vishwatmaklokswamivarta
Breaking News
आरोग्य

कर्जत, श्रीरामपूर उपजिल्हा रुग्णालयात वैश्विक दिव्यांग प्रमाणपत्र प्रणाली कार्यान्वित

कर्जत, श्रीरामपूर उपजिल्हा रुग्णालयात वैश्विक दिव्यांग प्रमाणपत्र प्रणाली कार्यान्वित

​अहिल्यानगर , प्रतिनिधी:- जिल्ह्यातील कर्जत तसेच श्रीरामपूर येथील उपजिल्हा रुग्णालयांमध्ये नवीन वैश्विक दिव्यांग प्रमाणपत्र वितरण प्रणाली कार्यान्वित करण्यात आली आहे. यामुळे जिल्ह्यातील अस्थिव्यंग तसेच नेत्र दिव्यांगत्व असलेल्या नागरिकांची मोठी गैरसोय टळणार असून प्रमाणपत्र मिळवण्यासाठी त्यांचा होणारा प्रवास व वेळ वाचणार आहे, अशी माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. संजय घोगरे यांनी दिली आहे.

पुणे येथील दिव्यांग कल्याण आयुक्तालयाकडून या प्रणालीसाठी आवश्यक युजर आयडी व पासवर्ड उपलब्ध करून देण्यात आला आहे. सदर रुग्णालयांमध्ये दिव्यांग बोर्डातील तज्ज्ञ डॉक्टरांमार्फत रुग्णांची तपासणी करून त्यांना प्रमाणपत्रे वितरित केली जातील.

प्रशासनाने रुग्णांच्या सोयीसाठी तालुकानिहाय दिवस निश्चित केले असून श्रीगोंदा, जामखेड व कर्जत तालुक्यातील रुग्णांची वैद्यकीय तपासणी उपजिल्हा रुग्णालय कर्जत येथे महिन्याच्या पहिल्या व तिसऱ्या बुधवारी करण्यात येईल. तसेच अकोले, संगमनेर, कोपरगाव, राहाता व श्रीरामपूर येथील रुग्णांसाठी उपजिल्हा रुग्णालय श्रीरामपूर येथे महिन्याच्या दुसऱ्या व चौथ्या बुधवारी दिव्यांग तपासणी व प्रमाणपत्र वितरण शिबिराचे आयोजन करण्यात येणार आहे.

या नव्या सुविधेमुळे दिव्यांग बांधवांची होणारी हेळसांड थांबण्यास मदत होणार असून संबंधित तालुक्यातील सर्व दिव्यांग बांधवांनी आपल्या जवळच्या आरोग्य संस्थेत उपस्थित राहून या सुविधेचा लाभ घ्यावा, असे आवाहनही श्री.घोगरे यांनी केले आहे.

00000

0

संबंधित पोस्ट

१ डिसेंबर : ३७ वा जागतिक एड्स दिन — अकोला जिल्ह्यात विविध उपक्रमांचे आयोजन

vishwatmaklokswamivarta

क्षयरुग्णांना पोषक आहार वाटप-निक्षय मित्र महानगर गॅस कंपनीचा सामाजिक पुढाकार

vishwatmaklokswamivarta

कर्करोग तपासणी, जनजागृती मोहीम वेळोवेळी राबवा- जिल्हाधिकारी अशोक काकडे जिल्हाधिकारी कार्यालयात मौखिक कर्करोग जनजागृती अभियान

कुष्ठरुग्ण शोध मोहीम अभियान यशस्वीरित्या राबवावे — डॉ. भरत बास्टेवाड 

vishwatmaklokswamivarta

कुष्ठरुग्ण शोध अभियानात 53 नवीन रुग्णांची नोंद

vishwatmaklokswamivarta

टाटा मेमोरिअल सेंटरच्या रायगड मधील कर्करोग संशोधन केंद्राच्या रुग्णालयासाठी मुद्रांक शुल्कात सवलत