vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेच्या अर्जातील त्रुटीची पूर्तता करण्यास 5 मे पर्यंत मुदतवाढ

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेच्या अर्जातील त्रुटीची पूर्तता करण्यास 5 मे पर्यंत मुदतवाढ …

नांदेड प्रतिनिधी :- अनुसूचित जातीतील जे विद्यार्थी 50 टक्के पेक्षा अधिक गुण घेऊन उत्तीर्ण झाले आहेत व ज्या विद्यार्थ्यांना समाज कल्याणच्या शासकीय वस्तीगृहामध्ये प्रवेश मिळालेला नाही, अशा विद्यार्थ्यांसाठी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना राबवली जात आहे. या योजनेच्या सन 2025-26 मधील अर्जातील त्रुटीची पूर्तता करण्यासाठी मंगळवार 5 मे 2026 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. ज्या विद्यार्थ्यांचे अर्ज त्रुटीत आहेत अशा विद्यार्थ्यांनी येत्या 5 मे पर्यंत त्रुटीची पूर्तता करावी, असे आवाहन सहायक आयुक्त समाज कल्याण नांदेड यांनी केले आहे.

ही योजना जिल्हा तसेच तालुकास्तरावर राबविण्यात येत असून जे महाविद्यालय महानगरपालिकेपासून पाच किलोमीटरच्या आतमध्ये व नगरपालिका, नगरपरिषद व नगरपंचायत तसेच तालुक्याच्या हद्दीत असलेले महाविद्यालयातील प्रवेशित पात्र विद्यार्थ्यांनी सन २०२५-२६ या शैक्षणिक वर्षात अर्ज केलेल्या असल्यास विद्यार्थ्यांनी आपल्या अर्जाची सद्यस्थिती तपासण्यासाठी https//hmas.mahait.org या संकेतस्थळावर जाऊन आपला यूजर आयडी व पासवर्ड टाकून अर्जाची सद्यस्थिती पहावी. जर अर्ज Send Back मध्ये असेल तर विद्यार्थ्यांनी तात्काळ आपल्या त्रुटीची पूर्तता व्यवस्थितरित्या परिपूर्ण कागदपत्रासह येत्या 5 मे पर्यंत पूर्ण करायची आहे. मुदतवाढ ही शेवटची असेल याची दक्षता विद्यार्थ्यांनी घ्यायची आहे.

सदरील अपलोड केलेले कागदपत्र प्रत्यक्ष कार्यालयात आणून देण्याची आवश्यकता नाही. आपल्या रजिस्टर मोबाईल क्रमांकावर सदरील मॅसेज आल्यानंतर तत्काळ स्वाधारला अर्ज करायचा आहे. जर आपला अर्ज Approved असेल तर आपल्या बँक खात्याची माहिती त्या ठिकाणी योग्यरीत्या भरायचे आहे. आपले बँक खाते क्रमांक हे आधार संलग्न असणे आवश्यक आहे. जर आपला अर्ज अंडरस्क्रुटनेमध्ये असेल तर त्या अर्जाची तपासणी प्रक्रिया सुरू आहे. प्रस्तुत कार्यालयाअंतर्गत समाज कल्याण कार्यालयाचे अधिकृत सोशल मीडियाचे पेज इंस्टाग्राम व फेसबुक पेज samajkalyannanded याला फॉलो करून आपल्या येणाऱ्या अडचणीबाबत वेळोवेळी देण्यात आलेली माहिती पाहून शंकेचे निरसन करावे. बाहेर इतर कुठल्याही अनाधिकृत ग्रुप किंवा व्यक्तीशी संपर्क न साधता थेट प्रस्तुत कार्यालयातील संबंधित टेबलच्या कर्मचाऱ्यांना येऊन आपल्या समस्याबद्दल विचारणा करावी, असे आवाहन समाज कल्याणचे सहाय्यक आयुक्त शिवानंद मिनगिरे यांनी सर्व विद्यार्थ्यांना केले आहे.

00000

संबंधित पोस्ट

श्री गणेशा आरोग्याचा’ उपक्रमातूनआतापर्यंत ३.२६ लाख नागरिकांची मोफत आरोग्य तपासणी– ६,८६२ नागरिकांनी केले रक्तदान

vishwatmaklokswamivarta

कण्हेर धरण*धरणामधून सोडण्यात येणाऱ्या पाण्यामुळे वेण्णा नदीच्या पाणीपातळीत वाढ होणार असलेने नदी पात्राजवळील नागरिकांना सतर्कतेचा इशारा

मुंबईकरांसाठी खुशखबर – बृहन्मुंबई महानगरपालिकेची नागरिकांसाठी  गृहनिर्माण लॉटरी जाहीर … आर्थिक दुर्बल घटक आणि कमी उत्पन्न गटासाठी या घरांची सोडत..

vishwatmaklokswamivarta

श्री क्षेत्र धामणगाव देव येथील यात्रा महोत्सवात भाविकांच्या सुविधेसाठी सूक्ष्म नियोजन करा – पालकमंत्री संजय राठोड यांचे निर्देश मुंगसाजी महाराज पुण्यतिथीनिमित्त दोन दिवसीय यात्रा महोत्सवाचे आयोजन; सुमारे ५० हजार भाविक येण्याचा अंदाज

vishwatmaklokswamivarta

संकटातील मुलांसाठी जीवनरेखा… : १०९८ चाईल्ड हेल्पलाईन

vishwatmaklokswamivarta

पद्म पुरस्कार २०२६ जाहीर ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांना मरणोत्तर पद्म विभूषण; महाराष्ट्रातील १५ मान्यवरांचा गौरव

vishwatmaklokswamivarta