vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

क्रांतिसूर्य महात्मा जोतिराव फुले यांचे द्विशताब्दी जयंती वर्ष ११ एप्रिल २०२६ ते १० एप्रिल २०२७ या कालावधीत साजरे करण्यात येत आहे. या द्विशताब्दी वर्षानिमित्त त्यांचे कार्य, विचार पुढील पिढीपर्यंत प्रभावीपणे नेण्याची संधी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

क्रांतिसूर्य महात्मा जोतिराव फुले यांचे द्विशताब्दी जयंती वर्ष ११ एप्रिल २०२६ ते १० एप्रिल २०२७ या कालावधीत साजरे करण्यात येत आहे. या द्विशताब्दी वर्षानिमित्त त्यांचे कार्य, विचार पुढील पिढीपर्यंत प्रभावीपणे नेण्याची संधी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

राज्य प्रतिनिधी

क्रांतिसूर्य महात्मा जोतिराव फुले यांचे द्विशताब्दी जयंती वर्ष ११ एप्रिल २०२६ ते १० एप्रिल २०२७ या कालावधीत साजरे करण्यात येत आहे. या द्विशताब्दी वर्षानिमित्त त्यांचे कार्य, विचार पुढील पिढीपर्यंत प्रभावीपणे नेण्याची संधी असल्याचे सांगत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्या कार्यावर आधारित विविध कार्यक्रमांची वार्षिक दिनदर्शिका बनवून वर्षभर कार्यक्रमांचे यशस्वी आयोजन करण्याचे निर्देश बैठकीतदिले.

 

क्रांतिसूर्य महात्मा जोतिराव फुले यांचे द्विशताब्दी जयंती वर्ष साजरे करण्यासाठी गठीत समितीमध्ये संलग्नित विभागाने किमान दोन ते तीन कार्यक्रमांचे आयोजन करावे. अशा प्रेरक कार्यक्रमांचे नियोजन १५ एप्रिल पर्यंत देण्यात यावे. महात्मा जोतिराव फुले यांचे मूळ गाव खानवडी (ता. पुरंदर, जि. पुणे) येथील त्यांच्या स्मृती जपणाऱ्या जिल्हा परिषद शाळेचा कायापालट करण्यात आला आहे. या द्विशताब्दी जयंती वर्षाची सुरुवात ११ एप्रिल रोजी सीबीएससी शिक्षण, आधुनिक सुविधांनी युक्त खानवडी जिल्हा परिषद शाळेच्या लोकार्पण कार्यक्रमाने करावी, असेही मुख्यमंत्री श्री.फडणवीस यांनी यावेळी सांगितले.

मंत्रालयात आयोजित या बैठकीला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार, अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ, सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड. आशिष शेलार, सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट, इमाव बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे, शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे, ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे, महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे आदी उपस्थित होते.

संबंधित पोस्ट

समता पंधरवाडात विविध उपक्रमाचे आयोजन; सहभागी होण्याचे आवाहन

कामोठेत पनवेल महापालिकेचे सर्वात मोठे अग्निशमन केंद्र लवकरच उभारले जाणार

vishwatmaklokswamivarta

मुंबईतील शासकीय महिला कर्मचाऱ्यांसाठी राज्य सरकारची मोठी खुशखबर- महिला कर्मचाऱ्यांसाठी कम अर्ली, गो अर्ली ही सवलत देण्याची घोषणा उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी आज विधानपरिषदेत केली.

खामगांव औद्योगिक प्रशिक्षण संस्थामध्ये प्रवेश प्रक्रिया सुरु…

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून पद्म पुरस्कारार्थींचे अभिनंदन,पद्म भूषण पुरस्काराच्या औचित्याने माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी, प्रख्यात गायक पंकज उधास यांना अभिवादन..

vishwatmaklokswamivarta

पुणे शहरात गुंगीकारक औषधांची विक्री करणाऱ्यावर कारवाई- गृह राज्यमंत्री योगेश कदम