मराठवाडा विभागस्तरीय ७० व्या कामगार नाट्य स्पर्धेची-प्राथमिक फेरी; कला भवन सिडकोचे ‘चकवा चांदणं’ प्रथम..
छत्रपती संभाजीनगर, प्रतिनिधी-कामगार कल्याण मंडळाच्या ७० व्या कामगार नाट्यस्पर्धेत ललित कला भवन सिडको चे ‘चकवा चांदणं’ प्रथम तर कामगार कल्याण भवन लातूर चे ‘चाफा सुंगंधी’ द्वितीय, कामगार कल्याण केंद्र कळंब चे ‘पुन्हा पुन्हा मोहोंदोजारो’ तृतीयस्थानी, कामगार कल्याण केंद्र निलंगा चे ‘किरवंत’ उत्तेजनार्थ प्रथम तर कामगार कल्याण केंद्र चौफाळा चे ‘शापित सेवा’ उत्तेजनार्थ द्वितीय पारितोषिक विजेते ठरले. विजेत्यांना उपस्थित मान्यवरांच्या हस्ते समारंभपूर्वक पारितोषिके प्रदान करण्यात आली.
महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाच्या वतीने कामगार नाट्य स्पर्धेचे आयोजन दरवर्षी केले जाते. यावर्षी स्पर्धेचे हे ७० वे वर्ष असून स्पर्धेची प्राथमिक फेरी दि.२६ डिसेंबर ते १४ जानेवारी या कालावधीत दररोज सायंकाळी ७ वाजता ललित कला भवन उस्मानपुरा येथे झाली. या स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ आज सायंकाळी ललित कला भवन उस्मानपुरा येथे आयोजित करण्यात आला.
अध्यक्षस्थानी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या नाट्यशास्त्र विभागाच्या प्रमूख वैशाली बोदेले ह्या होत्या, जिल्हा माहिती अधिकारी डॉ. मिलिंद दुसाने, सामाजिक कार्यकर्त्या सौ. मिनाताई मिसाळ तसेच युनायटेड ब्रेव्हरीज लिमि. चे वरीष्ठ मानव संसाधन व्यवस्थापक बिपीन सुपेकर, मराठवाडा विभागाचे सहाय्यक कल्याण आयुक्त भालचंद्र जगदाळे आदी मान्यवर प्रमुख अतिथी म्हणून तसेच या प्रसंगी स्पर्धेचे परीक्षक श्रीमती सुरेखा मसाळ, प्रा. प्रदीप कांबळे तसेच प्रा. कैलास टापरे आदी मान्यवर पारितोषिक वितरण समारंभास उपस्थित होते.
प्रास्ताविक भालचंद्र जगदाळे यांनी केले. मान्यवारांनी मनोगते व्यक्त केलीत. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन कल्याण निरीक्षक महेश विभांडीक यांनी तर आभार प्रदर्शन केंद्र संचालक जिज्ञेश पाटील यांनी केले.
या नाट्य स्पर्धेत कामगार कल्याण मंडळाच्या छत्रपती संभाजी नगर विभागाअंतर्गत गट कार्यालय छत्रपती संभाजीनगर १० गट कार्यालय लातूर ०३ गट कार्यालय नांदेड ०५ असे एकूण १८ नाट्य संघांनी सादरीकरण केले. प्रेमानंद गजवी लिखित पांडुरंग वाघमारे दिग्दर्शित किरवंत, अरविंद लिमये लिखित बबन राऊत दिग्दर्शित पारध, डॉक्टर कमलेश महाजन लिखित रोहित देशमुख दिग्दर्शित चकवा चांदणं, प्रा.पंजाबराव मोरे लिखित संजय राजुरकर दिग्दर्शित आक्रोश, सतीश लिंगडे लिखित सुमीत शर्मा घोळमटण, जयंत पवार लिखित रमेश सोनवणे दिग्दर्शित अधांतर, सुहास देशपांडे लिखित डॉ. मनीष देशपांडे दिग्दर्शित ती रात्र हा दिवस , विजयकुमार राख लिखित प्रा. रामेश्वर झिंजुर्डे दिग्दर्शित अण्णांची शेवटची इच्छा, तसेच युवराज सुतार लिखित राकेश भालेराव दिग्दर्शित बेगमचे ईशारे यासह दर्जेदार नाटकांचे सादरीकरण झाले.
