vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

राहुरी विधानसभा पोटनिवडणूक प्रक्रिया निष्पक्षपणे पार पाडा – जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया

राहुरी विधानसभा पोटनिवडणूक प्रक्रिया निष्पक्षपणे पार पाडा – जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया

अहिल्यानगर, प्रतिनिधी :- राहुरी विधानसभा पोटनिवडणूक प्रक्रिया पारदर्शक, निष्पक्ष आणि सुरळीत पार पाडण्यासाठी नियुक्त सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांनी आपली जबाबदारी दक्षतेने पार पाडावी, अशा सूचना जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. पंकज आशिया यांनी दिल्या.

राहुरी येथे आयोजित निवडणूक पूर्वतयारी आढावा बैठकीत ते बोलत होते. या बैठकीस उपजिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी अनुपसिंह यादव, श्रीरामपूरचे उपविभागीय अधिकारी किरण सावंत-पाटील यांच्यासह विविध विभागांचे समन्वय अधिकारी व क्षेत्रीय अधिकारी उपस्थित होते.

डॉ. आशिया म्हणाले, निवडणूक कामकाजात कोणत्याही स्तरावर हलगर्जीपणा खपवून घेतला जाणार नाही. कर्तव्यात कसूर करणाऱ्यांवर कठोर प्रशासकीय कारवाई करण्यात येईल. मतदानाच्या दिवशी मतदारांची गैरसोय होऊ नये, यासाठी प्रत्येक मतदान केंद्रावर पिण्याचे पाणी, अखंडित वीजपुरवठा, पुरेशी सावली तसेच दिव्यांगांसाठी रॅम्प यांसारख्या आवश्यक सोयी-सुविधा उपलब्ध करून द्याव्यात.

यावेळी त्यांनी निवडणूक प्रक्रियेतील महत्त्वाचा घटक असलेल्या मनुष्यबळ नियोजनावर विशेष भर दिला. टपाली मतदान प्रक्रिया राबविताना आवश्यक ती खबरदारी घ्यावी. तसेच, ईव्हीएम सुरक्षितपणे हाताळून त्याचे व्यवस्थापन करताना निवडणूक आयोगाच्या तांत्रिक निर्देशांचे काटेकोर पालन करावे, अशा सूचनाही त्यांनी दिल्याबैठकीत निवडणूक यंत्रणेच्या सज्जतेचा सविस्तर आढावा घेण्यात आला. तसेच, आचारसंहितेच्या प्रभावी अंमलबजावणीबाबत करण्यात आलेल्या कार्यवाहीची माहितीही जिल्हाधिकाऱ्यांनी घेतली

बैठकीनंतर जिल्हाधिकारी डॉ. आशिया यांनी ईव्हीएम ठेवलेल्या सुरक्षा कक्षाची, मतमोजणी केंद्राची तसेच मतदान केंद्रांची पाहणी केली. मतदानाच्या दिवशी कोणतीही तांत्रिक किंवा प्रशासकीय अडचण उद्भवू नये, यासाठी सर्व पूर्वतयारी विहित मुदतीत पूर्ण करण्याचे स्पष्ट निर्देश त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले.

0000

संबंधित पोस्ट

सेवा पंधरवडा : जळगाव जामोद तालुक्यातील महाराजस्व समाधान शिबिरात नागरिकांना लाभांचे वितरणआमदार डॉ संजय कुटे, जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील यांची उपस्थिती

vishwatmaklokswamivarta

आमदार सुधीर मुनगंटीवार यांच्या प्रयत्नांमुळे ५ हजार ४५९ पोलिसांना मिळणार हक्काचे घर राज्यातील पोलीस अंमलदारांनी मानले आ. मुनगंटीवार यांचे आभार दोन वर्षांपासून प्रलंबित डीजी लोनला १७६८ कोटींची मंजुरी,आ. श्री. मुनगंटीवार यांनी मानले मुख्यमंत्री श्री. देवेंद्रजी फडणवीस यांचे आभार…

vishwatmaklokswamivarta

सरस्वती भुवन प्रशालामध्ये राज्य़ क्रीडा दिनाचे उत्साहात साजरा

vishwatmaklokswamivarta

दिल्लीतमहिलासाहित्यसंमेलन ; डॉ. शारदा चोंडेकरांच्या प्रतिभेची दखल ..

जागतिक महिला दिन कार्यक्रम उत्साहात संपन्ननवीन सक्षम पिढी घडविण्याचे काम महिलांच्या हाती- खासदार डॉ.कल्याण काळे

पुरी’ गावच्या महिला बचत गटांची पंढरीची वाटघोंगटा उत्पादनातून आर्थिक कमाई आणि पुण्य संचितही