vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्यास्थानिक बातम्या

महारेराच्या प्रलंबित वसुलीसाठी कालबद्ध कार्यक्रम राबवून प्रभावी अंमलबजावणी करा – मंत्री शंभूराज देसाई

महारेराच्या प्रलंबित वसुलीसाठी कालबद्ध कार्यक्रम राबवून प्रभावी अंमलबजावणी करा – मंत्री शंभूराज देसाई

मुंबई, द प्रतिनिधी : महारेराच्या प्रलंबित वसुलीसाठी कालबद्ध कार्यक्रम राबवून प्रभावी अंमलबजावणी करा, असे निर्देश प्रभारी गृहनिर्माणमंत्री शंभूराज देसाई यांनी दिले. यासोबतच वसूलीचा सखोल आढावा घेऊन उर्वरित शिल्लक रक्कम दिलेल्या कालमर्यादेत पूर्ण करण्यावर भर द्यावा आणि वसूली प्रक्रियेत विलंब करणाऱ्या प्रकरणांवर कठोर कारवाई करावी, असेही त्यांनी स्पष्ट केले.

राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलेल्या जबाबदारीनुसार प्रभारी गृहनिर्माणमंत्री शंभूराज देसाई यांनी विधिमंडळ अधिवेशनादरम्यान लोकप्रतिनिधींनी उपस्थित केलेल्या तारांकित प्रश्न व लक्षवेधींवर मुंबईत बैठका घेऊन सविस्तर आढावा घेतला. महाराष्ट्र स्थावर संपदा प्राधिकरण (महारेरा) यांच्या आदेशांची प्रभावी अंमलबजावणी सुनिश्चित करण्यासाठी संबंधित विभागाने तातडीने ठोस आणि कालबद्ध कृती करावी, असे निर्देश त्यांनी दिले.

सदर बैठक सह्याद्री अतिथिगृह, मुंबई येथे पार पडली. बैठकीस आमदार अतुल भातखळकर, उपायुक्त कोकण विभाग (कोकण भवन), तसेच मुंबई शहर, मुंबई उपनगर, ठाणे, पुणे रायगड व पालघर येथील निवासी जिल्हाधिकारी उपस्थित होते. बैठकीत महारेरा आदेशांच्या अंमलबजावणीतील प्रलंबित प्रकरणांचा सविस्तर आढावा घेण्यात आला. संबंधित विभागाला तातडीने आवश्यक कार्यवाही करून वसूलीचे प्रमाण वाढविण्याचे निर्देश देण्यात आले

विशेषतः, विधानसभा तारांकित प्रश्नानंतर झालेल्या वसूलीचा तपशील सादर करून शिल्लक रक्कम निश्चित कालमर्यादेत वसूल करण्यावर भर देण्यात आला. जिल्हास्तरावर समन्वय अधिक प्रभावी करून प्रकरणांचा जलद निपटारा करावा, तसेच आदेशांची अंमलबजावणी टाळणाऱ्या संबंधितांविरुद्ध आवश्यक ती कठोर कारवाई करावी, अशा सूचनाही यावेळी देण्यात आल्या.

००००

संबंधित पोस्ट

जालना जिल्ह्यात इंधनाचा मुबलक साठा-अफवांवर विश्वास न ठेवण्याचे जिल्हा प्रशासनाचे आवाहन

राज्यस्तरीय तांत्रिक महोत्सव टेकसागर- २०२६ एआय हॅकाथॉन स्पर्धा उत्साहात-पिल्ले कॉलेज प्रथम, तर तासगावकर महाविद्यालयातील वेदांत कायंदेकर यांच्या ग्रुपला द्वितीय क्रमांक

जनतेसाठी राज्य शासनाकडून स्वतःच्या बसची दिवाळी भाडेवाढ रद्द;मात्र खाजगी-बस आणि बुकिंग पोर्टल्स अजूनही मोकाट!- सुराज्य अभियान

vishwatmaklokswamivarta

शाश्वत पाण्यासाठी जिल्ह्यात दि. 8 ते 22 मार्च 2026 दरम्यान साजरा होणार “जलमहोत्सव”

चौथे विश्व मराठी संमेलन मराठीचा शुद्ध, सक्षम आणि प्रभावी वापरासाठी माध्यमांचा नेहमीच पुढाकार -मराठी परिसंवादातील सूर

६४ व्या महाराष्ट्र राज्य नाट्य महोत्सवाच्या विभागीय पारितोषिक वितरण सोहळ्यात रंगकर्मींचा होणार सन्मान३० जून रोजी रवींद्र नाट्य मंदिर येथे हौशी मराठी नाट्य, बालनाट्य व प्रथम मराठी एकांकिका स्पर्धेतील पारितोषिक विजेत्यांचा गौरव