vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

जिल्ह्यात ग्रामपंचायत पोटनिवडणुकांसाठी 28 एप्रिल रोजी स्थानिक सुट्टी जाहीर

जिल्ह्यात ग्रामपंचायत पोटनिवडणुकांसाठी 28 एप्रिल रोजी स्थानिक सुट्टी जाहीर

रायगड-अलिबाग, प्रतिनिधी- रायगड जिल्ह्यातील विविध ग्रामपंचायतींमधील रिक्त झालेल्या पदांसाठी होणाऱ्या पोटनिवडणुकांच्या पार्श्वभूमीवर संबंधित कार्यक्षेत्रात दि. 28 एप्रिल 2026 रोजी स्थानिक सुट्टी जाहीर करण्यात आली आहे असून जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी याबाबत आदेश जारी केला आहे.

निधन, राजीनामा, अनर्हता किंवा इतर कारणांमुळे रिक्त झालेल्या पदांसाठी ही पोटनिवडणूक घेण्यात येत आहे. या निवडणुकांसाठी दि. 28 एप्रिल रोजी मतदान, तर दि. 29 एप्रिल रोजी मतमोजणी होणार आहे.अलिबाग तालुक्यातील बैजाळी, नागाव, खंडाळे, मुरुड एकदरा, काशिद, मांडला, कर्जत पाली तर्फे कोतल खलाटी, खालापूर होराळे,, माणगाव वणी मलईकोंड, रोहा पुई, महाड मोहोप्रे, ताम्हाणे, वराठी, पोलादपूर महालगुर,तुर्भे बुद्रुक, म्हसळा घोणसे, आणि श्रीवर्धन दिवेआगर, बागमांडला आदी ग्रामपंचायतींचा समावेश आहे. एकूण 18 ग्रामपंचायतींमध्ये पोटनिवडणुका होणार आहेत.

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका शांततेत व सुरळीत पार पाडण्यासाठी संबंधित ग्रामपंचायत कार्यक्षेत्रात ही स्थानिक सुट्टी जाहीर करण्यात आल्याचे जिल्हाधिकारी कार्यालयाने स्पष्ट केले आहे.

0000000

संबंधित पोस्ट

विशेष सखोल पुनरीक्षण २०२६’ (SIR) मोहिमेंतर्गत माहिती घेण्यासाठी घरोघरी येणाऱ्या शासकीय प्रतिनिधींना सहकार्य करण्याचे जिल्हा प्रशासनाचे आवाहन*

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा; राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभऔषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी-राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

जायकवाडीतील उपलब्ध पाण्याचे सुयोग्य नियोजन करा – पालकमंत्री संजय शिरसाट नाथसागर जलाशयाचे पालकमंत्र्यांच्या हस्ते जलपूजन

शासकीय आश्रम शाळा दीर्घकालीन सुट्ट्या कर्मचाऱ्यांना रजा रोखीकरण अनुज्ञेयआमदार सुधाकर अडबाले यांच्या प्रयत्नामुळे मिळालेले यश …

vishwatmaklokswamivarta

सुरक्षित ऑनलाईन आर्थिक व्यवहारासाठी ग्राहकांची सतर्कता गरजेची – सहायक महाव्यवस्थापक पंकज बच्छाव ‘आर्थिक व्यवहाराविषयी जनजागृती’ सत्राचे मंत्रालयात आयोजन

vishwatmaklokswamivarta

जिल्हा परिषद उपकरातंर्गत वैयक्तिक लाभाच्या योजना;प्रस्ताव मागविले