vishwatmaklokswamivarta
Breaking News
करमणुक

रितेश देशमुख दिग्दर्शित आणि अभिनित  ‘ हा चित्रपट सध्या बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ ‘राजा शिवाजी’सिनेमाचं वादळ, मोडले कमाईचे रेकॉर्ड्स!

रितेश देशमुख दिग्दर्शित आणि अभिनित  ‘ हा चित्रपट सध्या बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ ‘राजा शिवाजी’सिनेमाचं वादळ, मोडले कमाईचे रेकॉर्ड्स!

 बॉलीवूड प्रतिनिधी-

रितेश देशमुख दिग्दर्शित आणि अभिनित ‘ राजा शिवाजी ‘ हा चित्रपट सध्या बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालताना दिसतोय.१ मे रोजी प्रदर्शित झालेला हा चित्रपट प्रेक्षकांना थिएटरमध्ये खेचून आणण्यात यशस्वी ठरला आहे.पहिल्या तीन दिवसांतच या सिनेमानं मराठी चित्रपटसृष्टीतील कमाईचे अनेक जुने विक्रम मोडीत काढले आहेत.

राजा शिवाजी सिनेमाची तिसऱ्या दिवशी जबरदस्त कमाई,पहिल्या दिवशी ११.३५ कोटींची दमदार ओपनिंग दिल्यानंतर आणि दुसऱ्या दिवशी कमाईत किंचितशी घट झाल्याचं दिसून आलं होतं. रविवारी म्हणजेच तिसऱ्या दिवशी या चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर मोठी झेप घेतली आहे. सुरुवातीच्या आकडेवारीनुसार, तिसऱ्या दिवशी या चित्रपटानं भारतात अंदाजे १२ कोटी रुपयांच्या जवळपास कमाई केली आहे.

तीन दिवसांचं एकूण कलेक्शन,राजा शिवाजी’नं आपल्या पहिल्या वीकेंडपर्यंत एकूण ३७ कोटी रुपयांच्या जवळपास गल्ला जमवला आहे. रविवारच्या कमाईबद्दल बोलायचं झालं तर सिनेमानं १३ कोटी १० लाख रुपयांची कमाई केली.

का ठरतोय ब्लॉकबस्टर?११०० कोटींच्या भव्य बजेटमध्ये तयार झालेला हा मराठीतील आजवरचा सर्वात महागडा चित्रपट मानला जात आहे. रितेश देशमुखचा अभिनय, शिवरायांच्या इतिहासाची भव्य मांडणी आणि सलमान खान, संजय दत्त, अभिषेक बच्चन यांसारख्या दिग्गज कलाकारांच्या विशेष भूमिकांमुळं हा चित्रपट पाहण्यासाठी प्रेक्षक चित्रपटगृहांबाहेर रांगा लावत आहेत.अवघ्या तीन दिवसांत ‘राजा शिवाजी’नें ‘सैराट’ आणि ‘वेड’ सारख्या मोठ्या चित्रपटांचे सुरुवातीचे विक्रम मागे टाकले आहेत. आता या चित्रपटाची नजर ५० कोटींच्या टप्प्याकडे लागली आहे. तसंच हा सिनेमा सैराटचा रेकॉर्ड मोडणार का? याकडं सगळ्यांचं लक्ष लागलं आहे.

अजय-अतुल यांचं संगीत आणि भव्यता चित्रपटाची गाणी आणि बॅकग्राउंड स्कोअर प्रसिद्ध संगीतकार जोडी अजय-अतुल यांनी दिलं आहे. त्यांचं ‘छत्रपती’ हे अँथम गाणं आधीच सुपरहिट ठरलं आहे. प्रसिद्ध सिनेमॅटोग्राफर संतोष सिवन यांनी टिपलेली सह्याद्रीची दृश्ये आणि युद्धाचे प्रसंग चित्रपटाला एका वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवतात.

दोन वेगवेगळ्या आवृत्त्या,या चित्रपटाचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे मराठी आणि हिंदी या दोन्ही भाषांसाठी रितेशनं वेगवेगळे रनटाइम ठेवले आहेत. मराठी आवृत्ती सुमारे ३ तास १५ मिनिटांची असून, ती अधिक सविस्तर आहे, तर हिंदी आवृत्ती थोडी संक्षिप्त ठेवण्यात आली आहे.

पुणे, मुंबई, कोल्हापूर आणि संभाजीनगर यांसारख्या शहरांमध्ये या चित्रपटाची क्रेझ मोठ्या प्रमाणावर पाहायला मिळत आहे. जाणकारांच्या मते, येणाऱ्या दिवसांत सिनेमाची कमाई आणखी वाढण्याची शक्यता असल्याचे मत चित्रपट सृष्टीतील समीक्षकांनी दिले आहे

संबंधित पोस्ट

बॉलीवूड अभिनेता विकी कौशल दिग्दर्शक लक्ष्मण उतेकर यांच्या” छावा”‘ चित्रपटाची  बंपर कमाई

vishwatmaklokswamivarta

गायिका सुलोचना चव्हाण यांच्या ९३ व्या जयंतीनिमित्त सांस्कृतिक कार्य विभागाची स्वरांजली विलेपार्ले येथे ‘सोळावं वरीस धोक्याचं’ कार्यक्रम

कला व संस्कृतीमुळेच आदिवासींचा गौरवशाली इतिहास टिकेल: डॉ.अशोक उईकेभगवान बिरसा कला मंच व कै.लक्ष्मणराव मानकर स्मृती संस्थेच्‍या विभागीय फेरीचे बक्षिस वितरण  

vishwatmaklokswamivarta

बॉलिवूड अभिनेत्री जान्हवी कपूरने इन्स्टाग्रामवर दीपू चंद्र दास यांच्या हत्येबद्दल आणि बांगलादेशातील वाढत्या जातीय हिंसाचाराबद्दल चिंता व्यक्त 

vishwatmaklokswamivarta

🎥 महालक्ष्मी सरस नवी मुंबई २०२६: रील चॅलेंज आता सुरू! 🏆मुंबई आणि नवी मुंबईतील कंटेंट क्रिएटर्स—तुमच्यासाठी ही सुवर्णसंधी

१२ एप्रिल रोजी ठाण्यात `स्वरप्रभात’ मध्ये बासरी आणि सुंद्री वादन जुगलबंदी, रोजी दत्त पंडीत यांचे गायन*रसिकांसाठी प्रवेश विनामूल्य *

vishwatmaklokswamivarta