vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

नांदेड जिल्ह्यातील ‘मथुरा-लभान’ गोवंश : महाराष्ट्राचा अभिमानडॉ. पंडित नांदेडकर यांना राष्ट्रीय स्तरावर तृतीय पारितोषिक

नांदेड जिल्ह्यातील ‘मथुरा-लभान’ गोवंश : महाराष्ट्राचा अभिमानडॉ. पंडित नांदेडकर यांना राष्ट्रीय स्तरावर तृतीय पारितोषिक

नांदेड, दि प्रतिनिधी : नांदेड जिल्ह्यातील ‘मथुरा-लभान’ गोवंशाच्या संवर्धन व संशोधनाला राष्ट्रीय स्तरावर मान्यता मिळत असून, या क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या तज्ज्ञांचा गौरव करण्यात येत आहे.
जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांचा नुकताच NBAGR मार्फत आयोजित SOCDAB-2026 परिषदेत स्मृतिचिन्ह देऊन जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त डॉ. सखाराम खुणे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठ अंतर्गत पशुवैद्यक व पशु विज्ञान महाविद्यालय, परभणी येथील पशु अनुवंश व पैदास विभागाचे प्राध्यापक डॉ. पंडित नांदेडकर यांना दिनांक ८ एप्रिल २०२६ रोजी करनाल येथील ICAR-राष्ट्रीय प्राणी आनुवंशिक संसाधन ब्युरो येथे आयोजित राष्ट्रीय परिषद व पाळीव पशु संवर्धन सोसायटीच्या XXIII व्या वार्षिक अधिवेशनात ‘मथुरा लभान गोवंश – महाराष्ट्राचा अभिमान’ या विषयावरील मौखिक सादरीकरणासाठी तृतीय क्रमांकाचे पारितोषिक प्रदान करून सन्मानित करण्यात आले.
या यशाच्या अनुषंगाने जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी डॉ. पंडित नांदेडकर यांचा सत्कार केला. यावेळी जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त डॉ. सखाराम खुणे, डॉ. प्रवीणकुमार घुले, डॉ. अरविंद गायकवाड, डॉ. मकरंद खरवडकर, डॉ. श्याम पवळे तसेच मथुरा-लभान पशुपालक उपस्थित होते
यावेळी डॉ. सखाराम खुणे यांनी जिल्हा नियोजन समितीच्या नाविन्यपूर्ण योजनेअंतर्गत ‘मथुरा-लभान’ गोवंशास राष्ट्रीय स्तरावर मान्यता मिळवून देण्यासाठी राबविण्यात येत असलेल्या प्रकल्पाची माहिती सादर केली. तसेच किनवट तालुक्यात सुरू असलेल्या कार्याचा आढावाही मांडण्यात आला.जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी मथुरा-लभान पशुपालक बालसिंग नानगू खचकड, रा. नागसवाडी, ता. किनवट यांचा विशेष सत्कार करून त्यांच्या पशुसंवर्धन कार्याचे कौतुक केले तसेच मथुरा-लभान गोवंशाच्या संशोधन व संवर्धनासाठी शुभेच्छा दिल्या.
०००००

संबंधित पोस्ट

बेघर निवारा केंद्राला भेट देत आयुक्त डॉ.कैलास शिंदे यांचा बेघरांशी संवाद

राज्यातील 🚨 पोलादपूरात मुसळधार पाऊस !  सह्याद्री डोंगररांगांमध्ये रात्रभर १०५ मिमी पावसाची नोंद, एकूण पावसाची नोंद १५७१ मिमीवर! 🌊 सावित्री नदी उत्तर वाहिनीने पात्र ओसंडले. 🏠 शहरातील मंदिर, घाट, मार्केट पाण्याखाली….

भांडुप मध्ये आरके विधीमहाविद्यालयाचे उद्या उद्घाटन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि केंद्रीयराज्यमंत्री रामदास आठवले ; खासदार उज्ज्वल निकम उपस्थित राहणार

कायद्याचे शिक्षण आणि प्रत्यक्ष न्यायालयीन कामकाजातील दरी भरून काढण्यासाठी ही अकॅडमी ठरणार महत्त्वाची – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ‘भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर अ‍ॅडव्होकेट ट्रेनिंग अँड रिसर्च सेंटर’चे लोकार्पण

vishwatmaklokswamivarta

नवीन वेळापत्रकानुसार कंपनीने ई-बसेसचा पुरवठा करावा-परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचे निर्देश

बुलडाणा जिल्ह्यात २४ जूनअखेर सरासरी ३३.२ मि.मी. पावसाची नोंद; शेगाव तालुक्यात सर्वाधिक पाऊस