vishwatmaklokswamivarta
Breaking News
करमणुक

१२ एप्रिल रोजी ठाण्यात `स्वरप्रभात’ मध्ये बासरी आणि सुंद्री वादन जुगलबंदी, रोजी दत्त पंडीत यांचे गायन*रसिकांसाठी प्रवेश विनामूल्य *

१२ एप्रिल रोजी ठाण्यात `स्वरप्रभात’ मध्ये बासरी आणि सुंद्री वादन जुगलबंदी, रोजी दत्त पंडीत यांचे गायन*रसिकांसाठी प्रवेश विनामूल्य *

ठाणे – प्रतिनिधी-

ठाण्यातली ‘गुरुकुल प्रतिष्ठान’ ही अभिजात संगीतात विविध उपक्रम राबविणारी एक अग्रगणी संस्था आहे. एका दशकाहून अधिक काळ या संस्थेतर्फे बासरीचे अनेक विद्यार्थी तयार होऊन आपल्या कलेचा ठसा उमटवत आहेत. सुविख्यात बासरीवादक पंडित विवेक सोनार यांच्या प्रयत्नांतून संस्थेतर्फे नावीन्यपूर्ण उपक्रम होत असतात. सकाळचे विविध राग ठाणेकरांना ऐकायला मिळावे या उद्देशातून युनियन बँक ऑफ इंडियाच्या सहकाऱ्याने Mygurukul मोबाईल अँप च्या सहकार्याने ‘स्वरप्रभात’ या कार्यक्रमाचे आयोजन रविवारी १२ एप्रिल २०२६ रोजी सकाळी ७ वाजता आम्फिथिएटर, टाऊन हॉल, कोर्ट नाका, ठाणे येथे सादर होणार आहे.

सदर कार्यक्रमात पंडित हरिप्रसाद चौरसिया शिष्यवृत्ती मिळविलेले कलाकार वेंकटेशकुमार जाधव आणि अजय सोनवणे यांची सुंद्री आणि बासरी जुगलबंदी होणारा असून त्यांना अथर्व कुलकर्णी तबला संगत करतील. त्यानंतर कलकत्ता स्थित रोजी दत्त पंडीत यांचे शास्त्रीय गायन होणार असून त्यांना सुप्रिया जोशी हार्मोनियम आणि पुष्कराज जोशी तबल्यावर साथ देणार आहेत.कार्यक्रमाचे सूत्र संचालन सुमेध समर्थ करतील. सदर कार्यक्रम विनामूल्य असून रसिकांनी त्याचा लाभ घ्यावा असे आवाहन गुरुकुल प्रतिष्ठानचे संस्थापक आणि प्रसिद्ध बासरीवादक पंडित विवेक सोनार यांनी केले आहे

000000

संबंधित पोस्ट

56 व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाची सांगता, मात्र सिनेमाची जादू प्रेक्षकांच्या मनात कायम अजरामर राहील!

vishwatmaklokswamivarta

गुणसागर निर्गुणी’मधून उलगडणार गुरुवर्य पं. नीळकंठ अभ्यंकर यांच्या अमूल्य संगीत रचनांचा सुरेल ठेवा जन्मशताब्दी वर्षानिमित्त गुरुवर्य पं. नीळकंठ अभ्यंकर यांना सांगीतिक अभिवादन

इंडियाज गॉट लेटेंट नावाचा शो-करमणुकीच्या नावाखाली अश्लिलता रणवीर अलाहाबादिया आणि समय रैना, यांच्यावर गुन्हा दाखल

vishwatmaklokswamivarta

कोकणची मुख्य समस्या जगासमोर आणतो आणि कोकणाचे अमर्याद सौंदर्य पर्यटन जगाला दाखवतो असा हा चित्रपट “कुर्ला टू वेंगुर्ला” चित्रपटाची स्क्रीनिंग,माती आणि नाती जपणारा चित्रपट-  संजय यादवराव समृद्ध मराठी चेंबर ऑफ कॉमर्स 

vishwatmaklokswamivarta

ज्येष्ठ अभिनेत्री संध्या यांच्या स्मृतीप्रित्यर्थ १९ ऑक्टोबर रोजी कार्यक्रमाचे आयोजन

vishwatmaklokswamivarta

महाभारत या लोकप्रिय मालिकेत कर्ण ही भूमिका साकारणारे अभिनेते पंकज धीर यांचं कर्करोगाने निधन…

vishwatmaklokswamivarta