vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

संघर्षातून स्वावलंबनाकडे वाटचाल:वाहेगावच्या संगीता घोडके यांची यशोगाथा

संघर्षातून स्वावलंबनाकडे वाटचाल:वाहेगावच्या संगीता घोडके यांची यशोगाथा

छत्रपती संभाजीनगर प्रतिनिधी  तालुक्यातील वाहेगाव येथील संगीता अण्णासाहेब घोडके यांनी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतून मार्ग काढत कष्ट, जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर स्वावलंबनाचा आदर्श निर्माण केला आहे. या संघर्षपूर्ण वाटचालीत त्यांना भक्कम साथ मिळाली ती महिला आर्थिक विकास महामंडळाच्या बचत गटांची.

साध्या कुटुंबातील संगीता घोडके यांना तीन मुली व एक मुलगा असून, त्यांचे पती कंपनीत चालक म्हणून कार्यरत आहेत. केवळ मजुरीवर संसार चालवताना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत होता. मात्र, परिस्थितीसमोर हार न मानता त्यांनी स्वतःचा उद्योग सुरू करण्याचा निर्णय घेतला.

सुरुवातीला त्यांनी शिवणकामासाठी मशीन घेतले आणि दिवसभर मजुरी करून संध्याकाळी ब्लाउज शिवण्याचे काम सुरू केले. त्यातून थोडी बचत होऊ लागल्यावर गावातील वीज समस्येचा विचार करून त्यांनी इंजिनवर चालणारी पिठाची गिरणी सुरू केली. वीज नसताना गिरणी आणि वीज असताना शिवणकाम अशा दुहेरी मेहनतीतून त्यांनी उत्पन्न वाढवले.

यानंतर बचत गट व बँकेच्या कर्जाच्या मदतीने त्यांनी खारीक-खोबरे व चिक दळण्याच्या गिरण्या सुरू केल्या. या व्यवसायातून दररोज हजार ते दीड हजार रुपयांपर्यंत उत्पन्न मिळू लागले. पुढे त्यांनी पापड निर्मितीचे मशीन घेतले आणि त्यातूनही रोज ५०० ते ६०० रुपयांची कमाई सुरू झाली.

या सातत्यपूर्ण परिश्रमातून त्यांनी आपल्या मुलांचे शिक्षण पूर्ण केले. तीन मुलींचे विवाह यशस्वीरित्या पार पाडले असून, मुलगा सध्या मुंबई येथे आयटी क्षेत्रात कार्यरत आहे. तसेच, त्यांनी साडेतीन एकर शेतीही विकत घेतली आहे.संगीता घोडके यांचा हा प्रवास ग्रामीण महिलांसाठी प्रेरणादायी ठरत आहे. “प्रत्येक महिलांनी काही ना काही जोडधंदा करून स्वावलंबी व्हावे. कष्ट आणि जिद्दीच्या जोरावर यश नक्की मिळते,” असा संदेश त्यांनी दिला आहे.

०००००

संबंधित पोस्ट

नवी मुंबईमधील बांधकाम व्यावसायिक सदरुद्दीन खान यांच्यावर गोळीबार करणाऱ्या दोन जणाला अटक नवी मुंबईमधील बांधकाम व्यावसायिक सदरुद्दीन खान यांच्यावर गोळीबार करणाऱ्या दोन जणाला अटक 

मौजे महमदवाडी येथील जमीन मिळकत प्रकरणी अहवाल सादर करण्याचे निर्देश

vishwatmaklokswamivarta

हिंद-दी-चादर या भव्य सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन – सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड. आशिष शेलार

जागतिक मधमाशी दिनानिमित्त बुलढाण्याच्या राजेंद्रदास बैरागी यांना राज्यस्तरीय “मधुमीत्र” पुरस्कार

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते’आपलं मंत्रालय’ गृहपत्रिकेचे प्रकाशन

सेवाभावाचा संदेश देणारी सायकल रॅली उत्साहात संपन्न