vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

स्वस्तिक पॅटर्न’ वृक्षलागवड जिल्ह्यात सर्वदूर राबविणार वृक्षलागवडीसाठी वृक्षक्रांती मिशनला सहकार्य करण्याचे जिल्हाधिका-यांचे निर्देश 

‘स्वस्तिक पॅटर्न’ वृक्षलागवड जिल्ह्यात सर्वदूर राबविणार वृक्षलागवडीसाठी वृक्षक्रांती मिशनला सहकार्य करण्याचे जिल्हाधिका-यांचे निर्देश

अकोला, प्रतिनिधी: वृक्षक्रांती मिशनतर्फे ‘स्वस्तिक पॅटर्न’मध्ये संपूर्ण जिल्ह्यात वृक्षलागवडीचा प्रस्ताव असून, त्यांना सर्व यंत्रणांनी सहकार्य करावे, असे निर्देश जिल्हाधिकारी वर्षा मीना यांनी सर्व यंत्रणांना दिले आहेत.

मिशनचे संस्थापक ए. एस. नाथन यांच्यातर्फे ‘स्वस्तिक पॅटर्न’मध्ये वृक्षलागवडीचा उपक्रम अनेक वर्षांपासून राज्यात ठिकठिकाणी राबविण्यात येत आहे. अकोला जिल्ह्यातील ६० शासकीय कार्यालये व जागांमध्ये या उपक्रमात वृक्षलागवड झाली. यंदाही हा उपक्रम राबविण्याची इच्छा असून, जिल्ह्यातील शासकीय व निमशासकीय कार्यालये, ई-क्लास जमीनीवर, तसेच एमआयडीसीच्या खुल्या जागांवर स्वस्तिक वृक्षलागवडीसाठी नि:स्वार्थ सेवा देण्याची तयारी आहे, असे श्री. नाथन यांनी प्रस्तावात नमूद केले आहे.

या माध्यमातून जिल्ह्यातील वृक्षलागवडीला चालना मिळण्यासाठी कार्यालयातील जागा, पाण्याची व्यवस्था, रोपे, कुंपण, यंत्रसामग्री आदी बाबींसाठी यंत्रणांनी मिशनला सहकार्य करावे. वृक्षलागवडीसाठी मनरेगाअंतर्गत रोपवाटिकेतून विभागीय वनाधिकारी, सामाजिक वनीकरण विभागातर्फे विनामूल्य रोपे उपलब्ध करून द्यावी. जिल्ह्यात वृक्षलागवडीला चालना द्यावी, असे निर्देश जिल्हाधिका-यांनी दिले आहेत.

०००

संबंधित पोस्ट

भारतीय जनता पक्ष धारावी विधानसभा प्रभाग 186 मध्ये  भाजप जिल्हा सचिव रमेश नाडार यांच्या मार्फत भाजपा सदस्य अभियान जनतेचाअभुतपूर्व नोंदणी समर्थन…

माजी मंत्री महादेवराव शिवणकर यांच्यावर शासकीय इतमामात अंतिम संस्कार

vishwatmaklokswamivarta

छत्रपती शिवाजी महाराजांच्या मंदिरासाठी दरमहा ५०हजार रुपये देण्याचे उपमुख्यमंत्री यांचे आदेश !मंदिरासह सिंधुदुर्ग किल्ला आणि परिसराचा विकास करण्याची मागणी!

हिंदु जनजागृती समितीचे प्रसिद्धीपत्रक-आसामप्रमाणे संपूर्ण देशात ‘बहुपत्नी विवाहा’वर बंदी घाला ! – हिंदु जनजागृती समितीची मागणी

vishwatmaklokswamivarta

विमान सुरक्षेसाठी पक्ष्यांचा वावर कमी करणाऱ्या नव्या संकल्पना, तंत्रज्ञान शोधा- मुंबई उपनगर पालकमंत्री ॲड. आशिष शेलारवर्सोवा कचरा हस्तांतरण केंद्राला छप्पर टाकण्याचे काम तातडीने सुरू करण्याचे निर्देश..

इंडियन ऑइल कॉर्पोरेशनच्या सीएसआर उपक्रमातून सायन रुग्णालयाला अत्याधुनिक बायोकेमिस्ट्री ब्लड अ‍ॅनालायझर – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस रुग्णसेवा अधिक गतिमान होणार