vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळाच्या थेट कर्ज योजनेसाठी 8 एप्रिल रोजी लॉटरी

महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळाच्या थेट कर्ज योजनेसाठी 8 एप्रिल रोजी लॉटरी

 

जालना, प्रतिनिधी :- महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळ मर्यादित, जिल्हा कार्यालय जालना यांच्या वतीने सन 2025-26 या आर्थिक वर्षासाठी राबविण्यात येत असलेल्या थेट कर्ज योजनेच्या लाभार्थ्यांची निवड आता लॉटरी पद्धतीने (चिठ्ठी टाकून) केली जाणार आहे. ही निवड प्रक्रिया बुधवार दि. 8 एप्रिल 2026 रोजी सकाळी 11 वाजता भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, जिल्हाधिकारी कार्यालयासमोर, जालना येथे पार पडणार आहे.

या आर्थिक वर्षासाठी जालना जिल्ह्याला एकूण 24 लाभार्थ्यांचे उद्दिष्ट प्राप्त झाले होते. या योजनेसाठी महामंडळाकडे एकूण 166 उमेदवारांनी ऑनलाइन पद्धतीने अर्ज केले होते. अर्जांच्या छाननीनंतर त्यापैकी 119 अर्जदार पात्र ठरले असून, 47 अर्ज अपात्र ठरवण्यात आले आहेत. निवासी उपजिल्हाधिकारी तथा सदस्य सचिव, जिल्हा लाभार्थी निवड समिती यांच्या अध्यक्षतेखाली ही लॉटरी प्रक्रिया राबविली जाईल. निवड प्रक्रियेत पूर्णतः पारदर्शकता राहावी यासाठी ही विशेष बैठक आयोजित करण्यात आली आहे. महामंडळाच्या वतीने सर्व पात्र अर्जदारांना या निवड प्रक्रियेसाठी उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. या प्रक्रियेद्वारे पात्र 119 उमेदवारांमधून चिठ्ठी टाकून अंतिम 24 लाभार्थ्यांची निवड केली जाणार आहे. असे जिल्हा व्यवस्थापक, जालना यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविले आहे.

-*-*-*-*-

संबंधित पोस्ट

क्रांतीसुर्य म.ज्योतीबा फुले व भारतरत्नडॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त 2 मार्चला बैठक..

vishwatmaklokswamivarta

डाक जीवन विमा योजनेचे प्रीमिअम भरण्यासाठी ऑनलाईन सुविधा..

vishwatmaklokswamivarta

पुणे येथील राजगुरुनगर मधील पीडित मुलींच्या कुटुंबियांची केंद्रीय राज्य मंत्री रामदास आठवले यांनी घेतली सांत्वनपर भेट*

vishwatmaklokswamivarta

अमली पदार्थांबाबतची माहिती 112 या क्रमांकावर द्यावी- जिल्हाधिकारी अशोक काकडे, सांगली जिल्हा एनकॉर्ड समितीच्या बैठकीत घेतला आढावा…

vishwatmaklokswamivarta

राज्यातील विमानतळांची विकासकामे कालबद्ध गतीने पूर्ण करावी – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस वाढवण व विरार परिसरात नवीन ग्रीनफिल्ड विमानतळ विकसित करण्यात येणार

अंमली पदार्थ मुक्त सांगली जिल्ह्यासाठी प्रत्येक विभागाने सकारात्मक योगदान द्यावे – एनकॉर्ड समितीची बैठक संपन्न- संयुक्त पथकाने दर महिन्याला तपासणी करावी- कारखान्यांकडून प्रतिज्ञापत्र घेण्याचे निर्देश..

vishwatmaklokswamivarta