vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

मुंबई–पुणे द्रुतगती मार्गाच्या क्षमता वाढीअंतर्गत उभारण्यात आलेल्या ‘मिसिंग लिंक’ प्रकल्पाचा लोकार्पण सोहळा महाराष्ट्र दिनी १ मे रोजी पार पडणार

मुंबई–पुणे द्रुतगती मार्गाच्या क्षमता वाढीअंतर्गत उभारण्यात आलेल्या ‘मिसिंग लिंक’ प्रकल्पाचा लोकार्पण सोहळा महाराष्ट्र दिनी १ मे रोजी पार पडणार

राज्य प्रतिनिधी-महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ (मर्या.) यांच्या वतीने यशवंतराव चव्हाण मुंबई–पुणे द्रुतगती मार्गाच्या क्षमता वाढीअंतर्गत उभारण्यात आलेल्या ‘मिसिंग लिंक’ प्रकल्पाचा लोकार्पण सोहळा महाराष्ट्र दिनी १ मे रोजी पार पडणार आहे. राज्यातील वाहतूक व्यवस्थेला नवे बळ देणाऱ्या या महत्त्वाकांक्षी प्रकल्पामुळे प्रवास अधिक जलद, सुरक्षित आणि सुलभ होणार आहे.

या ‘मिसिंग लिंक’ चे उद्घाटन शुक्रवार, दि. १ मे २०२६ रोजी दु. १२:३० वाजता मिसिंग लिंक वरील पूल क्र.१, खोपाली एक्झिटजवळ, यशवंतराव चव्हाण द्रुतगती मार्ग, जि. रायगड याठिकाणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होणार असून, केंद्रीय सहकार व नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत. तसेच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार उपस्थिती राहणार आहे.

कार्यक्रमाला उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंह भोसले, महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे, कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांसह अनेक मान्यवर उपस्थित राहणार

0000

संबंधित पोस्ट

कर्तव्यपथावर झळकलेल्या महाराष्ट्राच्या सांस्कृतिक वैभवाचा मुंबईकरांना प्रत्यक्ष अनुभव

vishwatmaklokswamivarta

विकास लवांडे यांना तात्काळ अटक करा ! – हिंदुत्वनिष्ठांची मागणी**वारकरी संप्रदायातील लोकांना ‘घुसखोर’ ठरवण्याचा अधिकार विकास लवांडे आणि राष्ट्रवादीला कुणी दिला ?* – हिंदु जनजागृती समिती

विशेष लेख -शेतकऱ्यांना आर्थिक संरक्षण देणार प्रधानमंत्री पीक विमा योजना सन 2025

रोजगार मेळाव्याच्या प्रभावी नियोजनासाठी बैठक; महाविद्यालयांच्या सक्रिय सहभागावर भर

पंतप्रधान मा.श्री.नरेंद्रजी मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त तेरापंथ युवक परिषद जालना व भाजपा जालना महानगर तर्फे विविध सामाजिक उपक्रमांचे भव्य आयोजन

vishwatmaklokswamivarta

चिखली तालुक्यातील सवना येथे ड्रोन तंत्रज्ञानाचे प्रात्यक्षिक; नॅनो युरिया फवारणीचे मार्गदर्शन