vishwatmaklokswamivarta
Breaking News
स्थानिक बातम्या

विष्णुनगर पोलीस ठाणे डोंबिवली पश्चिम ठाणे तर्फे जाहीर आव्हान

विष्णुनगर पोलीस ठाणे डोंबिवली पश्चिम ठाणे तर्फे जाहीर आव्हान

—– विष्णुनगर पोलिस ठाण्याच्या हद्दीत एक वयोवृद्ध इसम वय अंदाजे 80 ते 85 वर्ष मिळून आले होते .त्यांचे नातेवाईक मिळून न आल्याने किंवा नातेवाईकांनी प्रतिसाद न दिल्यामुळे वयोवृद्ध इसमास साधना वृद्ध सेवा केंद्र येथे ठेवण्यात आले होते .साधना वृद्ध सेवा केंद्रामार्फत त्यांची सेवा करण्यात आली .दिनांक 19 /09/ 2021 रोजी त्यांचे अल्पशा आजाराने निधन झाले आहे .त्यांचे नातेवाईक अद्याप पर्यंत त्यांचा ताबा घेणे करिता पुढे न आल्याने त्यांना बाई रुक्मिणीबाई रुग्णालय कल्याण पश्चिम येथे शवागृहात ठेवण्यात आलेली आहे .सोबत जोडलेल्या फोटोतील वयोवृद्ध इसमांच्या नातेवाईकां पर्यंत सदरचा संदेश पोहचवावा जेणेकरून वयोवृद्ध इसमांचे अंतिम संस्कार त्याच्या नातेवाइकांना मार्फत होतील. नातेवाईक पुढे येत नसतील तर आजूबाजूच्या लोकांनी, गावातील लोकांनी ,समाजातील लोकांनी त्यांच्या नातेवाईकांचा पत्ता पोलिसांना कळवावा .त्यांचे नाव गुप्त ठेवण्यात येईल. तरी सदर चा संदेश महाराष्ट्र तिल सर्व व्हाट्सअप ग्रुप वर पाठवण्यात येऊन त्या मयत वयोवृद्ध इसमाच्या नातेवाईकांचा शोध घ्यावा ही विनंती .अधिक माहितीसाठी विष्णुनगर पोलीस ठाणे दूरध्वनी क्रमांक 0251 2480102 यावर माहिती कळवावी अथवा सपोनि महेश जाधव मोबाईल क्रमांक 8879782182 या वर संपर्क करावा धन्यवाद .सोबत फोटो जोडला आहे

संबंधित पोस्ट

उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते रामराज्य सहकारी बँकेच्या मुख्य कार्यालय आणि बिबवेवाडी शाखेच्या वास्तूच्या कोनशीलेचे उद्घाटन

नीट-पीजी 2025 परीक्षा उपकेंद्रावर प्रतिबंधात्मक आदेश लागू

मध्य रेल्वेवर २७ तासांचा जंम्बो मेगाब्लॉक, मुंबई लोकलसह एक्सप्रेसला मोठा फटका

vishwatmaklokswamivarta

आज आणि उद्या कल्याण, डोंबिवली भागात सहा तासांसाठी वीजपुरवठा असेल बंद

ग्रामीण भागातील जलस्रोतांची सुरक्षा आणि शाश्वतता दृढ करण्यासाठी जिल्हा परिषदेचा उपक्रमठाणे जिल्ह्यात ‘जेजेएम – स्रोत बळकटीकरण व शाश्वतीकरण’ विषयक प्रशिक्षणास आजपासून प्रारंभ…

vishwatmaklokswamivarta

अभिनेत्री केतकी चितळे ला टार्गेट करण्याचा प्रयत्न करत आहे  एडवोकेट घनश्याम उपाध्याय