vishwatmaklokswamivarta
Breaking News
व्यवसाय

उच्चशिक्षित तरुणी कुक्कुटपालनातून बनली यशस्वी उद्योजिका…• जालन्याच्या अंकिता मोरे यांचा झेंडा; 10 महिन्यात 26 लाखांची उलाढाल

उच्चशिक्षित तरुणी कुक्कुटपालनातून बनली यशस्वी उद्योजिका…• जालन्याच्या अंकिता मोरे यांचा झेंडा; 10 महिन्यात 26 लाखांची उलाढाल

व्यावसायिक प्रतिनिधी-नोकरीच्या मागे धावण्यापेक्षा स्वतःचा उद्योग उभा करून इतरांना रोजगार देण्याचे स्वप्न अनेक तरुण पाहतात, मात्र ते प्रत्यक्षात उतरवणारे कमीच असतात. जालना जिल्ह्यातील गोलापांगरी येथील अंकिता मोरे पाटील या उच्चशिक्षित तरुणीने हे स्वप्न केवळ सत्यात उतरवले नाही, तर कुक्कुटपालनाच्या व्यवसायातून यशाचे ‘सोनं’ करून दाखवलं आहे. बी.एस्सी. ॲग्रीकल्चरनंतर आता एल.एल.बी.चे शिक्षण घेणाऱ्या अंकिता मोरे यांनी काही वर्षापासून कुक्कुटपालनाचा यशस्वी फॉर्म्युला राबवत आज 5 हजार गावरान कोंबड्यांचे साम्राज्य उभे केले आहे. केवळ 10 महिन्यात 26 लाखांचे उत्पन्न मिळवून त्यांनी शेतीपूरक व्यवसायातील नवी वाट दाखवून दिली आहे.

कोविडच्या संकटात शोधली संधी :-सन 2020 मध्ये जेव्हा संपूर्ण जग लॉकडाऊनमुळे ठप्प होते, तेव्हा अंकिता यांनी या संकटाचे संधीत रूपांतर करण्याचे ठरवले. घरातूनच काहीतरी वेगळे करण्याची इच्छा आणि घरच्यांच्या भक्कम पाठबळामुळे त्यांनी कुक्कुटपालनात पाऊल ठेवले. जिजामाता कृषी भूषण प्राप्त सौ. छायाताई मोरे यांचा आदर्श समोर ठेवत, अंकिता यांनी 35 एकर वडिलोपार्जित शेतीला आधुनिक जोडधंद्याची जोड दिली.रिकाम्या गोठ्यातून व्यवसायाची भरारी :- सुरवातीला त्यांच्याकडे गाईंचा गोठा रिकामा होता. अंकिता यांनी याच गोठ्याचे रूपांतर पोल्ट्री शेडमध्ये केले. पक्षी वाढल्यानंतर त्यांनी द्राक्षाच्या बागेतील अँगलचा वापर करून कमी खर्चात दुसरे शेड उभारले. खर्च कमी आणि नफा जास्त हे सूत्र त्यांनी पहिल्या दिवसापासून अंमलात आणले.

स्वतःच झाल्या डॉक्टर आणि मॅन्युफॅक्चरर :- अंकिता यांनी केवळ 500 पक्ष्यांपासून सुरुवात केली. पहिले लसीकरण 14 व्या दिवशी तर दुसरे लसीकरण 21 व्या दिवशी करावे लागते. कृषी पदवीधर असल्याने त्यांनी लसीकरणासाठी बाहेरील डॉक्टरांवर अवलंबून न राहता स्वतःच ब्रूडिंग आणि लसीकरण केले. बाहेरचे खाद्य महाग पडत असल्याने त्यांनी स्वतःचा फीड फॉर्म्युला तयार केला. मक्याचा भरडा, डीओसी आणि 50 टक्के हिरवा चारा (शेवगा, दुधी भोपळा, लसूण घास) यांचा वापर करून त्यांनी खाद्याचा खर्च निम्म्यावर आणला. मुक्त संचार पध्दतीचा अवलंब करीत कोंबड्यांना शेतात मोकळे सोडले जाते, ज्यामुळे त्या नैसर्गिक कीड-अळ्या खातात आणि सुदृढ राहतात. रात्री या कोंबड्या शेवग्याच्या झाडावरच मुक्कामाला असतात.

27 हजार शेतकऱ्यांना मोफत धडा :- अंकिता यांनी केवळ स्वतःची प्रगती केली नाही, तर एकात्मिक मुक्त-श्रेणी पोल्ट्री मॉडेल विकसित केले. गेल्या 3-4 महिन्यांत त्यांनी 27 हजार पेक्षा जास्त शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले आहे. आयसीएआर, कृषी विज्ञान केंद्र खरपुडी आणि बीएआयएफ सारख्या संस्थांच्या मदतीने त्या महिला शेतकऱ्यांना मोफत प्रशिक्षण देत आहेत.

यशाचा आर्थिक ताळेबंद (10 महिने) :- तपशिल रक्कम/प्रमाण एकूण गुंतवणूक/खर्च 10 लाख रुपयेएकूण उत्पन्न 26 लाख रुपयेपक्ष्यांची संख्या 5000 गावरान कोंबड्याअंडी दर (स्थानिक) 15 ते 19 रुपयेनिर्यात दर (अंडी) 50 ते 80 रुपयेपक्षी विक्री दर 700 रुपये (प्रती किलो/नग)”शेतीला जोडधंदा हवाच, पण तो करताना योग्य नियोजन आणि अभ्यासाची जोड दिली तर तो नक्कीच फायदेशीर ठरतो. मी स्वतः खाद्य बनवल्यामुळे माझा खर्च 50 टक्क्यांनी कमी झाला आणि नफा वाढला. तुमच्याकडे मेहनत, जिद्द आणि आत्मविश्वास असेल तर शून्यातूनही विश्व निर्माण करता येते. शेतीपूरक व्यवसाय हा ग्रामीण अर्थव्यवस्थेचा कणा ठरू शकतो, हेच मला सिद्ध करायचे होते.” — अंकिता मोरे, युवा उद्योजिका, गोलापांगरी

 

-*-*-*-*-

संबंधित पोस्ट

पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळावा 17 फेब्रुवारीला

vishwatmaklokswamivarta

प्रधानमंत्री मत्स्य संपदा’ योजनेअंतर्गत खोल समुद्रातील मासेमारी नौकांचे उद्घाटन माझगाव डॉक येथे २७ ऑक्टोबर रोजी कार्यक्रम

vishwatmaklokswamivarta

विभागीय हातमाग कापड स्पर्धेचे आयोजन विणकारांनी सहभाग घेण्याचे आवाहन

प्रधानमंत्री इंटर्नशिप योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज सादर करावेत

पनवेल येथे पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळावा वमुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना (इंटर्नशिप) उमेदवार निवड मेळाव्याचे आयोजन

मॅजिक आयटीआय जालना इनक्युबेशन सेंटर” चे 25 सप्टेंबर रोजी उद्घाटन 

vishwatmaklokswamivarta