vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्यास्थानिक बातम्या

आयडिएशन कॉम्पिटिशन ३.०’ विद्यार्थ्यांच्या नवकल्पनांना चालना देणारी ठरेल – कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा

आयडिएशन कॉम्पिटिशन ३.०’ विद्यार्थ्यांच्या नवकल्पनांना चालना देणारी ठरेल – कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा

मुंबई, प्रतिनिधी : कौशल्य विकास विभागाच्या माध्यमातून नवकल्पनांना प्रोत्साहन देणारा आयडिएशन कॉम्पिटिशन ३.० हा उपक्रम उद्योजकतेकडे वाटचाल करणारा ठरेल, असे कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी सांगितले.

वर्ल्ड ट्रेड सेंटर येथे कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागाचे रतन टाटा महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठ, महाराष्ट्र राज्य नाविन्यपूर्ण सोसायटी आणि आयस्पार्क फांउडेशन यांच्या पुढाकाराने आयडिएशन कॉम्पीटीशन ३.० ही स्पर्धा आयोजित करण्यात आली होती या कार्यक्रमात मंत्री लोढा बोलत होते.अपर मुख्य सचिव मनिषा वर्मा यांनी कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागामार्फत नवकल्पनांना चालना देणाऱ्‍या विविध उपक्रमांची माहिती यावेळी दिली. राज्य नाविन्यता सोसायटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीकांत पाटील यांनी राज्य नाविन्यता सोसायटी मार्फत राबविण्यात येणा-या योजनांची माहिती दिली.

रतन टाटा महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठाच्या कुलगुरू डॉ. अपूर्वा पालकर यांनी इनक्युबिशेनसाठी आवश्यक असलेली सर्व मदत विद्यापीठाच्या वतीने दिली जाईल. विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद आणि वाढता सहभाग पाहून स्टार्टअप इकोसिस्टमला मिळणारे बळ स्पष्ट होत आहे असेही त्या म्हणाल्या.

आयडिएशन कॉम्पिटिशन ३.० मध्ये ४०० विद्यार्थ्यांनी घेतला सहभाग,रतन टाटा महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठ, महाराष्ट्र राज्य नाविन्यता सोसायटीच्या सहकार्याने, आयडिएशन कॉम्पिटिशन ३.० आयोजित करण्यात आली. या स्पर्धेत महाराष्ट्रातील ८ जिल्ह्यांतील विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला. ५० हून अधिक महाविद्यालयांमधील १३० गटांनी या स्पर्धेत सहभाग घेतला या स्पर्धेतून तीन विजेते लवकरच घोषित केले जाणार आहेत.विद्यार्थ्यांमधील नाविन्यपूर्णतेला प्रोत्साहन देणे, त्यांना जोपासणे आणि वास्तविक जगातील आव्हानांवर उद्योजकीय उपाय विकसित करण्यासाठी सक्षम करणे, हे या स्पर्धेचे उद्दिष्ट आहे.२०२४ मध्ये सुरू झालेली ही स्पर्धा विद्यार्थ्यांमध्ये नाविन्यपूर्ण आणि उद्योजकीय संस्कृती रुजवण्यासाठी तयार करण्यात आली आहे. याद्वारे विद्यार्थ्यांना त्यांच्या सर्जनशील कल्पनांचे रूपांतर शाश्वत उद्योगांमध्ये करण्यास मदत केली जाते. हा उपक्रम विद्यार्थ्यांना त्यांच्या कल्पनांचे रूपांतर प्रभावी स्टार्टअपमध्ये करण्यासाठी एक व्यासपीठ उपलब्ध करून देतो, ज्यामध्ये त्यांना मार्गदर्शन, निधीच्या संधी आणि इनक्युबेशन सपोर्ट मिळतो. आयडिएशन कॉम्पिटिशन ३.० हे ‘प्री-इनक्युबेशन प्रोग्राम’च्या माध्यमातून या संकल्पनेला पुढे नेत हा कार्यक्रम अगदी सुरुवातीच्या कल्पनेपासून ते सक्षम स्टार्टअप विकसित करण्यापर्यंत मदत करतो. यामध्ये नाविन्यपूर्णता, समस्या निवारण आणि उद्योजकीय विचारसरणीवर भर दिला जातो, ज्यामुळे विद्यार्थ्यांना आवश्यक साधने आणि इकोसिस्टम सपोर्ट मिळतो.

या कार्यक्रमातून वैचारिक स्तरावर संरचित उद्योजकता प्रशिक्षण देण्यात येते. तज्ज्ञ मार्गदर्शक आणि उद्योग क्षेत्रातील व्यावसायिकांसह सखोल स्टार्टअप बूटकॅम्प, इतर नाविन्यपूर्ण विचारवंत आणि संस्थापकांसोबत सहयोग आणि नेटवर्किंगच्या संधी मिळते. स्पर्धा पूर्ण केल्यावर सहभागाचे ई-प्रमाणपत्र मिळते. आश्वासक कल्पनांसाठी ‘सीड ग्रांट’ स्वरूपात निधी मिळवण्याची संधीही मिळत असून, मुंबई येथील आय स्पार्क इनक्युबिशेन फाउंडेशन मध्ये इनक्युबेशनसाठी पात्र होण्याची संधी मिळणार आहे.

0000

संबंधित पोस्ट

जिल्हाधिकारी मुलचेरात शेतीच्या बांधावर : नुकसानग्रस्त शेतीची पाहणी व निवासी पट्टे वितरण

vishwatmaklokswamivarta

महसूल अधिकाऱ्यांची हस्तपुस्तिका’चे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते प्रकाशन

शासकीय तंत्रनिकेतन, ठाणे येथे शैक्षणिक वर्ष 2025-26 करीताअभियांत्रिकी पदविका अभ्यासक्रमांतील रिक्त जागांसाठी प्रथम वर्ष प्रवेश प्रक्रिया..

अंबादास दानवे हे मराठवाड्याच्या मातीतील अस्सल नेतृत्व- उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेविरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांना विधानपरिषदेत निरोप..

पेन्शन अदालत’मधून निवृत्तीवेतनधारकांना मोठा दिलासा-अनेक प्रलंबित प्रश्नांची जागेवरच सोडवणूक

आत्मनिर्भर भारत: लखनौ येथील उत्तर प्रदेश संरक्षण कॉरिडॉर अंतर्गत ब्रह्मोस इंटिग्रेशन अँड टेस्टिंग फॅसिलिटी सेंटरमध्ये तयार करण्यात आलेल्या ब्रह्मोस क्षेपणास्त्रांच्या पहिल्या तुकडीला संरक्षण मंत्री आणि उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी दाखवला हिरवा झेंडा

vishwatmaklokswamivarta