vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

महिला केवळ शेतीचा आधार नाहीत, तर संकटातून कुटुंबाला सावरणारी खरी ताकद आहेत -पालकमंत्री जयकुमार रावल शेतात राबणाऱ्या तिच्या हातांवरच कुटुंबाचा संसार उभा; संकटातही न डगमगणाऱ्या मातृशक्तीला सलाम!

महिला केवळ शेतीचा आधार नाहीत, तर संकटातून कुटुंबाला सावरणारी खरी ताकद आहेत -पालकमंत्री जयकुमार रावल शेतात राबणाऱ्या तिच्या हातांवरच कुटुंबाचा संसार उभा; संकटातही न डगमगणाऱ्या मातृशक्तीला सलाम!

धुळे, प्रतिनिधी : सकाळी घरातील कामे आटोपून शेताची वाट धरणारी, उन्हातान्हात पेरणीपासून निंदणी, कोळपणीपर्यंत राबणारी आणि पुन्हा कुटुंबाची जबाबदारी सांभाळणारी महिला ही खऱ्या अर्थाने शेतीचा कणा आहे. कुटुंबावर संकट आले, आर्थिक अडचणी निर्माण झाल्या, तरी हिंमत न हारता कुटुंबाला सावरण्याचे सामर्थ्य महिलांमध्ये असते. त्यांच्या कष्टांचा केवळ गौरव न करता त्यांना समान संधी, आर्थिक स्वावलंबन आणि योग्य सन्मान मिळाला पाहिजे, असे प्रतिपादन राज्याचे पणन व राजशिष्टाचार मंत्री तथा पालकमंत्री जयकुमार रावल यांनी केले.

सेवा संकल्प अभियानांतर्गत कृषी विभाग, आत्मा, धुळे आणि कृषी विज्ञान केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने आज हिरे भवन येथे आयोजित महिला शेतकरी मेळावा व प्रदर्शनाला पालकमंत्री जयकुमार रावल यांनी दूरदृश्य प्रणालीद्वारे संबोधित केले. यावेळी आमदार मंजूळा गावित, जिल्हाधिकारी भाग्यश्री विसपुते, कृषी विज्ञान केंद्राचे वरिष्ठ शास्त्रज्ञ तथा प्रमुख डॉ. दिनेश नांद्रे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी सुरज जगताप, पशुसंवर्धन उपायुक्त डॉ. गिरीश पाटील, मत्स्यव्यवसाय विभागाचे सहायक आयुक्त डॉ. जयेश बलकटे, जि.प.चे महिला व बालविकास विभागाचे कार्यक्रम अधिकारी अजय फडोळ, यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी व महिला शेतकरी उपस्थित होत्या.

संकटातही कुटुंबाला सावरण्याची ताकद महिलांमध्ये!पालकमंत्री जयकुमार रावल म्हणाले की, शेती करणाऱ्या महिलेच्या कष्टाला वेळेचे बंधन नसते. घर, मुले, शेती आणि कुटुंबाची जबाबदारी ती समर्थपणे सांभाळते. संकटात कुटुंबातील इतर सदस्य हतबल झाले, तरी महिला खंबीरपणे उभी राहते. मुलांचे शिक्षण, संगोपन, शेती आणि रोजगारासाठी ती स्वतःच्या कष्टांची पर्वा करत नाही. संकटातून पुन्हा उभे राहण्याचे सामर्थ्य मातृशक्तीमध्ये आहे.

खानदेशातील महिलांचे शेतीतील योगदान मोठे आहे. त्यांची भूमिका केवळ शेतावर जेवणाचा डबा पोहोचविण्यापुरती मर्यादित नसून पेरणी, निंदणी, कोळपणीपासून शेतीच्या प्रत्येक कामात त्या सहभागी असतात. शेती टिकविण्यात आणि पुढील पिढीचे भविष्य घडविण्यात त्यांचा महत्त्वाचा वाटा असल्याचे त्यांनी सांगितले.

संबंधित पोस्ट

जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालयाच्या नूतन इमारतीचे पालकमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण

भूतपूर्व सैनिक व भूतपूर्व महिला वन कर्मचाऱ्यांसाठी 136 इन्फंट्री बटालियन (टीए) इको महारमध्ये भरती मेळावा

विधानसभा प्रश्नोत्तरे-राज्यातील सर्व नर्सिंग महाविद्यालयांसाठी प्रमाणित कार्यपद्धती (एसओपी) लागू करणार- सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आबिटकर

वेध विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रमाचे जिल्हाधिका-यांकडून पूर्वतयारीचा आढावा.

जनगणना प्रक्रिया समजावून घेण्यासाठीप्रशिक्षण महत्त्वाचे- जिल्हाधिकारी दिलीप स्वामी

12 व्या आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात संपन्न “करो योग रहो निरोग” नियमीत योगा ही आरोग्यासाठी संजीवनी आहे – पोलीस उपमहानिरीक्षक शहाजी उमाप