vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

समृद्धी महामार्गावरील भीषण अपघात प्रकरणी खासदार डॉ. कल्याण काळे यांची ठोस भूमिका – दोषींवर गुन्हे दाखल करण्याची मागणी, पीडितांना मोठ्या आर्थिक मदतीची मागणी

समृद्धी महामार्गावरील भीषण अपघात प्रकरणी खासदार डॉ. कल्याण काळे यांची ठोस भूमिका – दोषींवर गुन्हे दाखल करण्याची मागणी, पीडितांना मोठ्या आर्थिक मदतीची मागणी

जालना, प्रतिनिधी : हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्गावर मौजे कडवंची (ता. जालना) येथे दिनांक 01 एप्रिल 2026 रोजी झालेल्या भीषण अपघातात 8 निरपराध महिला कामगारांचा मृत्यू झाल्याची अत्यंत दुर्दैवी घटना घडली असून 5 कामगार गंभीर जखमी अवस्थेत उपचार घेत आहेत. या हृदयद्रावक घटनेने संपूर्ण जिल्ह्यात शोककळा पसरली असून नागरिकांमध्ये तीव्र संतापाची भावना व्यक्त होत आहे.

या घटनेची तात्काळ दखल घेत खासदार डॉ. कल्याण काळे यांनी देशाचे पंतप्रधान मा. नरेंद्र मोदी यांना पत्र पाठवून प्रधानमंत्री राष्ट्रीय राहत निधीतून (PMNRF) पीडित कुटुंबीयांना मोठ्या प्रमाणात आर्थिक मदत देण्याची मागणी केली आहे. त्यांनी मृत कामगारांच्या कुटुंबीयांना किमान ₹20 लाख तर जखमी कामगारांना उपचारासाठी किमान ₹10 लाख आर्थिक सहाय्य तात्काळ देण्याची मागणी केली आहे.

तसेच खासदार डॉ. काळे यांनी मा. जिल्हाधिकारी, मा. पोलीस अधीक्षक आणि महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचे मा. मुख्य अभियंता यांना स्वतंत्र पत्रे देऊन या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची ठाम भूमिका मांडली आहे.

आपल्या पत्रांमध्ये त्यांनी स्पष्टपणे नमूद केले आहे की, ही घटना केवळ अपघात नसून संबंधित अधिकारी व कंत्राटदार यांच्या गंभीर निष्काळजीपणामुळे घडलेली आहे. त्यामुळे या प्रकरणात संबंधितांवर भारतीय दंड संहितेनुसार सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करून कठोर कायदेशीर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.तसेच महामार्गावरील कामगारांच्या सुरक्षेबाबत गंभीर त्रुटी, आवश्यक सेफ्टी किटचा अभाव, तसेच “छोटा हत्ती” वाहनाच्या अनधिकृत प्रवेशाबाबत सखोल चौकशी करण्याचे निर्देश देण्याची मागणी करण्यात आली आहे. संबंधित कंत्राटदारांनी कामगारांना पी.एफ., ईएसआयसी किंवा विमा संरक्षण दिले होते का, याची तपासणी करून दोषींवर फौजदारी कारवाई करण्याचीही मागणी करण्यात आली आहे.

खासदार डॉ. काळे यांनी मृत कामगारांच्या कुटुंबीयांना तात्काळ आर्थिक मदत, कुटुंबातील सदस्यांना कायमस्वरूपी नोकरी, तसेच जखमींच्या उपचाराचा संपूर्ण खर्च शासनामार्फत उचलण्याचीही मागणी केली आहे.

“निरपराध व कष्टकरी कामगारांच्या मृत्यूला जबाबदार असणाऱ्यांना कोणतीही सूट मिळू नये. पीडित कुटुंबांना न्याय मिळवून देणे ही आपली सामूहिक जबाबदारी आहे,” असे ठाम मत खासदार डॉ. कल्याण काळे यांनी व्यक्त केले आहे.

सदर प्रकरण अत्यंत संवेदनशील असून प्रशासनाने तात्काळ व प्रभावी कारवाई करून दोषींना कठोर शिक्षा करावी, अन्यथा जनतेच्या भावना अधिक तीव्र होण्याची शक्यता असल्याचेही त्यांनी नमूद केले आहे

.00000

संबंधित पोस्ट

किनगाव राजाची लखन-दुर्गा ठरली रांजणी केसरीचे मानकरी*बैलजोडी मालाकला सतीश घाटगेकडून मिळाली दुचाकी भेट

vishwatmaklokswamivarta

चला, विकसित महाराष्ट्रासाठी एकत्र काम करूया!

जिल्ह्यात १० वी व १२ वी परीक्षांसाठी कलम १६३ लागू; परीक्षा केंद्रांभोवती ५० मीटर परिसरात निर्बंध..

उत्तराखंड राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत 14 जागांवर रिपब्लिकन पक्षाला घवघवीत यश..

भारत महान प्रजासत्ताक राष्ट्र – पालकमंत्री मेघना बोर्डीकर प्रजासत्ताक दिनानिमित्त मुख्य शासकीय ध्वजवंदन समारंभ संपन्न

vishwatmaklokswamivarta

शासकीय तसेच खाजगी क्षेत्रातील सर्व आस्थापनांनी कर्मचाऱ्यांची-त्रैमासिक सांख्यिकी (ER १) माहिती ऑनलाईन पध्दतीने सादर करावी