vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

महाडीबीटी पोर्टलवर प्रलंबित शिष्यवृत्ती अर्जाबाबत समाज कल्याणच्या सूचना-शैक्षणिक वर्ष 2026-27 पासून महाडीबीटी व्हर्जन 2.00 कार्यान्वित

महाडीबीटी पोर्टलवर प्रलंबित शिष्यवृत्ती अर्जाबाबत समाज कल्याणच्या सूचना-शैक्षणिक वर्ष 2026-27 पासून महाडीबीटी व्हर्जन 2.00 कार्यान्वित

नांदेड प्रतिनिधी: राज्य शासनाच्या सुधारित धोरणानुसार महाडीबीटी प्रणालीचे व्हर्जन २.०० हे आगामी शैक्षणिक वर्ष २०२६-२७ पासून कार्यान्वित करण्यात येणार आहे. नवीन प्रणालीमध्ये डेटा हस्तांतरण आणि तांत्रिक सुसूत्रता राखण्यासाठीजुन्या प्रणालीवरील प्रलंबित अर्ज निकाली काढणे अनिवार्य आहे.

सद्यस्थितीत महाडीबीटी पोर्टल वरील सर्व योजनांचे अनुसूचित जाती प्रवर्गातील विद्यार्थ्यांचे सन २०१९-२० ते २०२५-२६ या कालावधीतील भरपूर प्रमाणात अर्ज महाविद्यालय व विद्यार्थी स्तरावर प्रलंबित असल्याचे दिसून येते. सर्व महाविद्यालयांनी ज्या विद्यार्थ्यांचे अर्ज त्रुटी पूर्ततेअभावी प्रलंबित आहेत, अशा विद्यार्थ्यांना संपर्क करून त्रुटीची पूर्तता करून घ्यावी. सदरील पात्र अर्ज तात्काळ या कार्यालयाचे स्तरावर पाठविण्यात यावेत. ज्या विद्यार्थ्यांचे अर्ज त्रुटी पूर्तता होत नसतील व जे अर्ज अपात्र आहेत असे अर्ज आपल्या स्तरावरून रिजेक्ट करण्यात यावेत.

 

नांदेड जिल्ह्यातील सर्व महाविद्यालयांनी आपल्या स्तरावरील सन २०१९-२०, २०२०-२१, २०२१-२२, २०२२-२३, २०२३-२४ व २०२४-२५ या वर्षातील प्रलंबित अर्ज मंगळवार ५ मे २०२६ पर्यंत कोणत्याही परिस्थितीत निकाली काढावेत तसेच सन २०२५-२६ या वर्षातील प्रलंबित अर्ज रविवार १० मे २०२६ पर्यंत निकाली काढावेत. सदरील मुदत ही अंतिम असून यानंतर सदरील अर्जावर कार्यवाही होणार नाही, याची नोंद घायवी. तारखेनंतर एकही अर्ज प्रलंबित राहिल्यास व एकही मागासवर्गीय विद्यार्थी शिष्यवृत्तीच्या लाभापासून वंचित राहिल्यास त्याची सर्वस्वी जबाबदारी संबंधित महाविद्यालयांची राहील, असे आवाहन आयुक्त, समाज कल्याण आयुक्तालय पुणे यांनी केले आहे.

000000

संबंधित पोस्ट

राज्यातील या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीबाबत उद्या मंगळवारी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार

vishwatmaklokswamivarta

जिल्हा कार्यकारी समितीची बैठक-कैद्यांसाठी कौशल्य विकास प्रशिक्षण केंद्र सुरू करा-जिल्हाधिकारी स्वामी

मुख्यमंत्र्यांसह सर्व मंत्र्यांच्या ताफ्यातील वाहनांची संख्या अर्ध्यावर· उच्चस्तरीय बैठकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा निर्णय· मंत्री व अधिकाऱ्यांचे विदेश दौरे रद्द· अत्यावश्यक सोडून विशेष विमान, हेलिकॉप्टर दौरे नको· बहुतेक बैठका व्हीसीद्वारे करण्याचे निर्देश· मंत्री व अधिकाऱ्यांनी किमान एक दिवस सार्वजनिक वाहतूक वापरण्याचे निर्देश..

दिवाळीच्या पार्श्वभूमीवर एलपीजी सिलेंडरच्या किमतीत वाढ..

रस्ते सुरक्षा जनजागृतीसाठी सामाजिक चळवळ उभी राहावी  – प्रभारी जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे- राष्ट्रीय रस्ता सुरक्षा अभियान 2025 चे उद्घाटन…

शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढविण्यासाठी केंद्र सरकार प्रयत्नशील – केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले 

vishwatmaklokswamivarta