vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

जालना येथे अमृतपेठ थेट बाजारपेठ प्रदर्शनाचे आयोजन

जालना येथे अमृतपेठ थेट बाजारपेठ प्रदर्शनाचे आयोजन

जालना, प्रतिनिधी- स्थानिक उद्योजकांना प्रोत्साहन देण्यासाठी आणि ग्राहकांना दर्जेदार वस्तू थेट उत्पादकांकडून उपलब्ध करून देण्यासाठी अमृतपेठ – थेट बाजारपेठ या प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. हे प्रदर्शन येत्या 11 व 12 एप्रिल 2026 रोजी आयोजित करण्यात येणार आहे. सदर प्रदर्शनाचे ठिकाण महेश भवन, मंठा चौफुली, जालना असे असून सकाळी 9 ते रात्री 9 या वेळेत प्रदर्शन सर्वांसाठी खुले राहणार आहे.

अमृतपेठ – थेट बाजारपेठ प्रदर्शनामध्ये घरगुती खाद्यपदार्थ, हस्तकला वस्तू, कपडे, दागिने तसेच विविध उपयुक्त वस्तूंचे स्टॉल्स उभारण्यात येणार आहेत. या माध्यमातून स्थानिक महिला व उ‌द्योजकांना त्यांच्या उत्पादनांची थेट विक्री करण्याची संधी मिळणार आहे. तसेच ग्राहकांना एकाच ठिकाणी विविध दर्जेदार वस्तू खरेदी करण्याची संधी मिळणार आहे. तरी नागरिकांनी प्रदर्शनाला मोठ्या संख्येने उपस्थित राहून स्थानिक उ‌द्योजकांना प्रोत्साहन द्यावे, असे आवाहन जिल्हा व्यवस्थापक, अमृत कार्यालय, जालना यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे केले आहे.

*-*-*-*-

संबंधित पोस्ट

अक्कलकुवा तालुक्यात केलखाडी नदीवर साकव बांधण्याचा निर्णय-विद्यार्थ्यांना मिळणार सुरक्षित मार्ग..

पीक कर्ज वितरण आणि स्वयंरोजगारांना अर्थसहय्य यासाठी सकारात्मक काम करा**जिल्हाधिकारी संतोष पाटील यांचे बँकांना निर्देश*

vishwatmaklokswamivarta

महसूल विभागाचे जुने कायदे बदलून प्रशासन लोकाभिमुख करणार – महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे,महसूलमंत्र्यांनी शिर्डीत घेतला जनता दरबार

महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे -4 शिक्षक अभियोग्यता व बुध्दीमत्ता चाचणी (TAIT) – 2025

जिल्ह्यातील फेरफार निकाली काढण्यासाठी2 फेब्रुवारीला फेरफार अदालतीचे आयोजन

vishwatmaklokswamivarta

राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पार्टीचे आमदार नेते: रोहित पवार तातडीने दादर कबुतरखान्यात जैनधर्मीयांच्या भेटीला, म्हणाले, ‘धार्मिक आंदोलनात भावनिक बाजू समजून घेतली पाहिजे’