vishwatmaklokswamivarta
Breaking News
व्यवसाय

भोकर येथे बुधवारी पंडीत दीनदयाळ रोजगार मेळाव्याचे आयोजन 

भोकर येथे बुधवारी पंडीत दीनदयाळ रोजगार मेळाव्याचे आयोजन

नांदेड द प्रतिनिधी :- नांदेड जिल्ह्यातील बेरोजगार उमेदवारांना रोजगाराची संधी उपलब्ध व्हावी यासाठी जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र व दिगांबरराव बिंदु महाविद्यालय, भोकर यांच्या संयुक्त विद्यमाने बुधवार 15 एप्रिल 2026 रोजी सकाळी 10 वा. दिगांबरराव बिंदु महाविद्यालय, भोकर येथे पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळावा/प्लेसमेंट ड्राईव्हचे आयोजन करण्यात आले आहे.

या रोजगार मेळाव्यामध्ये नामांकित उद्योजक, शाळा व महाविद्यालय तसेच इतर आस्थापनांच्यावतीने मुलाखती घेण्यात येणार आहेत. तरी जिल्ह्यातील बेरोजगार उमेदवारांनी बुधवार 15 एप्रिल 2026 रोजी सकाळी 10 वा. दिगांबरराव बिंदु महाविद्यालय, भोकर येथे उपस्थित राहून या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे सहायक आयुक्त डॉ. रा.म.कोल्हे यांनी केले आहे.

अधिक माहितीसाठी कार्यालयाचा ई-मेल nandedrojgar०१@gmail.com वर किंवा दूरध्वनी क्रमांक 02462-251674 वर संपर्क साधावा, असेही कळविले आहे.

00000

संबंधित पोस्ट

जागतिक बँकेच्या प्रतिनिधींनी केली विविध विकास कामांची पाहणी जिल्हाधिकारी कार्यालयात ‘महास्ट्राइड’ मूल्यांकन समितीची बैठक

भारतीय हवाई दलाने तांत्रिक शाखेत अधिकारी संवर्गात पात्र व्यक्तींचा समावेशासाठी नवी योजना जाहीर

सैनिक कल्याण विभागात लिपीक टंकलेखकांची भरती; 26 नोव्हेंबरपर्यंत अर्ज करण्याची मुदत..

vishwatmaklokswamivarta

कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबलीकरण योजनेअंतर्गत जमीन विक्रेत्यांनी संपर्क साधावा

गुंतवणुकदारांसाठी रेड कार्पेट, उद्योजकांच्या अडचणी प्राधान्याने सोडविणार – विजयलक्ष्मी बिदरी नागपूर विभागाच्या गुंतवणुकदार परिषदेमध्ये ६ हजार कोटीचे सांमजस्य करार

उद्योजकतेची नवी पहाट, मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम अंमलबजावणी मध्ये बदल*