vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेश

राज्य सफाई कर्मचारी आयोगाचे अध्यक्ष शेरसिंग डागोर यांचा जिल्हा दौरा

राज्य सफाई कर्मचारी आयोगाचे अध्यक्ष शेरसिंग डागोर यांचा जिल्हा दौरा

 

बुलढाणा, प्रतिनिधी : महाराष्ट्र राज्य सफाई कर्मचारी आयोगाचे अध्यक्ष (राज्यमंत्री दर्जा) शेरसिंग रुक्कानसिंग डागोर हे मंगळवार व बुधवार दि. 7 व 8 एप्रिल रोजी बुलढाणा जिल्हा दौऱ्यावर आहे. दौऱ्यामध्ये सफाई कर्मचाऱ्यांच्या समस्या व अडीअडचणी संदर्भात विविध विभागाचा आढावा घेणार आहे.त्यांच्या दौरा कार्यक्रमानुसार मंगळवार दि. 7 एप्रिल 2026 रोजी रात्री 8 वाजता शेगाव सर्कीट हाऊस येथे आगमन व राखीव.

 दि. 8 एप्रिल रोजी सकाळी 10 वाजता शेगाव येथून बुलढाणाकडे प्रयाण, दुपारी 12 वाजता सफाई कर्मचारी संघटना सोबत बैठक व चर्चा. दुपारी 2 ते 3 वाजेपर्यंत भोजन व राखीव. दुपारी 3 वाजता जिल्हाधिकारी कार्यालय बुलढाणा येथे हाताने मैला उचलणाऱ्या सफाई कामगांराच्या नियुक्तीस प्रतिबंध करणे व त्यांचे पुनर्वसन करणे बाबतच्या अधिनियम 2013 ची अंमलबजावणी बाबत तसेच सफाई कर्मचाऱ्यांच्या समस्या व अडीअडचणी निवारणाकरीता केलेल्या उपाययोजना संदर्भात आढावा बैठक. बैठकीनंतर पत्रकार परिषद होईल. सायंकाळी 5 वाजता सफाई कर्मच्याऱ्यांच्या वस्त्यांना भेट व चर्चा. त्यानंतर रात्री 7 वाजता बुलढाणा सर्कीट हाऊस येथे मुक्काम.

 

0000

संबंधित पोस्ट

आर्थिक विकास महामंडळाच्या विविध कर्ज योजना,इच्छुकांनी योजनेच्या अधिक माहितीकरीता संपर्क साधावा

५० हजारांहून अधिक घरकुलांची पूर्ती करणारा बीड जिल्हा राज्यात प्रथम!महाराष्ट्राला घरकुलांचे अधिकचे उद्दीष्ट मंजूर केल्याबद्दल उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मानले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार…

vishwatmaklokswamivarta

आरक्षण सोडत – हरकती व सूचना 17 ऑक्टोबरपर्यंत स्वीकारणार- जिल्हाधिकारी अशोक काकडे

vishwatmaklokswamivarta

राज्यातील विविध जिल्ह्यांना वादळी वाऱ्यासह विजांच्या कडकडाटाचा इशारा हवामान विभागाकडून पुढील पाच दिवसांसाठी अलर्ट जारी

आषाढी एकादशीसाठी पंढरपूरसाठी 254 जादा बसेस…

महाराष्ट्र कुस्ती संघटनेच्या जिल्हाप्रमुखपदी संजय मिसाळ