vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

जिल्हाधिकारी यांनी घेतला जिल्ह्यातील महसूल अधिकारी व मंडळ अधिकारी यांच्या कामकाजाचा आढावा

जिल्हाधिकारी यांनी घेतला जिल्ह्यातील महसूल अधिकारी व मंडळ अधिकारी यांच्या कामकाजाचा आढावा

जालना प्रतिनिधी जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांनी आज जिल्ह्यातील सर्व ग्राम महसूल अधिकारी आणि मंडळ अधिकारी यांचा व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे कामकाजाचा सविस्तर आढावा घेतला. बैठकीत जिल्हाधिकारी यांनी सर्व ग्राम महसूल अधिकारी आणि मंडळ अधिकारी यांना गावपातळीवरील समन्वय अधिक प्रभावी करण्याच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण सूचना देण्यात आल्या.

बैठकीदरम्यान जिल्हाधिकाऱ्यांनी सर्व ग्राम महसूल अधिकारी आणि मंडळ अधिकारी यांना नागरिकाभिमुख आणि पारदर्शक प्रशासनासाठी कटिबद्ध राहण्याचे निर्देश दिले. विहित कालमर्यादेमध्ये सर्व प्रकारचे फेर फारची निर्गती होईल याची दक्षता घ्यावी. कार्यालयाच्या दर्शनी भागात उपस्थिती व भेटीचे वेळापत्रक स्पष्टपणे नमूद करण्याच्या सूचना दिल्या. तसेच तालुका किंवा जिल्हास्तरीय बैठकीसाठी बाहेर जाणार असल्यास संबंधित गावकऱ्यांना पूर्वकल्पना देणे आवश्यक असल्याचे सांगितले.

महसूल संबंधित प्रकरणांमध्ये विलंब होऊ नये यासाठी फेरफारसारखी सर्व कामे विहित कालमर्यादेत पूर्ण करण्यावर विशेष भर देण्यात आला. कार्यालयीन कामकाजात कोणत्याही खाजगी व्यक्तीचा हस्तक्षेप असू नये, असे स्पष्ट निर्देश दिले.यासोबतच, शासकीय वापरातील युजर आयडी आणि डिजिटल स्वाक्षरी कोणत्याही परिस्थितीत खाजगी व्यक्तींना देऊ नयेत, अन्यथा संबंधितांवर कायदेशीर कारवाई केली जाईल, अशा सूचना दिल्या.नागरिकांकडून शासनाने निश्चित केलेल्या शुल्काव्यतिरिक्त कोणतेही अतिरिक्त शुल्क आकारले जाणार नाही, याची काटेकोर अंमलबजावणी करण्याच्या सूचना देण्यात आल्या. तसेच क्षेत्रीय कर्मचाऱ्यांनी आपल्या कार्यक्षेत्रात अवैध गौण खनिज उत्खनन व वाहतुकीवर प्रभावी नियंत्रण ठेवण्याचे आदेशही देण्यात आले.महसूल प्रशासन अधिक पारदर्शक, जबाबदार आणि जनहिताभिमुख करण्यासाठी दिलेल्या सूचनांची काटेकोर अंमलबजावणी करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांनी यावेळी केले.

-*-*-*-*-*-

संबंधित पोस्ट

जिल्हा न्यायालय रायगड, अलिबाग येथे ई-सेवा व नक्कल कॉपी केंद्राचे उद्घाटन

vishwatmaklokswamivarta

विवेकवादी चळवळीच्या बळकटीसाठी अंनिस मुंबई जिल्ह्याची दोन दिवसीय चिंतन बैठक संपन्न

धर्माची शिकवण आणि आपत्तीत मदतीचा हात…!

vishwatmaklokswamivarta

सन 2024-25 “विभागीय हातमाग कापड स्पर्धा” चे आयोजन

१० वीची पुस्तके दान अभियानातून महिलांचे शैक्षणिक सक्षमीकरण; नागरिकांना सहभागाचे आवाहन-मुख्य कार्यकारी अधिकारी सुहास गाडे यांच्या संकल्पनेतून उपक्रम

लेख : गणेशोत्सवातील आवाढव्य मूर्ती : उंची मूर्तींची हवी कि भक्तीची?- सनातन संस्था

vishwatmaklokswamivarta