vishwatmaklokswamivarta
Breaking News
खेळ प्रतिनिधी

खेळाडूंसाठी १० दिवसीय प्रशिक्षण शिबिराचे आयोजन

खेळाडूंसाठी १० दिवसीय प्रशिक्षण शिबिराचे आयोजन

 

अहिल्यानगर, प्रतिनिधी :- जिल्ह्यात खेळाचा प्रचार, प्रसार होऊन खेळाडूंची संख्या वाढविण्यावर लक्ष केंद्रित करण्यासाठी तसेच शहरी व गावपातळीवर चांगले खेळाडू निर्माण व्हावेत यासाठी ८ ते १४ वयोगटातील व वरिष्ठ गटातील खेळाडूंसाठी १० दिवसांचे प्राथमिक व अद्ययावत प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. अधिकाधिक खेळाडूंनी या शिबिरामध्ये सहभाग नोंदविण्याचे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी ज्ञानेश्वर खुरंगे यांनी केले आहे.

 

दि. २८ एप्रिल ते ७ मे २०२६ या कालावधीत सकाळी ६ ते ८.३० व सायंकाळी ५ ते ७.३० या वेळेत या शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. खो-खो या खेळाचे शिबिर बाणेश्वर क्रीडा मंडळ, बुऱ्हाणनगर व आबासाहेब काकडे विद्यालय, निर्मलनगर, शेवगाव येथे होणार आहे. बॅडमिंटन व कुस्ती खेळासाठी जिल्हा क्रीडा संकुल, अहिल्यानगर येथे शिबिर होईल.

जिल्हा क्रीडा प्रशिक्षण योजनेंतर्गत प्राथमिक व अद्ययावत प्रशिक्षण शिबिरात खो-खो, बॅडमिंटन, कुस्ती व कबड्डी या खेळांच्या अधिकाधिक खेळाडूंनी सहभाग नोंदवावा. प्रशिक्षण शिबिराच्या अधिक माहितीसाठी जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा, असेही कळविण्यात आले आहे.

0000

संबंधित पोस्ट

नवी मुंबई महापालिका शालेय जिल्हास्तरीय कॅरम स्पर्धेला उत्साही प्रतिसाद

vishwatmaklokswamivarta

क्रीडा सुविधा निर्मितीसाठी आर्थिक साहाय्य योजनेंतर्गत जास्तीत जास्त सुविधा निर्मिती करावी-क्रीडा व युवक कल्याण मंत्री दत्तात्रय भरणे 

५ टक्के क्रीडा आरक्षणाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी ‘डिजिटल क्रीडा ई-प्रमाण’ प्रणालीवर नोंदणीचे आवाहन

vishwatmaklokswamivarta

बुलडाणा येथे उन्हाळी क्रीडा व व्यक्तिमत्व विकास शिबीराचे आयोजन

जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा क्रीडा संकुल कार्यकारी समितीची बैठक संपन्न*

vishwatmaklokswamivarta

मिशन लक्षवेध’ अंतर्गत जिल्हा क्रीडा प्रतिभा विकास केंद्रासाठी खेळाडूंची निवड चाचणी;30 मार्चपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन