vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

विद्यार्थ्यांमुळेच समाज व देशाचा भविष्यकाळ उज्वल- महिला आघाडी जिल्हाप्रमुख रुपम घुगे- ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचा केला गुणगौरव

विद्यार्थ्यांमुळेच समाज व देशाचा भविष्यकाळ उज्वल- महिला आघाडी जिल्हाप्रमुख रुपम घुगे- ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचा केला गुणगौरव

जालना, (प्रतिनिधी)- बदनापूर तालुक्यातील बाजार वाहेगाव येथील रायझिंग स्टार स्कूलच्या विद्यार्थ्यांची नवोदय विद्यालयासाठी निवड झाली.या गुणवंत विद्यार्थ्यांचा शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्याजालना जिल्हाप्रमुख रुपम रमेश घुगे यांच्या हस्ते भव्य सत्कार करण्यात आला यावेळी शिवसेना शाखाप्रमुख सुदाम काळै, गणेश काळे, माजी उपसरपंच सुरेश

आरसुड, दगडू आरसुड, प्रमोद आरसुड, शाळेच्या संचालिका रेखा आरसुड,मुख्याध्यापिका अनिता जोरले, प्राजक्ता सोनटक्के, आकांक्षा चौधरी, नेहागायकवाड आदींची उपस्थिती होती. यावेळी विद्यार्थ्यांना मार्गदर्शनकरतांना जिल्हाप्रमुख रुपम घुगे म्हणाल्या की, ग्रामीण भागातीलविद्यार्थीही प्रचंड मेहनत करुन शिक्षण क्षेत्रात मोठ्या पदावर विराजमानझालेले आहे. या शाळेला भेट देण्याचा आनंददायी योग आला. शाळेतील दोनविद्यार्थ्यांची नवोदय विद्यालयासाठी निवड झाल्याबद्दल त्यांचा सत्कार करण्याचा सन्मान मिळाला, ही माझ्यासाठी अत्यंत अभिमानाची आणि आनंदाची गोष्ट ठरली. या यशस्वी विद्यार्थ्यांना पुढील वाटचालीसाठी मार्गदर्शन करताना घुगे म्हणाल्या की, विद्यार्थ्यांमधील जिद्द,मेहनत आणि उज्ज्वल भविष्याची झलक पाहून मन भरून आले. अशा गुणवंत विद्यार्थ्यांमुळेच आपल्यासमाजाचा आणि देशाचा भविष्यकाळ अधिक उज्ज्वल होणार आहे, असेही रुपम घुगे

म्हणाल्या. यावेळी गावकर्‍यांसह विद्यार्थी व पालक, शिक्षकांची उपस्थिती होती.

[फोटो अ‍ोळी……-बाजार वाहेगाव येथील रायझिंग स्टार स्कूलच्या विद्यार्थ्यांची नवोदयविद्यालयासाठी निवड झाली. या गुणवंत विद्यार्थ्यांचा शिवसेनाजिल्हाप्रमुख रुपम रमेश घुगे यांच्या हस्ते भव्य सत्कार करण्यात आला.]

संबंधित पोस्ट

अनुसूचित जाती व नवबौध्द घटकांतील नव उदयोजक मार्जिन मनी योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन

vishwatmaklokswamivarta

सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग-तीन महामंडळाच्या कर्ज योजनेतील जामिनदारांच्या अटी शिथिल, शासन हमीस पाच वर्षे मुदतवाढ,कर्ज प्रक्रिया सुटसुटीत होणार, प्रलंबित प्रकरणे निकाली निघण्यास चालना मिळणार

मुंबईत होणार जागतिक मनोरंजन क्षेत्राचे ‘वेव्ज 2025’ संमेलन‘वेव्ज’ संमेलनाच्या यशस्वी आयोजनासाठी राज्य शासनाचे संपूर्ण सहकार्य- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

vishwatmaklokswamivarta

59 महसूल मंडळांत ‘महाराजस्व समाधान शिबिर; ‘एकाच ठिकाणी मिळणार सर्व लाभ’**संधीचा लाभ घेण्याचे जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांचे आवाहन*

माहिती तंत्रज्ञान विभागाचे सक्षमीकरण करणार- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

vishwatmaklokswamivarta

अरुणोदय वॉकर्स असोसिएशन ने आंतरराष्ट्रीय योग दिवस केला साजरा