vishwatmaklokswamivarta
Breaking News
खेळ प्रतिनिधी

नवी मुंबई महानगरपालिका शाळांमधील विद्यार्थ्यांना जलतरण क्रीडा प्रकारात प्रगत प्रशिक्षण

नवी मुंबई महानगरपालिका शाळांमधील विद्यार्थ्यांना जलतरण क्रीडा प्रकारात प्रगत प्रशिक्षण

 

 नवी मुंबई प्रतिनिधी      नवी मुंबई महानगरपालिकेच्या शाळांमधील विद्यार्थ्यांना ऑलिम्पिक स्तरावर खेळल्या जाणा-या ‘जलतरण’ या क्रीडा प्रकारात आपले कौशल्य सिद्ध करुन प्राविण्य मिळविण्यासाठी तंत्रशुद्ध प्रशिक्षण देण्याचे काम महापालिकेच्या क्रीडा व सांस्कृतिक विभागाकडून करण्यात येत आहे.

  याकरिता घणसोली सेंट्रल पार्क येथील जलतरण तलावावर नमुंमपा शाळा क्रमांक ४२, घणसोली येथील मुलामुलींची प्राथमिक स्तरावर दि. १० व ११ एप्रिल, २०२६ रोजी निवड चाचणी घेण्यात आली. यामध्ये ११० मुले व ६२ मुलींनी सहभाग घेतला. याकरिता क्रीडा अधिकारी रेवप्पा गुरव यांनी पुढाकार घेऊन शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीम. अर्चना म्हात्रे यांचेशी समन्वय साधला व प्रशिक्षणाबाबत चर्चा केली. या उपक्रमात सहभागी होण्यासाठी सहशिक्षक श्री.संतोष मुंढे, श्री. राजेश पाडळे, श्रीम.स्मिता पुकळे व श्रीम. अदिती काळे यांनी साधारणपणे पोहता येते अशा इच्छुक मुलामुलींना मनापासून प्रोत्साहित करीत क्रीडा विभागाशी समन्वय साधून निवड चाचणी घेण्यासाठी उत्तम सहकार्य केले.

    या प्राथमिक निवड चाचणी मधून २१ मुले व ६ मुलींची अंतिम निवड करण्यात आली असून आता पुढील टप्प्यात प्रगत प्रशिक्षण देण्याची कार्यवाही करण्यात येणार आहे. यामधून आगामी काळात सन २०२६-२७ या शैक्षणिक वर्षापासून जिल्हास्तरीय शालेय क्रीडा स्पर्धेत इतर खाजगी शाळांमधील जलतरणपटूंसोबत नवी मुंबई महानगरपालिका शाळांतील विद्यार्थी जलतरणपटू स्पर्धांमध्ये सहभागी होऊन नवी मुंबई महानगरपालिकेचा नावलौकिक उंचावतील असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे.

    या विद्यार्थ्यांना पुढील यशस्वी वाटचालीसाठी महापौर श्रीम.सुजाता पाटील, उपमहापौर श्री. दशरथ भगत, आयुक्त डॉ.कैलास शिंदे, स्थायी समितीचे सभापती श्री.अशोक पाटील, सभागृह नेते श्री.सागर नाईक, विरोधी पक्ष नेते श्री.विजय चौगुले, क्रीडा व सांस्कृतिक कार्य समिती सभापती श्री. गिरीश म्हात्रे, अतिरिक्त आयुक्त डॉ.राहुल गेठे, क्रीडा विभागाच्या उपआयुक्त श्रीम.अभिलाषा म्हात्रे यांनी शुभेच्छा दिल्या आहेत

00000

संबंधित पोस्ट

समाज कल्याण विभागाच्या विद्यार्थ्यांचा राज्यस्तरीय यशाकडे टप्पा*कॅरम व कुस्ती स्पर्धेत गडचिरोली जिल्ह्याचे वर्चस्व…

vishwatmaklokswamivarta

नवी मुंबई महानगरपालिका प्रसिद्धीकरिता**ग्रीन मॅरेथॉनव्दारे नेरूळ विभागात पर्यावरण संवर्धन संदेशाचे प्रसारण

नमुंमपा चषक राज्य अजिंक्यपद व्हॉलीबॉल स्पर्धेच्या पुरुष गटात नागपूर तसेच महिला गटात पुणे विजयी* 

जिल्हास्तरीय युवा महोत्सव २०२५ यावर्षी ७ नाेव्हेंबर रोजी आयोजित

vishwatmaklokswamivarta

क्रीडा महोत्सवात अधिकारी-कर्मचाऱ्यांचा उत्स्फूर्त सहभाग-सुदृढ आरोग्यासाठी खेळ अत्यावश्यक – मुख्य कार्यकारी अधिकारी रणजित यादव

vishwatmaklokswamivarta

68 व्या राष्ट्रीय शालेय लॉन टेनिस स्पर्धे करिता महाराष्ट्र संघ झारखंड (रांची) येथे रवाना.

vishwatmaklokswamivarta