निवडणूक आयोगाचे नियम व कार्यपद्धती याबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले

मतमोजणी प्रक्रिया नियोजनबद्ध, अचूक व पारदर्शक पद्धतीने राबविण्यासाठी सर्व संबंधित यंत्रणांनी आवश्यक ती दक्षता घ्यावी, अशा सूचनाही यावेळी देण्यात आल्या.

 

०००००

संबंधित पोस्ट

नागपूर येथील विद्यापीठ व महाविद्यालय न्यायाधिकरण येथे पीठासीन अधिकारी नियुक्‍तआमदार सुधाकर अडबाले यांच्या सततच्या पाठपुराव्याला यश..

नियमांचे काटेकोर पालन करून बकरी ईद सण उत्साहात साजरा करावा- जिल्हाधिकारी डॉ. मैनाक घोष जिल्हा प्राणीक्लेष प्रतिबंधक समितीच्या बैठकीत निर्देश..

जागतिक पर्यावरण दिनानिमित्त ‘माझी वसुंधरा’ शपथ,पर्यावरण संवर्धनासाठी सामूहिक बांधिलकी आवश्यक विभागीय आयुक्तांकडून वृक्ष लागवड

अवैध वाळू माफियांवर ठाणे जिल्हा प्रशासनाचा धडक सर्जिकल स्ट्राईक…! भिवंडीतील दिवे-केवणी खाडीत १० बार्ज अन् १६ सक्शन पंप जप्त; तब्बल ३.६० कोटींचा मुद्देमाल उद्ध्वस्त!

vishwatmaklokswamivarta

महाराष्ट्र विधानपरिषदेच्या नऊ जागांसाठी द्विवार्षिक निवडणूक तर एक जागेसाठी पोटनिवडणूक घोषित…

सार्वत्रिक निवडणुका आणि पोटनिवडणुका 2026: सर्व मतदान केंद्रांवर किमान आवश्यक सुविधा आणि मतदार सहाय्य उपलब्ध करून दिले जाणार