vishwatmaklokswamivarta
Breaking News
व्यवसाय

चारचाकी वाहनासाठी एमएच-50 ए ए मालिका सुरु शासकीय फी भरुन आकर्षक क्रमांक आरक्षित करा

चारचाकी वाहनासाठी एमएच-50 ए ए मालिका सुरु शासकीय फी भरुन आकर्षक क्रमांक आरक्षित करा

 सातारा : प्रतिनिधी- कराड व पाटण तालुक्यातील नवीन चारचाकी वाहनासाठी डि एमएच 50-ए ए ही 0001 ते 9999 क्रमांकापर्यंतची नवीन मालिका 15 एप्रिल 2026 रोजी उप प्रादेशिक परिवहन कार्यालयाकडून सुरु करण्यात येत आहे. तरी इच्छुक वाहन धारकांकडून या मालिकेकरीता शासकीय नियमानुसार विहीत शुल्कासह अर्ज स्वीकारले जाणार असून ज्यांना आकर्षक क्रमांक घ्यावयाचे असतील त्यांनी 3 फेब्रुवारी रोजी कार्यालयाशी संपर्क साधून आकर्षक क्रमांकांची शासकीय नियमानुसार फी भरुन आरक्षित घ्यावेत, असे कराड येथील उप प्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालयाकडून कळविण्यात आले आहे.

 15 एप्रिल 2026 रोजी चारचाकी वाहनांचे अर्ज क्रमांकासाठी सकाळी 10 वाजलेपासून दुपारी 2 वाजेपर्यंत धनाकर्षासह स्विकारले जातील. ज्या आकर्षक कमांकासाठी एकच अर्ज प्राप्त झाला असेल त्या अर्जदारास त्याच दिवशी आकर्षक नोंदणी क्रमांक देण्यात येईल. एकापेक्षा अधिक अर्जदारांनी पसंतीच्या नोंदणी क्रमांकासाठी अर्ज केल्यास अशा प्रकरणात अर्जदारास कार्यालयीन कामकाजाच्या दुसऱ्या दिवशी दुपारी 2 वाजेपर्यंत निर्धारित फी पेक्षा जादा रकमेचे धनाकर्ष बंद लिफाफ्यात सादर करणे आवश्यक आहे. जो अर्जदार सर्वात जास्त रकमेचा धनाकर्ष सादर करेल त्यास पसंतीचा क्रमांक देण्यात येईल. उर्वरीत अर्जदारांना धनाकर्ष त्वरीत परत देण्यात येतील. आकर्षक नंबर आरक्षित केल्यानंतर 180 दिवसांच्या आत वाहन धारकांनी वाहनाची नोंदणी करणे बंधनकारक आहे.

0000

संबंधित पोस्ट

सन 2024-25 “विभागीय हातमाग कापड स्पर्धा” चे आयोजन

🚀 लातूर जिल्ह्यातील पर्यटन क्षेत्रातील उद्योजक आणि नवउद्योजकांसाठी सुवर्णसंधी! 🚀

जिल्हा उद्योग केंद्र व महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र (एमसीईडी) तर्फे जाफ्राबाद येथे मोफत गारमेंट मेकिंग प्रशिक्षण कार्यक्रमांचे आयोजन

पनवेल येथे दुचाकी वाहनांना आकर्षक तसेच पसंतीचे क्रमांकासाठी नवीन मालिका सुरु

विशेष भारत-रशिया व्यापार सहकार्याला चालना देणारी उद्योजकांची राऊंडटेबल चर्चा संपन्न

vishwatmaklokswamivarta

नवीन कामगार संहिता नियमावलीवर हरकती व सूचनानोंदवण्याचे कामगार उप आयुक्तांचे आवाहन