vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठ पदभरती प्रक्रियेला उच्च न्यायालयाची स्थगिती नाही; विद्यापीठ प्रशासनाचे स्पष्टीकरण

महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठ पदभरती प्रक्रियेला उच्च न्यायालयाची स्थगिती नाही; विद्यापीठ प्रशासनाचे स्पष्टीकरण

 

लातूर, प्रतिनिधी : महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठ, नागपूर (MAFSU) द्वारे सुरू असलेल्या १७५ पदांच्या भरती प्रक्रियेला उच्च न्यायालयाने स्थगिती दिल्याची बातमी काही प्रसारमाध्यमांमध्ये प्रसिद्ध झाली आहे. त्यामुळे संबंधित उमेदवारांकडून भरती प्रक्रियेबाबत विचारणा होत आहे. याबाबत विद्यापीठ प्रशासनाने स्पष्टीकरण देताना सांगितले की, विद्यापीठाने २७ फेब्रुवारी २०२६ रोजी प्रसिद्ध केलेल्या जाहिरातीनुसार ही भरती प्रक्रिया निरंतर सुरू आहे. या अनुषंगाने उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने १ एप्रिल २०२६ रोजी दिलेल्या अंतरिम आदेशानुसार विद्यापीठाला ही भरती प्रक्रिया पुढे सुरू ठेवण्याची अनुमती दिली आहे. न्यायालयाच्या अंतरिम निर्देशानुसार, केवळ १४ याचिकाकर्ते ज्या पदांवर सध्या कार्यरत आहेत, ती पदे वगळून उर्वरित सर्व पदांची भरती प्रक्रिया सुरू राहणार आहे.

या प्रकरणातील तांत्रिक बाबी स्पष्ट करताना विद्यापीठाने नमूद केले की, संबंधित याचिकाकर्ते हे बाह्य कंत्राटदारामार्फत पुरवण्यात आलेले मनुष्यबळ असून ते विद्यापीठाचे थेट कर्मचारी नाहीत, ही वस्तुस्थिती न्यायालयासमोर मांडण्यात आली आहे. या भरतीसाठी अर्ज केलेल्या उमेदवारांनी भरती प्रक्रियेबाबत कोणताही संभ्रम मनात न ठेवता अधिकृत माहितीवर विश्वास ठेवावा. भरतीबाबतची सर्व अद्ययावत माहिती विद्यापीठाच्या www.mafsu.ac.in या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात येत आहे, असे महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठाचे कुलसचिव यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळवले आहे.

*****

संबंधित पोस्ट

एकत्रित आयुष्मान भारत–महात्मा फुले जनआरोग्य योजना उपचारांची संख्या वाढली; योजना अधिक व्यापक…

vishwatmaklokswamivarta

तीर्थक्षेत्र, देवता, संत, अभंग व पवित्र वारी यांचा अवमान सहन करणार नाही !वारीत नास्तिकतावाद व अर्बन नक्षलवादाचा अजेंडा राबवणार्‍यांवर सरकारने गांभीर्याने लक्ष द्यावे ! – समस्त वारकरी संप्रदाय व संघटना

vishwatmaklokswamivarta

महाराष्ट्र शासनाचे चार, १५, २१, २६ वर्षे मुदतीचे रोखे विक्रीस

राज्यातील विमुक्त जाती व भटक्या जमाती (#विजाभज), इतर मागास वर्ग (#इमाव) आणि विशेष मागास प्रवर्ग (#विमाप्र) या प्रवर्गातील इयत्ता १ ली ते १० वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक वर्ष २०२५–२६ साठी मॅट्रिकपूर्व #शिष्यवृत्ती

vishwatmaklokswamivarta

जिल्हाधिकारी कार्यालयात एकाच छत्राखाली,शासनाच्या विविध सेवा देण्यासंबंधीचा शुभारंभ..शासनाच्या विविध विभागांमार्फत देण्यात येणाऱ्या सेवा व प्रमाणपत्र प्राप्त करण्याकरिता नागरिकांना एकाच ठिकाणी अर्ज करणे व दाखला प्राप्त करणे होणार शक्य..

vishwatmaklokswamivarta

स्वस्थ नारी, सशक्त परिवार’ अभियान;दि. १७ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर दरम्यान विविध उपक्रम

vishwatmaklokswamivarta