नाट्यस्पर्धेचा निकाल खालीलप्रमाणे, उत्कृष्ट अभिनय पुरुष,
प्रथम विक्रांत भालेराव चकवा चांदणं, व्दितीय रवी आघाव चाफा सुगंधी, तृतीय पांडुरंग वाघमारे किरवंत उत्तेजनार्थ -१ अमर सोनवणे चकवा चांदण , उत्तेजनार्थ -२ रामेश्वर झिझुर्डे अण्णांची शेवटची इच्छा उत्तेजनार्थ -३ सिद्धार्थ सुर्यवंशी किरवंत उत्तेजनार्थ -४ रिझवान शेख पुन्हा पुन्हा मोहजोदारो उत्तेजनार्थ -५ राजेंद्र पोळ पारध उत्तेजनार्थ – ६ सुंदर कुमार पुरीया घोळमटण उत्तेजनार्थ -७ रमेश सोनवणे अधांतर उत्तेजनार्थ -८ नागेश सुर्यकांत अमिलकंठवर सुखाशी भांडतो आम्ही उत्तेजनार्थ -९ समीर भईगड साटं लोटं उत्तेजनार्थ -१० राकेश भालेराव बेगमचे ईशारे
उत्कृष्ट अभिनय महिला-प्रथम श्रीमती ऋतुजा सूर्यवशी चाफा सुगंधी , द्वितीय श्रीमती ऐश्वर्या डावरे शापित सेवा माईसाहेब आंबेडकर, तृतीय विभागुन श्रीमती निकीता मांजरवकर चकवा चांदण मिता, श्रीमती मोनिका अपतुरकर पारध अजना, उत्तेजनार्थ -१ श्रीमती सुरेखा मदने पुन्हा पुन्हा मोहजोदारो जानकी / तुळशी,
उत्तेजनार्थ -२ श्रीमती अरुणा वाघमारे किरवंत रेवती , उत्तेजनार्थ -३ विभागून श्रीमती अलका कर्णिक अधांतर आई , श्रीमती पुनम श्रीरामवर सेल्फी तनुआ उत्तेजनार्थ -४श्रीमती योगीला पाटील आत्मभान उत्तेजनार्थ -५ श्रीमती चांदणी जाधव, साटं लोटं
उत्कृष्ट दिग्दर्शन-प्रथम रोहीत देशमुख चकवा चांदणं , व्दितीय प्रदीप भोकरे चाफा सुगंधी, तृतीय विभागुन कल्याण वाघमारे विनोद डावरे शापित सेवा पुन्हा पुन्हा मोहंदोजारो,
उत्कृष्ट नेपथ्य-प्रथम गौतम सोनवणे/ उमेश राजहंस चकवा चादण, व्दितीय विवेक मगर पुन्हा पुन्हा मोहंदोजारो, तृतीय मल्लेश्वर मारोती कोटंबे चाफा सुगंधी
उत्कृष्ट पार्श्वसंगीत-आनंद पुडानीकराव सरवदे चाफा सुगंधी , द्वितीय शरद शिंदे / प्रकाश नेहूल चकवा चांदणं, तृतीय दिलीप मडगे। विश्वजीत चिरे पारध,
उत्कृष्ट प्रकाश योजना-प्रथम हिरा वेदपाठक गणेशलिग मराठे, चाफा सुगंधी, द्वितीय शिवकुमार जाधव, राहुल कुलकर्णी, तृतीय विभागुन गणपत वेणुगोपाल कुलकर्णी पुन्हा पुन्हा मोहंदोजारो, जनार्धन तळिखेडे किरवंत०००००