vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्यास्थानिक बातम्या

एनडीआरएफ, एसडीआरएफमार्फत नवी मुंबई महापालिकेत आपत्ती व्यवस्थापनाविषयक प्रात्यक्षिकासह प्रशिक्षण

एनडीआरएफ, एसडीआरएफमार्फत नवी मुंबई महापालिकेत आपत्ती व्यवस्थापनाविषयक प्रात्यक्षिकासह प्रशिक्षण

      नवी मुंबई प्रतिनिधी    नवी मुंबई महानगरपालिका आपत्ती व्यवस्थापन विभागामार्फत जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, ठाणे यांच्या वतीने, राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल (एनडीआरएफ – NDRF) व राज्य आपत्ती प्रतिसाद दल (एसडीआरएफ – SDRF) यांच्या मार्गदर्शनाखाली महापालिका मुख्यालयात ‘परिचय सराव (Familiarisation Exercise) आपत्ती व्यवस्थापन प्रशिक्षण’ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

          याप्रसंगी महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त श्री सुनील पवार यांनी कोणतेही प्रशिक्षण हे स्वत:ला कृतीशील व अद्ययावत ठेवण्यासाठी महत्वाचे असते असे सांगत सर्व सहभागी अधिकारी, कर्मचारी यांनी अत्यंत गांभिर्यपूर्वक प्रशिक्षणातील गोष्टी शिकून घ्याव्यात अस सांगितले.

          या प्रशिक्षणाप्रसंगी एनडीआरएफचे मुख्य निरीक्षक श्री सुरेंद्र पुनिया, एसडीआरएफ चे वरिष्ठ निरीक्षक श्री सतीश सिंग, ठाणे जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी डॉ.अनिता जवंजाळ, ठाणे तहसील येथील मंडल अधिकारी श्री मोहन बोंबे, नवी मुंबई अग्निशमन दलाचे सहाय्यक अग्निशमन अधिकारी श्री. संदेश चन्ने व नागरी संरक्षण दलाचे विभागीय वॉर्डन श्री. अरुण सातपुते आदी मान्यवर उपस्थित होते.

           या प्रशिक्षणामध्ये नमुंमपा मधील अधिकारी, कर्मचारी तसेच अग्निशमन विभागाचे कर्मचारी, सुरक्षा रक्षक, नागरी संरक्षण दल, सफाई मित्र व ठाणे तहसील येथील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला होता.

           प्रत्यक्ष प्रशिक्षणात एनडीआरएफमार्फत आपत्ती विषयक माहिती देऊन आपत्तीपूर्व व आपत्तीमध्ये घ्यावयाची काळजी याबद्दल योग्य ते मार्गदर्शन करण्यात आले. सीपीआर, बँडेजेस तसेच प्राथमिक स्वरूपात आपत्तीला सामोरे जाण्यासाठी लागणारे प्रशिक्षण याबद्दलची महत्त्वपूर्ण माहिती देऊन प्रशिक्षणार्थींकडून प्रात्यक्षिके करून घेतली. सदर प्रशिक्षणामध्ये सर्वांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला.

000000

संबंधित पोस्ट

नीट’ परीक्षा केंद्रांवरील सुविधांची खातरजमा करा; विद्यार्थ्यांची गैरसोय टाळण्यासाठी सूचनांचे काटेकोर पालन करा-जिल्हाधिकारी डॉ. भारत बास्टेवाड• परीक्षेच्या पूर्वतयारी, सज्जतेचा आढावा• प्रत्येक परीक्षा केंद्रावर चोख बंदोबस्त; वैद्यकीय पथके तैनात• सीसीटीव्ही कार्यान्वित; ड्युटी मॅजिस्ट्रेट व स्टेट ऑब्झर्वर यांची नियुक्ती

मुंबईतील वांद्रे ते कुर्ला #पॉडटॅक्सी चा प्रकल्प देशातील एकमेव असून तो मॉडेल प्रकल्प म्हणून राबविण्यात यावा. या प्रकल्पाच्या कामाला गती देण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

vishwatmaklokswamivarta

मेयो’ व ‘मेडिकल’मधील अद्ययावतीकरण गुणवत्तापूर्ण करावे- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,कॅम्पसला भेट देवून कामांना गती देण्याचे निर्देश

vishwatmaklokswamivarta

मंडळ, ग्राम महसूल अधिकाऱ्यांचे प्रशिक्षण-प्रशासकीय कामकाजात संवाद कौशल्य वापरा- जिल्हाधिकारी दिलीप स्वामी

vishwatmaklokswamivarta

जालन्यातील “त्या ” तिन्ही योजनांच्या सवेक्षणासाठी चार सदस्यीय पथक मंगळवारी जालन्यात—मा.आ. कैलास गोरंटयाल यांच्या मागणीची मुख्यमंत्र्यांकडून दखल

vishwatmaklokswamivarta

भाडेतत्त्वावरील परवडणाऱ्या घरांसाठी सक्षम यंत्रणा कार्यान्वित करा-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस भाडेतत्त्वावरील परवडणाऱ्या घरांसाठी पोर्टलची निर्मिती