vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशव्यवसाय

श्री गुरुगोबिंद सिंघजी औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत महिलांसाठी प्रवेशाची सुवर्णसंधी

श्री गुरुगोबिंद सिंघजी औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत महिलांसाठी प्रवेशाची सुवर्णसंधी

 

नांदेड, : प्रतिनिधी महिलांच्या कौशल्यविकासाला चालना देत त्यांना स्वावलंबी बनविण्याच्या उद्देशाने श्री गुरुगोबिंद सिंघजी औद्योगिक प्रशिक्षण संस्था (आयटीआय), नांदेड येथे शैक्षणिक वर्ष 2026-27 साठी प्रवेश प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. विशेष म्हणजे, महिलांसाठी रोजगाराभिमुख अभ्यासक्रमांवर अधिक भर देत विविध सवलती व सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.संस्थेमार्फत महिलांसाठी कॉस्मेटोलॉजी (Cosmetology) आणि शिवणकाम तंत्रज्ञान (Sewing Technology) या दोन प्रमुख अभ्यासक्रमांची सोय करण्यात आली आहे. कॉस्मेटोलॉजी व्यवसायासाठी २४ तर शिवणकाम तंत्रज्ञानासाठी ४० अशा एकूण ६४ जागा केवळ महिलांसाठी राखीव ठेवण्यात आल्या आहेत. हे दोन्ही अभ्यासक्रम अल्प कालावधीत कौशल्य आत्मसात करून रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणारे ठरत आहेत.

याशिवाय, संस्थेतील इतर तांत्रिक अभ्यासक्रमांमध्येही महिलांसाठी ३० टक्के जागा आरक्षित ठेवण्यात आल्या असून, त्यामुळे पारंपरिक क्षेत्रांबरोबरच तांत्रिक क्षेत्रातही महिलांना प्रवेश मिळणार आहे. औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत उपलब्ध असलेले विविध कोर्सेस उद्योगाभिमुख असल्याने प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर महिलांना स्वतःचा व्यवसाय सुरू करण्याची, लघुउद्योग उभारण्याची किंवा नोकरीच्या संधी मिळविण्याची मोठी संधी प्राप्त होते.संस्थेमध्ये अत्याधुनिक यंत्रसामग्री, सुसज्ज कार्यशाळा आणि अनुभवी प्रशिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली प्रात्यक्षिक शिक्षण दिले जाते. त्यामुळे विद्यार्थिनींना प्रत्यक्ष कामाचा अनुभव मिळून त्यांचा आत्मविश्वास वाढतो. तसेच, अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर विविध सरकारी योजनांचा लाभ घेऊन स्वतःचा उद्योग उभारण्यासाठीही मार्गदर्शन करण्यात येते.आजच्या बदलत्या आणि स्पर्धात्मक युगात कौशल्याधारित शिक्षणाचे महत्त्व लक्षात घेता, महिलांनी शिक्षणासोबतच कौशल्य विकासाकडेही लक्ष देणे गरजेचे आहे. या पार्श्वभूमीवर जास्तीत जास्त महिलांनी या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन संस्थेमार्फत करण्यात आले आहे.प्रवेशासाठी इच्छुक उमेदवारांनी आवश्यक कागदपत्रांसह लवकरात लवकर संस्थेशी संपर्क साधावा. संस्थेची प्रमुख वैशिष्ट्ये:•महिलांसाठी स्वतंत्र व विशेष राखीव तुकड्या •कॉस्मेटोलॉजी व शिवणकाम तंत्रज्ञानासारखे रोजगाराभिमुख अभ्यासक्रम •इतर सर्व तांत्रिक अभ्यासक्रमांमध्ये ३०% आरक्षण • अत्याधुनिक यंत्रसामग्रीसह प्रात्यक्षिक प्रशिक्षण• अनुभवी व पात्र प्रशिक्षकांचे मार्गदर्शन

महिलांच्या आर्थिक व सामाजिक सक्षमीकरणाच्या दृष्टीने ही संधी अत्यंत महत्त्वाची ठरत असून, नांदेड जिल्ह्यातील महिलांनी याचा मोठ्या प्रमाणावर लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

०००००

संबंधित पोस्ट

मुसळधार पाऊस आणि पूर परिस्थितीत नागरिकांनी सतर्क राहावे – पालकमंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले

vishwatmaklokswamivarta

सफाई कर्मचाऱ्यांना सर्व सुविधा पुरवाव्यात- आयोगाचे अध्यक्ष शेरसिंग डागोर

लोकशाहीच्या बळकटीकरणात मतदारांचा सहभाग महत्त्वाचा -जिल्हाधिकारी किशन जावळे,राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त निवडणुकीत उत्कृष्ट काम केलेल्या अधिकारी व कर्मचाऱ्यांचा सन्मान

vishwatmaklokswamivarta

गडचिरोलीतील नागरिकांना आता ‘स्पेक्स २०३०’ उपक्रमाद्वारे नेत्रसेवा मिळणार  – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,सार्वजनिक आरोग्य विभाग आणि जागतिक आरोग्य संघटनेचा उपक्रम

vishwatmaklokswamivarta

फिनटेक क्षेत्राने पेमेंट्सपलीकडे क्रेडिट, विमा, बचत, गुंतवणूक व पेन्शन सेवांचा विस्तार करावा – प्रधानमंत्री नरेंद्र मोदी

vishwatmaklokswamivarta

नेवासा बुद्रुक येथे अवैध वाळू उपशावर महसूल विभागाची मोठी कारवाई; तब्बल २८ लाखांचे ७० तराफे आगीच्या भक्ष्यस्थानी !

vishwatmaklokswamivarta