vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

मतदार यादी विशेष सघन पुनरीक्षण कार्यक्रम;तपशील अद्ययावत न केल्यास नाव वगळले जाण्याची शक्यता

मतदार यादी विशेष सघन पुनरीक्षण कार्यक्रम;तपशील अद्ययावत न केल्यास नाव वगळले जाण्याची शक्यता

लातूर, प्रतिनिधी): भारत निवडणूक आयोग आणि मुख्य निवडणूक अधिकारी, महाराष्ट्र राज्य यांच्या सूचनेनुसार, लातूर जिल्ह्यात ‘विशेष सघन पुनरावलोकन’ (SIR) कार्यक्रम प्रभावीपणे राबविला जात आहे. या मोहिमेतंर्गत मतदार यादीतील अस्पष्ट (ब्लअर) फोटो, डी.एस.ई., एस.आय.आर. मॅपिंग आणि नावातील दुरुस्ती ही कामे मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (बीएलओ) यांच्यामार्फत केली जात आहेत. ३१ मार्च २०२६ ही मुदत संपल्यानंतरही हे काम सध्या सुरू असून, मतदारांनी प्रशासनाला सहकार्य करणे आवश्यक असल्याचे आवाहन करण्यात आले आहे.

आतापर्यंत लातूर शहर विधानसभा मतदारसंघाचे मॅपिंगचे केवळ ५७ टक्के कामकाज पूर्ण झाले आहे. ज्या मतदारांचे मॅपिंग अद्याप झालेले नाही, त्यांना बीएलओमार्फत सुनावणीसाठी बोलावले जाईल. अशा सुनावणीस दोन ते तीन वेळा अनुपस्थित राहिल्यास किंवा आवश्यक पुरावे सादर न केल्यास संबंधित मतदाराचे नाव मतदार यादीतून थेट वगळले जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे २३४-लातूर ग्रामीण आणि २३५-लातूर शहर विधानसभा मतदारसंघातील सर्व मतदारांनी आपल्या भागातील बीएलओंची प्रत्यक्ष भेट घेऊन आपली माहिती अद्ययावत करून घ्यावी.

या प्रक्रियेसाठी मतदारांनी सन २००२ च्या मतदार यादीतील स्वतःचे आई, वडील, आजी किंवा आजोबा यांचा तपशील https://voters.eci.gov.in/searchInSIR/SZUA4DPDF-JKSQWODSE या अधिकृत लिंकवर किंवा ‘ECINET’ या ॲपवर शोधून बीएलओ यांना उपलब्ध करून द्यावा. विवाहित महिलांनीदेखील त्यांच्या माहेरच्या (२००२ मधील) नातेवाईकांची माहिती देऊन प्रशासनास सहकार्य करावे. ही मोहीम मतदार यादी अधिक शुद्ध आणि त्रुटीरहित करण्यासाठी अत्यंत महत्त्वाची असून, नागरिकांनी आपले नाव मतदार यादीत कायम राखण्यासाठी तत्परतेने माहिती द्यावी, असे आवाहन उपविभागीय अधिकारी रोहिणी नऱ्हे-विरोळे आणि तहसीलदार सौदागर तांदळे यांनी केले आहे.

*****

संबंधित पोस्ट

राज्य सरकार चा निर्णय  दुधाच्या भेसळीवर मोक्का कायदा लागू करण्याचा प्रस्ताव उपमुख्यमंत्री अजित पवार…

महाराष्ट्र शासनाचे ११ वर्षे मुदतीचे१,००० कोटी रुपयांचे रोखे विक्रीस..

vishwatmaklokswamivarta

लंबित प्रस्तावांना8 डिसेंबरपूर्वी प्रशासकीय मान्यता घ्या- पालकमंत्री चंद्रकांत पाटील- पायाभूत सुविधांच्या कामांकरिता युनिक आय डी क्रमांक मिळवण्यासाठी तातडीने कार्यवाही करा.

vishwatmaklokswamivarta

डॉ.आंबेडकर सभागृहात आज (दि.८)पंडीत दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळावा

दिल्लीतील किल्ल्याजवळ झालेल्या भीषण स्फोटानंतर लाल किला पर्यटक आणि नागरिकांसाठी आज पासून पुढील तीन दिवसासाठी बंद…

vishwatmaklokswamivarta

विकसित गडचिरोलीची पूर्तता वेगवान पद्धतीने करूया – सहपालकमंत्री ॲड. आशिष जयस्वाल प्रजासत्ताक दिन उत्साहात, देशातील प्रगतीशील जिल्हा म्हणून गडचिरोलीची नवी ओळख

vishwatmaklokswamivarta